IPL Auction 2025 Live

IPL 2022, RR vs DC: वॉर्नर-मार्शपुढे राजस्थान निष्प्रभ; दिल्लीकडून राजस्थानचा 8 विकेटने दारुण पराभव, PlayOff मधील आव्हान कायम

या सामन्यात डेविड वॉर्नर आणि मिचेल मार्श यांच्या झंझावाती खेळीच्या जोरावर दिल्लीने 18.1 ओव्हरमध्ये राजस्थानचा 8 गडी राखून दारुण पराभव करत आयपीएलच्या प्लेऑफ शर्यतीतील आव्हान कायम ठेवले आहे.

डेविड वॉर्नर आणि मिचेल मार्श (Photo Credit: PTI)

IPL 2022, RR vs DC: राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात आयपीएल (IPL) 2022 चा 58 वा सामना डीवाय पाटील स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात डेविड वॉर्नर (David Warner) आणि मिचेल मार्श (Mitchell Marsh) यांच्या झंझावाती खेळीच्या जोरावर दिल्लीने आयपीएलच्या प्लेऑफ शर्यतीतील आव्हान कायम ठेवले आहे. रॉयल्सने दिल्लीपुढे 161 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात वॉर्नर-मार्शच्या जोडीपुढे राजस्थानचे गोलंदाज अक्षरशः निष्प्रभ ठरले. दिल्ली कॅपिटल्सने 18.1 षटकांत 2 बाद 161 धावा करून सामना खिशात घातला. ‘करो या मरो’च्या सामन्यात दोघांनी एक हाताने संघाला विजयीरेष ओलांडून दिली. मार्शने सर्वाधिक 89 धावा केल्या. तर वॉर्नर 52 धावा आणि कर्णधार ऋषभ पंत 4 चेंडूत 13 धावांची ताबडतोड खेळी करून नाबाद परतले. दुसरीकडे, ट्रेंट बोल्ट आणि युजवेंद्र चहलने राजस्थानसाठी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली. (IPL 2022 Points Table Updated: दिल्ली कॅपिटल्स संघाची PlayOff आस कायम, तर पराभूत होऊनही राजस्थान रॉयल्सचे टॉप-3 स्थान अबाधित)

दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा परिस्थितीत प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने 20 षटकांत 6 गडी गमावून 160 धावा केल्या. प्रत्युत्तरात बोल्टने केएस भरतची विकेट घेत संघाला जोरदार सुरुवात करून दिली. मात्र, वॉर्नर आणि मार्श यांनी मोर्चा सांभाळला व दिल्लीला विजयाच्या जवळ नेले. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 144 धावांची भागीदारी करून दिल्ली संघाच्या विजयाचा पाया रचला. शून्यावर दिल्लीने पहिली विकेट गमावल्यावर वानरे/मार्शच्या जोडीने विकेटसाठी राजस्थानच्या गोलंदाजांना चांगलाच घाम फोडला. अखेरीस चहलने 18 व्या षटकांत चहलने मार्शच्या अर्धशतकी खेळीवर ब्रेक लावला आणि त्याला माघारी धाडलं. त्याने आपल्या खेळीत 5 चौकार आणि 7 षटकार मारले.

दरम्यान या सामन्यात राजस्थानची सुरुवात चांगली झाली नाही. अनुभवी फलंदाज जोस बटलर अवघ्या 7 धावाच करू शकला. तर यशस्वी जयस्वालने 19 चेंडूत 29 धावा केल्या. आर अश्विनने 38 चेंडूत 50 धावा तर, देवदत्त पडिकल 30 चेंडूत 48 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला. दुसरीकडे, दिल्ली 12 पैकी 6 सामने गमावून असून ते आता 12 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. तसेच राजस्थानने 14 गुणांसह तिसरे स्थान कायम राखले आहे.