IPL 2022 Tickets Booking Online: यावेळी आयपीएल तिकिट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आधी ही महत्वपूर्ण माहिती जाणून घ्या
IPL 2022 Tickets online: इंडियन प्रीमियर लीगच्या 15 व्या हंगामाचे काउंटडाउन सुरु झाले. यावेळी संपूर्ण आयपीएल महाराष्ट्रात खेळला जाणार असून, 26 मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्याने लीगची सुरुवात होणार आहे. IPL ला फक्त काही दिवस शिल्लक असताना टूर्नामेंट व्यवस्थापनाकडून उत्सुक चाहत्यांना लवकरच ऑनलाइन तिकीट बुकिंग प्रक्रियेची माहिती दिली जाईल.
IPL 2022 Tickets online: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 15 व्या हंगामाचे काउंटडाउन सुरु झाले. यावेळी संपूर्ण आयपीएल (IPL) महाराष्ट्रात खेळला जाणार असून, 26 मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि कोलकता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यातील सामन्याने लीगची सुरुवात होणार आहे. आयपीएल 2022 साठी आता 5 दिवसांचा कालावधी शिल्लक असल्यामुळे तिकिटांबाबत चाहत्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. महाराष्ट्र सरकारने आगामी इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) सामन्यांसाठी स्टेडियम क्षमतेच्या 25 टक्के पूर्ण लसीकरण झालेल्या प्रेक्षकांना मान्यता दिली आहे. मुंबई आणि पुणे या दोन शहरांमधील चार ठिकाणे आयपीएल 2022 च्या 70 लीग सामन्यांचे आयोजन करण्यास सज्ज आहे. वानखेडे स्टेडियम, ब्रेबॉर्न स्टेडियम आणि DY पाटील स्टेडियम एकूण 55 लीग खेळांचे आयोजन करतील, तर पुण्याच्या MCA स्टेडियमवर एकूण 15 लीग सामने खेळले जातील. (IPL New Rules 2022: बायो-बबलचे उल्लंघन करणे टीम आणि खेळाडूंना भारी, BCCI ने नियमात केले मोठे फेरबदल; जाणून घ्या संपूर्ण Guidelines)
आयपीएलला फक्त काही दिवस शिल्लक असताना टूर्नामेंट व्यवस्थापनाकडून उत्सुक चाहत्यांना लवकरच ऑनलाइन तिकीट बुकिंग प्रक्रियेची माहिती दिली जाईल. मात्र, अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. एकदा घोषणा झाल्यास चाहते अधिकृत वेबसाइट www.iplt20.com वर तिकीट खरेदी करू शकतात. तथापि काही देशांमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा कहर सुरू केला आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्र सरकार आयपीएलमध्ये प्रेक्षकांवर बंदी घालू शकते. आतापर्यंत याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे आयोजकांकडून तिकीट विक्रीसाठी विलंब होत आहे. आयपीएल 2022 तिकिटे ऑनलाइन खरेदी आणि डाउनलोड करण्यासाठी Step-by-Step प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे.
चाहते अधिकृत वेबसाइट www.iplt20.com वर तिकीट खरेदी करू शकतात.
1. तुमचा ब्राउझर उघडा आणि अधिकृत वेबसाइट iplt20.com वर जा.
2. मेनूबारच्या तिकीट खरेदी या पर्यायावर क्लिक करा
3. तुम्ही तपशील टाकून ऑनलाइन तिकीट खरेदी करू शकता
4. तुम्हाला खरेदी करायच्या असलेल्या तिकिटांची संख्या तपासा आणि नंतर पेमेंटसाठी पुढे जा.
5. एकदा तुम्ही पेमेंट प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्ही PDF फाइल डाउनलोड करू शकता.
6. गेट एंट्रीसाठी स्क्रीनग्राब किंवा प्रिंट आउट घ्या.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)