IPL 2023 वर मुंबई इंडियन्सच्या ‘या’ धुरंधर खेळाडूचे लक्ष, म्हणाला - ‘पुढील वर्षी कसही सहावी...’
केवळ चार विजय आणि 10 पराभवांसह मुंबईची ‘पलटन’ गुणतालिकेत शेवटच्या क्रमांकावर राहिली. पण नवव्या सामन्यात मुंबईने सलग आठ पराभवाची मालिका खंडित केली.
मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2023 साठी आपले ध्येय निश्चित केले आहे. आघाडीच्या फळीतील फलंदाज केवळ आपल्या संघाला विजयपथावर परत आणू इच्छित नाही तर पुढील वर्षी प्रतिष्ठित ट्रॉफी जिंकू इच्छित आहे. आयपीएल (IPL) मधील सर्वात यशस्वी संघ म्हणून मुंबईस्थित फ्रँचायझीने पाच वेळा टी-20 स्पर्धा जिंकली आहे. तथापि, मुंबई इंडियन्ससाठी 2022 हंगाम निराशाजनक ठरला आणि संघ फक्त चार विजय आणि 10 पराभवांसह पॉईंट टेबलच्या तळाशी राहुल. नवव्या सामन्यात मुंबईने सलग आठ पराभवाची मालिका खंडित केली. (IPL 2023 पूर्वी मुंबई इंडियन्स ‘या’ 3 खेळाडूंना करेल रिलीज, आपल्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करतील)
मुंबई इंडियन्सने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये निराश झालेल्या सूर्यकुमारने म्हटले आहे की, “आम्हाला सहावी (ट्रॉफी) कशीही उचलायची आहे. या वर्षी तसे होऊ शकले नाही हे दुर्दैव आहे. पुढच्या वर्षी आम्हाला आणखी एक ट्रॉफी कशीही जोडायची आहे. तो (डेवाल्ड ब्रेविस) सेट-अपसाठी नवीन आहे, त्यामुळे त्याला समजले पाहिजे. ते त्याला समजावून सांगत आहेत की ती ट्रॉफी उचलण्यासाठी काय करावे लागेल, जे चांगले आहे.” सूर्यकुमारने फलंदाजीसह वैयक्तिक हंगामात प्रभावी कामगिरी केली. बोटाच्या दुखापतीमुळे तो सुरुवातीच्या खेळांना मुकला असला तरी तो सामील झाल्यावर त्याने जबाबदारी पेलण्यात कोणतीही कसर सोडली नाही. मात्र हाताला झालेल्या दुखापतीमुळे तो शेवटचे काही सामने खेळू शकला नाही.
लाइन-अपमध्ये सतत बदल करून मुंबई इंडियन्स स्थिर संयोजन करण्यात अपयशी ठरले. दुखापती, विसंगती, खराब फॉर्म आणि अयशस्वी लिलाव रणनीती यामुळे प्लेऑफ शर्यतीतून बाहेर पडणारा मुंबई हा पहिला संघ ठरला. किरोन पोलार्ड आणि ईशान किशन हे फ्रँचायझी आणि चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकले नाहीत, तर जसप्रीत बुमराह बहुतेक स्पर्धेत प्रभाव पाडू शकला नाही. मुंबई इंडियन्सने त्यांची आयपीएल 2022 ची मोहीम उच्च पातळीवर पूर्ण केली आणि अंतिम लीग सामन्यात फक्त दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला नाही तर त्यांना प्ले ऑफच्या शर्यतीतूनही बाहेर काढले. दिल्लीच्या बाहेर पडल्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा बाद फेरीसाठी पात्र ठरण्याचा मार्ग मोकळा झाला.