IND vs IRE T20 Series 2023: जसप्रीत बुमराह टी-20 मध्ये कर्णधार होताच करणार 'हा' अनोखा विक्रम, ठरणार पहिला भारतीय
हा विक्रम करणारा बुमराह हा भारताचा पहिला कर्णधार असेल, जो गोलंदाज म्हणून संघाचे नेतृत्व करेल. मात्र, याआधी जसप्रीत बुमराहने एका कसोटी सामन्यात टीम इंडियाचे नेतृत्व केले आहे.
भारत आणि आयर्लंड (IND vs IRE) यांच्यात 18 ऑगस्टपासून तीन सामन्यांची टी-20 मालिका सुरू होत आहे. या मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) करणार आहे. विशेष म्हणजे बुमराह जवळपास वर्षभरानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार आहे. पण उद्या मैदानात येताच बुमराह एक मोठा विक्रम आपल्या नावावर करणार आहे. जसप्रीत बुमराह हा एकमेव कर्णधार असेल जो प्रथमच टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेगवान गोलंदाज म्हणून टीम इंडियाचे नेतृत्व करेल. हा विक्रम करणारा बुमराह हा भारताचा पहिला कर्णधार असेल, जो गोलंदाज म्हणून संघाचे नेतृत्व करेल. मात्र, याआधी जसप्रीत बुमराहने एका कसोटी सामन्यात टीम इंडियाचे नेतृत्व केले आहे.
बुमराह परतला एका वर्षानंतर
जसप्रीत बुमराहने जवळपास वर्षभरानंतर पुनरागमन केले आहे. पाठीच्या दुखापतीमुळे तो बराच काळ टीम इंडियातून बाहेर होता. यादरम्यान त्याच्यावर शस्त्रक्रियाही झाली. तथापि, नंतर बुमराहने पुन्हा फिटनेस मिळवला आणि यो-यो चाचणी देखील उत्तीर्ण केली. तर आता ते पुन्हा धमाल करायला सज्ज झाले आहेत. बुमराहच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया येथे तीन टी-20 सामने खेळणार आहे. बुमराहने बुधवारी आयर्लंडमध्येही जोरदार सराव केला. जर बुमराहने त्याचा जुना वेग पकडला तर टीम इंडियासाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी असेल. त्याच्या चाहत्यांनाही त्याच्या दमदार पुनरागमनाची अपेक्षा आहे. (हे देखील वाचा: Team India च्या 'या' खेळाडूवर संकट, Asia Cup 2023 मधून होवू शकतो बाहेर!)
या खेळाडूंनी टी-20 मध्ये केले टीम इंडियाचे नेतृत्व
महेंद्रसिंग धोनी
वीरेंद्र सेहवाग
रोहित शर्मा
विराट कोहली
हार्दिक पंड्या
सुरेश रैना
ऋषभ पंत
केएल राहुल
अजिंक्य रहाणे
शिखर धवन