IPL 2022, MI vs CSK: मुंबईविरुद्ध सामन्यापूर्वी चेन्नईच्या स्टायलिश फलंदाजाने ‘या’ कारणामुळे सोडली सुपर किंग्जची साथ, पुन्हा करणार का पुनरागमन?
चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर डेव्हन कॉन्वे त्याच्या लग्नासाठी दक्षिण आफ्रिकेला रवाना झाला आहे. सलामी फलंदाज चेन्नईच्या प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर होण्यापूर्वी सुरुवातीच्या सामन्यात खेळला होता. एका अहवालानुसार, कॉन्वे आठवड्याच्या शेवटी CSK संघात पुन्हा सामील होईल आणि भारतात आयसोलेशनचा कालावधी पूर्ण केल्यानंतर तो निवडीसाठी उपलब्ध होईल.
IPL 2022, MI vs CSK: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2022 मध्ये आज चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात सामना रंगणार आहे. आयपीएल (IPL) इतिहासातील हे दोन सर्वात यशस्वी फ्रँचायझी संघ सध्या गुणतालिकेत 9व्या आणि 10व्या क्रमांकावर आहेत. चेन्नईच्या खात्यात एकच विजय आहे, तर मुंबईने अद्याप गुणतालिकेत खातेही उघडलेले नाही. या सामन्यापूर्वी, CSK संघातील किवी खेळाडू डेव्हॉन कॉन्वे (Devon Conway) बायो बबल सोडून बाहेर पडला आहे. न्यूझीलंड आणि CSK सलामीवीर कॉन्वे लवकरच लग्नबेडीत अडकणार आहे आणि म्हणूनच तो बायो बबलमधून बाहेर आला आहे. यामुळे कॉन्वे दोन सामन्यांना मुकणार आहे, पण लग्नानंतर लवकरच संघात परतणार आहे. CSK खेळाडूंनी त्यांच्या लग्नापूर्वीचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला, ज्यामध्ये सर्व खेळाडू पारंपरिक पोशाखात दिसले. (IPL 2022: मुंबईविरुद्ध हायव्होल्टेज सामन्यापूर्वी CSK संघात मोठा बदल, जखमी ऍडम मिल्नेच्या ‘या’ श्रीलंकन खेळाडूचा केला समावेश)
पुढील एक आठवडा तरी कॉन्वे निवडीसाठी उपलब्ध होणार नाही. डावखुरा फलंदाज त्याच्या लग्न समारंभासाठी दक्षिण आफ्रिकेला रवाना झाला आहे. लक्षणीय आहे की, कॉन्वेने आतापर्यंत गतविजेत्यासाठी फक्त एक गेम सामना आहे. त्यामुळे, ‘यलो आर्मी’ला कदाचितच त्याच्या अनुपस्थतिचा परिणाम होईल. ESPNcricinfo च्या अहवालानुसार, किवी सलामीवीर 24 एप्रिल, रविवारी CSK संघात पुन्हा सामील होईल. तथापि कोविड-19 प्रोटोकॉलनुसार सलामी फलंदाजाला पुढील तीन दिवस वेगळे राहावे लागेल आणि CSK कॅम्पमध्ये सामील होण्यापूर्वी सर्व आवश्यक प्रोटोकॉल पूर्ण करावे लागतील. परिणामी, डावखुरा फलंदाज यलो आर्मीसाठी किमान दोन सामन्यांसाठी अनुपलब्ध असेल. गतविजेत्याचा चेन्नईचा सामना 21 एप्रिल रोजी पाच वेळा विजेत्या मुंबई इंडियन्सशी होणार आहे. त्यानंतर CSK 25 एप्रिल रोजी (सोमवार) पंजाब किंग्जविरुद्ध खेळणार आहे. तर पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यासाठी ‘यलो आर्मी’ला सहा दिवसांचा ब्रेक मिळेल आणि 1 मे (रविवार) रोजी सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध मैदानात उतरेल.
उल्लेखनीय म्हणजे, आयपीएल 2022 मेगा लिलावादरम्यान कॉन्वेला ‘यलो आर्मी’ने एक कोटी रुपयांना खरेदी केले होते. कॉन्वेच्या टी-20 आकडेवारीबद्दल बोलायचे तर 30 वर्षीय खेळाडूने किवी संघासाठी 20 सामने खेळले आहेत आणि 50.17 च्या उत्कृष्ट सरासरीने 602 धावा केल्या आहेत. तसेच त्याने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय टी-20 कारकिर्दीत चार अर्धशतके झळकावली आहेत, ज्यात त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 99 धावा आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)