IPL 2022: स्वस्तात मस्त! जाणून घ्या 'त्या' 5 खेळाडूंबद्दल; ज्यांना लिलावात नाही लागली मोठी बोली, कामगिरी मात्र चर्चेत राहिली
त्याचवेळी, काही खेळाडू होते ज्यांना मूळ किमतीत विकत घेतले गेले. परंतु स्पर्धा सुरु झाली तेव्ह कामगिरीचा विचार केला तर त्यांनी अनेक दिग्गज खेळाडूंपेक्षाही अधिक उत्कृष्ट कामगिरी केली आणि संघासाठी मॅच-विनर म्हणून उदयास आले.
आयपीएल 2022 च्या मेगा लिलावात (IPL Mega Auction) डझनभराहून असे अधिक खेळाडू होते, ज्यांच्यावर पैशांचा वर्षाव करण्यात आला. 10 फ्रँचायझींनी कोणाला 10 कोटी किंवा त्याहून अधिक रकमेत खरेदी करून आपल्या ताफ्यात सामील केले. त्याचवेळी, काही खेळाडू होते ज्यांना मूळ किमतीत विकत घेतले गेले. परंतु स्पर्धा सुरु झाली तेव्ह कामगिरीचा विचार केला तर त्यांनी अनेक दिग्गज खेळाडूंपेक्षाही अधिक उत्कृष्ट कामगिरी केली आणि संघासाठी मॅच-विनर म्हणून उदयास आले. आज आपण अशाच पाच खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांना आधारभूत किमतीत खरेदी करण्यात आले, परंतु आता 11-12 सामन्यानंतर त्यांची कामगिरी दमदार राहिली. लक्षणीय आहे की या यादीत समाविष्ट सर्वच खेळाडू चांगले नव्हते असे नाही, परंतु गेल्या काही हंगामात टी-20 क्रिकेटमध्ये या खेळाडूंचा लौकिक तितकासा चांगला नव्हता ही वस्तुस्थिती आहे. अशा परिस्थितीत, त्या खेळाडूंना खरेदी करून फ्रेंचायझीने मोठा डाव खेळला असे बोलले तर चुकीचे ठरणार नाही. (IPL 2022 सीझनमध्ये दोन फलंदाजांनी ठोकले 5 शतके, ‘या’ स्टार भारतीय खेळाडूच्या बॅटमधून निघाले आहेत सर्वात ‘फास्ट हंड्रेड’)
भानुका राजपक्षे (Bhanuka Rajapakse)
T20 विश्वचषक 2021 मध्ये आपल्या फलंदाजीत चमक दाखवणारा श्रीलंकेचा फलंदाज भानुकाची मूळ किंमत 50 लाख रुपये होती. असे मानले जात होते की या डावखुऱ्या फलंदाजासाठी अनेक संघ बोली लढवू शकतात, परंतु केवळ पंजाब किंग्जने त्याच्यावर बोली लावली आणि इतर कोणत्याही संघाने त्याच्यात रस दाखवला नाही. अशा स्थितीत तो मूळ किमतीत विकला गेला आणि आता त्याने पंजाबसाठी 165 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने 7 डावात 201 धावा केल्या आहेत.
मुकेश चौधरी (Mukesh Choudhary)
चेन्नई सुपर किंग्जने या खेळाडूला केवळ 20 लाख रुपयांच्या मूळ किमतीत खरेदी केले. चादरीला लिलावात चेन्नई वगळता दुसरा कोणताही खरेदीदार सापडला नाही. आयपीएल 2022 च्या सुरुवातीच्या सामन्यांमध्येही तो बेंचवर होता, पण त्याला संधी मिळताच त्याने आपली चमक दाखवायला सुरुवात केली आणि आता दीपक चाहरच्या अनुपस्थितीत तो CSK चा आघाडीचा वेगवान गोलंदाज बनला आहे. त्याने 10 सामन्यात 13 विकेट घेतल्या आहेत. तसेच पॉवरप्लेमधेही तो अधिक प्रभावी ठरला आहे.
मोहसीन खान (Mohsin Khan)
लखनौ सुपर जायंट्स हा आयपीएल 2022 मधील मजबूत संघांपैकी एक आहे. केएल राहुलच्या नेतृत्वातील संघ प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या मार्गावर आहे. गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली LSG ने लिलावात अनेक अनकॅप्ड खेळाडूंना खरेदी केले. मोहसीन खान असाच एक होता, ज्याला संघाने 20 लाख रुपयांच्या मूळ किमतीत संघात सामील केले.. मोहसीन फक्त पाच सामनेच खेळला आहे, मात्र त्याने आतापर्यंत 9 विकेट्स घेतल्या आहेत. त्यांचा इकॉनॉमी रेट 6 पेक्षा कमी आहे.
उमेश यादव (Umesh Yadav)
भारताचा स्टार वेगवान गोलंदाज आणि कसोटी विशेषज्ञ उमेश यादव, आयपीएल मेगा लिलावात सर्वात लोकप्रिय खेळाडू नव्हता. त्याची मूळ किंमतही 2 कोटी रुपये होती. अशा परिस्थितीत केकेआरने त्याला आधारभूत किमतीत विकत घेतल्यानंतर चाहत्यांनी प्रश्न उपस्थित केला की फ्रँचायझीने त्याच्यावर अनावश्यक पैसे खर्च केले. मात्र, त्याने आपल्या कामगिरीने सर्वांनाच चकित केले. त्याने 10 सामन्यात 15 विकेट घेतल्या आहेत. विशेष म्हणजे की तो नव्या चेंडूने विकेट घेत आहे.
टिम साउदी (Tim Southee)
कोलकाताने न्यूझीलंडच्या कसोटी गोलंदाजाचा ताफ्यात समावेश करून चांगलीच मोठी उडी मारली. पहिल्या काही सामन्यांमध्येही त्याला संधी मिळाली आणि तो चांगला दिसत होता, पण पॅट कमिन्सच्या पुनरागमनामुळे त्याला बाहेर बसवावे लागले. मात्र कमिन्सच्या जागी त्याला नियमित संधी दिली जात आहे. 1.5 कोटींच्या मूळ किमतीला विकल्या गेलेल्या या खेळाडूने सात सामन्यांत 12 विकेट घेत टी-20 क्रिकेटमध्ये अजूनही चांगली गोलंदाजी करू शकतो हे सिद्ध केले आहे.