IND vs ENG 2nd Test 2025: जसप्रीत बुमराहला दुसऱ्या कसोटीत विश्रांती? कर्णधार शुभमन गिलसमोर संघ निवडीचं नवं आव्हान
भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) दुसऱ्या कसोटीत प्लेइंग इलेव्हनमध्ये दिसणार नाही. 'इंडियन एक्सप्रेस'च्या रिपोर्टनुसार, जसप्रीत बुमराहच्या कामाचा ताण लक्षात घेता संघ व्यवस्थापनाने त्याला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे.
India Natioanl Cricket Team vs England National Cricket Team: भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर कसोटी मालिकेत व्यस्त आहे. एजबॅस्टन येथे होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी (IND vs ENG 2nd Test) टीम इंडियासाठी (Team India) एक मोठी चिंता समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) दुसऱ्या कसोटीत प्लेइंग इलेव्हनमध्ये दिसणार नाही. 'इंडियन एक्सप्रेस'च्या रिपोर्टनुसार, जसप्रीत बुमराहच्या कामाचा ताण लक्षात घेता संघ व्यवस्थापनाने त्याला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे.
हेडिंग्ले कसोटीत बुमराहने घेतल्या 5 विकेट्स
हेडिंग्ले कसोटीत बुमराहने पहिल्या डावात 5 विकेट्स घेत शानदार कामगिरी केली होती. मात्र दुसऱ्या डावात त्याला यश मिळाले नव्हते. त्यामुळे आता गिलसाठी संघ रचनेत योग्य पर्याय निवडणे ही एक मोठी जबाबदारी ठरणार आहे. हे देखील वाचा: IND vs ENG T20I Series: इंग्लंड दौऱ्यावर भारत खेळणार 5 टी-20 सामन्यांची मालिका, 'या' खेळाडूंना मिळाली संधी; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
बुमराहच्या जागी कोण?
जर बुमराह खेळणार नसेल, तर त्याच्या जागी कोणता गोलंदाज संधी मिळवेल हे महत्त्वाचं ठरणार आहे. दोन संभाव्य पर्याय आहेत: अर्शदीप सिंग आणि आकाशदीप.
अर्शदीप सिंग: अजूनपर्यंत एकही कसोटी सामना खेळलेला नाही, मात्र इंग्लंडमधील काउंटी क्रिकेटचा अनुभव आहे.
आकाश दीप: 7 कसोटी सामने खेळले असून, 12 डावांत 15 विकेट घेतल्या आहेत. अनुभवाच्या दृष्टीने आकाशदीप थोडा पुढे आहे.
गिलसाठी ठरणार निर्णायक क्षण
कर्णधार शुभमन गिलसमोर आता बुमराहच्या अनुपस्थितीत योग्य पर्याय निवडण्याचं आव्हान आहे. इंग्लंडविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात विजयासाठी बुमराहसारख्या अनुभवी गोलंदाजाची कमतरता नक्कीच जाणवणार आहे.