IPL 2022 मध्ये ‘हे’ 5 खेळाडू ठरवणार मुंबई इंडियन्सचे भवितव्य, यावेळी नवीन रूप-रंगात दिसणार संघ
IPL 2022: इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) इतिहासातील सर्वात यशस्वी फ्रँचायझी असलेल्या मुंबई इंडियन्ससाठी आयपीएलचा 15 वा हंगाम महत्त्वाचा ठरणार आहे. 2020 मध्ये आयपीएलचे विजेतेपद पटकावणारा मुंबईचा संघ गेल्या हंगामात प्लेऑफ देखील गाठू शकला नाही. अशा स्थितीत या वेळी संघाला नवीन चेहऱ्यांकडून संघाची नौका पडेल अशी अपेक्षा असेल.
IPL 2022: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) इतिहासातील सर्वात यशस्वी फ्रँचायझी असलेल्या मुंबई इंडियन्ससाठी आयपीएलचा (IPL) 15 वा हंगाम महत्त्वाचा ठरणार आहे. पाच वेळा आयपीएल चॅम्पियन मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) पुन्हा एकदा स्पर्धेत घबराट निर्माण करण्यासाठी सज्ज झाली आहे. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) सोबत असे अनेक खेळाडू संघाच्या विजेतेपदाचा षटकार ठोकण्यासाठी जीव-तोडून प्रयत्न करतील. 2020 मध्ये आयपीएलचे विजेतेपद पटकावणारा मुंबईचा संघ गेल्या हंगामात प्लेऑफ देखील गाठू शकला नाही. संघाचा नेट रनरेट कोलकाता नाईट रायडर्स पेक्षा चांगला नव्हता. अशा स्थितीत या वेळी संघाला नवीन चेहऱ्यांकडून संघाची नौका पडेल अशी अपेक्षा असेल. (IPL 2022: रोहित शर्माने तडातड गोळ्या झाडून केले थक्क, आयपीएलच्या रंगतदार हंगामापूर्वी MI Arena मध्ये मुंबई इंडियन्सची धमाल Watch Video)
1. रोहित शर्मा (Rohit Sharma)
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार रोहित शर्माच्या खांद्यावर यावेळी दुहेरी जबाबदारी असणार आहे. या वेळी सलामीवीर म्हणून क्विंटन डी कॉक संघाकडे नाही. अशा स्थितीत कर्णधार म्हणून नव्हे तर एक सलामीवीर म्हणून चांगली सुरुवात करून देण्याची जबाबदारी ‘हिटमॅन’वर असेल. रोहित शर्मा साठी मागील हंगाम चांगला नव्हता. याशिवाय टीम इंडिया कर्णधार आंतरराष्ट्रीय स्तरावर धावा करण्यासाठी संघर्ष करत आहे, अशा स्थितीत या वर्षी मुंबई इंडियन्सला सातत्याने धावा करू करू इच्छित असेल.
2. डेवाल्ड ब्रेव्हिस (Dewald Brevis)
अंडर-19 विश्वचषक 2022 मध्ये बेबी एबी डिव्हिलियर्स म्हणून प्रसिद्ध झालेल्या डेवाल्ड ब्रेविस साठी हा आयपीएलचा पहिला हंगाम असेल. युवा खेळाडूंना या स्पर्धेतून खूप काही शिकायला मिळते, त्यामुळे ही स्पर्धा युवा खेळाडूंसाठी महत्वाची मानली जाते. यासोबतच त्याचे कौशल्य आणखी विकसित करण्यासाठी मुंबई इंडियन्सपेक्षा चांगली फ्रँचायझी असू शकत नाही. त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाल्यास त्याला रोखणे संघाना अशक्य होईल.
3. ईशान किशन (Ishan Kishan)
मुंबई इंडियन्सने किशनवर इतिहासातील सर्वात मोठी बोली लावली आणि युवा विकेटकीपर-फलंदाजाला 15-25 रुपयात खरेदी केले. अशा परिस्थितीत किशनकडून वेगवान धावा करणे आणि दुखापत न होता प्रत्येक सामना खेळणे अपेक्षित आहे, कारण त्याच्याशिवाय संघाकडे दुसरा अनुभवी यष्टिरक्षक नाही.
4. टिम डेविड (Tim David)
हार्दिक पांड्या याची बदली म्हणून टिम डेविडकडे पहिले जात आहे. अशा परिस्थितीत सिंगापूरमध्ये जन्मलेल्या आणि ऑस्ट्रेलियन संघासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचे स्वप्न पाहणाऱ्या डेविडसाठी आयपीएल 2022 महत्त्वाचे ठरणार आहे. त्याने चेंडू आणि बॅटने धमाल केली तर तो त्याच्या आणि संघाच्या भल्यात असेल.
5. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah)
दरवेळेप्रमाणे या वेळीही बुमराह मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजी विभागाचे नेतृत्व करेल. मुंबई इंडियन्सला गोलंदाजी विभागाचा प्रमुख बुमराहने पहिल्या दोन षटकांमध्ये आणि डेथ ओव्हर्समध्ये दोन कमी धावा द्याव्यात आणि विकेट्सही घ्याव्यात असे संघाला अपेक्षित असेल. असे करण्यात जर बुमराह यशस्वी ठरला तर मुंबई इंडियन्सचे प्लेऑफमध्ये पोहोचण्याचा मार्ग सुकर होईल.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)