IPL 2022 Mega Auction: महाराष्ट्राच्या ‘या’ खेळाडूंवर असणार मुंबई इंडियन्सची करडी नजर, लिलावात पाडू शकतात पैशांचा पाऊस

कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्स आतापर्यंतची स्पर्धेतील सर्वात यशस्वी फ्रँचायझी आहे. यावेळी आयपीएलचे लीग सामने महाराष्ट्रात आयोजित करण्याचा बीसीसीआयने ठरवल्याचे वृत्त समोर आले आहे. असे झाल्यास मुंबई इंडियन्सना अधिक फायदा होऊ शकतो. त्यामुळे आगामी लिलावात मुंबई इंडियन्सचे लक्ष्य असलेल्या महाराष्ट्रातील पाच खेळाडूंचा आढावा घेणार आहोत.

शार्दूल ठाकूर (Photo Credit: PTI)

IPL 2022 Mega Auction: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 15 व्या हंगामासाठी सर्व देशवासीय खूप उत्सुक आहेत. आगामी हंगाम अधिक रोमांचक करण्यासाठी यावेळी मेगा लिलाव आयोजित करण्यात येत आहे. देश-विदेशातील तब्बल 590 खेळाडूंवर यादरम्यान बोली लावली जाईल. कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वातील मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आतापर्यंतची स्पर्धेतील सर्वात यशस्वी फ्रँचायझी आहे. पाच वेळा आयपीएल (IPL) चॅम्पियन्सने रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, आणि किरोन पोलार्ड यांना रिटेन करून प्रक्रियेसाठी आपला हेतू स्पष्ट केला आहे. यावेळी आयपीएलचे लीग सामने महाराष्ट्रात (Maharashtra) आयोजित करण्याचा बीसीसीआयने (BCCI) ठरवल्याचे वृत्त समोर आले आहे. अजून याबाबत अधिकारीक पुष्टी झाली नसली तरी असे झाल्यास मुंबई इंडियन्सना अधिक फायदा होऊ शकतो. त्यामुळे आगामी लिलावात मुंबई इंडियन्सचे लक्ष्य असलेल्या महाराष्ट्रातील पाच खेळाडूंचा आढावा घेणार आहोत. (IPL 2022: मुंबई इंडियन्सला महागात तर नाही पडणार टी-20 क्रिकेटच्या ‘या’ धाकड खेळाडूला 6 कोटी रुपयात रिटेन करण्याचा निर्णय)

शार्दूल ठाकूर (Shardul Thakur)

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ‘पालघर एक्सप्रेस’चा भाव अलीकडे चांगलाच वाढला आहे. यापूर्वी चेन्नई सुपर किंग्ससाठी खेळलेल्या शार्दूलला फ्रँचायझीने रिटेन केले नाही, पण त्याची उपयुक्तता CSK आणि मुंबई इंडियन्समध्ये रस्सीखेच होऊ शकते. एक चांगला गोलंदाज असण्यासोबतच तो गरज पडल्यास बॅटने देखील योगदान देऊ शकतो. अलीकडच्या काळात त्याने बॅटने चांगले केले आहे. आणि एक क्रिकेटपटू म्हणून तो परिपूर्ण असल्यामुळे निश्चितपणे मुंबई इंडियन्सने विचारात घेऊन त्याच्यासाठी बोली लावली पाहिजे.

अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane)

भारतीय खेळाडूंच्या यादीत रहाणे सर्वात अनुभवीपैकी आहे. आयपीएलमध्ये त्याला आपले कौशल्य दाखवण्याची गेल्या काही वर्षात अधिक संधी मिळाली नसली तरी त्याने यापूर्वी राजस्थान रॉयल्स आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्ससाठी सर्वोत्तम कामगिरी केली आहे. तो डावाची सुरुवातही करू शकतो तर मधल्या-फळीत देखील फलंदाजी करण्यात शक्ष्म आहे. तो मुंबईच्या नेतृत्व गटाचा एक भाग देखील असू शकतो आणि रोहित त्याच्यावर अवलंबून राहू शकतो.

शिवम दुबे (Shivam Dube)

किरोन पोलार्डला साथ देण्यासाठी मुंबई इंडियन्स अष्टपैलू खेळाडूंच्या यादीतून शिवम दुबेला टार्गेट करू शकते. आता हार्दिक पांड्या संघाचा भाग नसल्यामुळे दुबे त्याच्या मजबूत शरीरयष्टी आणि मोठ्या फटकेबाजीच्या क्षमतेसह त्याची जागा घेण्यासाठी उपयुक्त दावेदार ठरू शकतो. तसेच गरज पडल्यास तो काही षटके गोलंदाजी देखील करू शकतो. काही संघांना चांगल्या अष्टपैलू खेळाडूंची गरज असल्याने मेगा लिलावात दुबेचा भाव वाढू शकतो.

श्रेयस अय्यर (Shreyas Iyer)

कर्णधार नसलेल्या तीन फ्रँचायझी मेगा लिलावात श्रेयस अय्यरवर उत्सुकतेने बोली लावतील. त्याचे नेतृत्वाची गुणवत्ता सर्वांनी पहिली आहे. अय्यर स्वतः देखील संघाचे नेतृत्व करण्यास उत्सुक असताना मुंबई इंडियन्स त्याच्यावर भविष्यासाठी गुंतवणूक म्हणून डाव लावू शकतात. अन्यथा, अय्यर कर्णधार नसलेल्या तीन फ्रँचायझींपैकी एकाचे नेतृत्व करणे अपेक्षित आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now