Rishah Pant Test Century: ऋषभ पंतचं शतक टीम इंडियासाठी ठरतंय अपशकुन? परदेशात एकदाही नाही मिळाली विजयाची चव!

भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज आणि उपकर्णधार ऋषभ पंतने (Rishabh Pant) इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात शानदार कामगिरी करत दोन्ही डावांमध्ये शतक ठोकले. पहिल्या डावात त्याने 134 धावांची आणि दुसऱ्या डावात 118 धावांची खेळी साकारली. मात्र, त्यांच्या या जबरदस्त खेळींचं सोनं करता आलं नाही आणि भारताला पराभवाचा सामना करावा लागला.

Rishabh Pant (Photo Credit- X)

India Natioanl Cricket Team vs England Natioanl Cricket Team: भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज आणि उपकर्णधार ऋषभ पंतने (Rishabh Pant) इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात शानदार कामगिरी करत दोन्ही डावांमध्ये शतक ठोकले. पहिल्या डावात त्याने 134 धावांची आणि दुसऱ्या डावात 118 धावांची खेळी साकारली. मात्र, त्यांच्या या जबरदस्त खेळींचं सोनं करता आलं नाही आणि भारताला पराभवाचा सामना करावा लागला. (हे देखील वाचा: India Beat England, 1st T20I Match 2025: भारताने इंग्लंडचा घरच्या मैदानावर केला पराभव, टी-20 सामन्यात 97 धावांनी दणदणीत विजय; स्मृतीचे ऐतिहासिक शतक)

परदेशात पंतचे शतक म्हणजे भारतीय संघासाठी पराभव?

ऋषभ पंतने कसोटी क्रिकेटमध्ये परदेशात आत्तापर्यंत 6 शतकं झळकावली आहेत – इंग्लंडमध्ये 4, ऑस्ट्रेलियात 1 आणि दक्षिण आफ्रिकेत 1. पण या सर्व सामन्यांमध्ये भारतीय संघाला एकदाही विजय मिळवता आलेला नाही. त्यापैकी 5 सामन्यांत भारताला पराभवाचा सामना करावा लागला, तर ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना अनिर्णीत राहिला.

पंतच्या विक्रमी खेळी, पण टीम इंडिया विजयी होईल कधी?

ही आकडेवारी पाहता पंतचे परदेशातील शतक जणू अपशकुन ठरत असल्याचं चित्र उभं राहतं. पण टीम इंडिया आता नक्कीच ही परंपरा मोडू इच्छिते. संघाला अपेक्षा आहे की ऋषभ पंत पुन्हा एकदा जोरदार खेळी करेल आणि यावेळी त्याचे शतक संघाच्या विजयात परावर्तित होईल.

एजबॅस्टनमध्ये दुसरी कसोटी – भारताची विजयी परतफेर?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना 2 जुलैपासून बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन मैदानावर सुरू होणार आहे. इंग्लंडने पहिला सामना जिंकत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारतीय संघाला ही लढत जिंकून मालिकेत बरोबरी साधायची आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement