IPL 2022 Auction: ‘या’ 5 धाकड खेळाडूंवर असणार मुंबई इंडियन्सची नजर, मेगा लिलावात लावू शकतात मोठी बोली
पाच वेळा आयपीएल चॅम्पियन्स मुंबई इंडियन्सने कर्णधार रोहित, स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह, वरिष्ठ खेळाडू किरोन पोलार्ड आणि स्टायलिश फलंदाज सूर्यकुमार यादव यांना रिटेन केले आहे. मुंबई इंडियन्सकडे 48 कोटी रुपये शिल्लक आहेत आणि आयपीएल 2022 च्या लिलावात मुंबई इंडियन्स कोणत्या पाच संभाव्य खेळाडूंसाठी बोली लावू शकतात ते खालीलप्रमाणे आहेत.
IPL 2022 Mega Auction: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2022 साठी खेळाडूंचा लिलाव पुढील महिन्यात आयोजित केला जाणार आहे. आयपीएल (IPL) गव्हर्निंग कौन्सिलने प्रत्येक फ्रँचायझीला जास्तीत जास्त चार खेळाडूंना रिटेन करण्याची परवानगी दिली असल्याने, बहुतेक फ्रँचायझींनी त्यांच्या प्रीमियम खेळाडूंना कायम ठेवले आहे. आठ विद्यमान संघांनी एकूण 27 खेळाडूंना रिटेंशन यादीत कायम ठेवले होते. रोहित शर्मा (Rohit Sharma), एमएस धोनी, विराट कोहली आणि केन विल्यमसन यांसारख्या दिग्गज खेळाडूंना 2022 मधील मेगा लिलावापूर्वी आपापल्या संघांनी कायम ठेवले आहे. पाच वेळा आयपीएल चॅम्पियन्स मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) कर्णधार रोहित, स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह, वरिष्ठ खेळाडू किरोन पोलार्ड आणि स्टायलिश फलंदाज सूर्यकुमार यादव यांना रिटेन केले आहे. मुंबईकडे 48 कोटी रुपये शिल्लक आहेत आणि आयपीएल 2022 च्या लिलावात मुंबई इंडियन्स कोणत्या पाच संभाव्य खेळाडूंसाठी बोली लावू शकतात ते खालीलप्रमाणे आहेत. (IPL 2022 Auction: आता नाही तर कधीच नाही! यावेळी नाही मिळाला खरेदीदार तर ‘या’ आंतरराष्ट्रीय स्टार खेळाडूंचा होऊ शकतो खेळ खल्लास!)
1. ईशान किशन
मुंबई इंडियन्सचा यष्टिरक्षक-फलंदाज त्याच्या आक्रमक फलंदाजी शैलीसाठी प्रसिद्ध आहे. गेल्या हंगामात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध अंतिम लीग स्टेज सामन्यात याचे उदाहरण पाहायला मिळाले जिथे त्याने 32 चेंडूत 11 चौकार आणि चार षटकारांसह 84 धावा चोपल्या. ईशान 2018 पासून मुंबई फ्रँचायझीसोबत आहे आणि त्याने 45 आयपीएल सामन्यांत 1133 धावा केल्या आहेत. किशनला वगळणे मुंबईसाठी नक्कीच कठीण निर्णय राहिला असेल आणि अनेक फ्रँचायझी त्याच्यासाठी लिलावात नक्कीच बोली लावतील पण त्याला परत मिळवण्यासाठी मुंबई संघ कोणतीही कसर सोडणार नाही.
2. जॉनी बेअरस्टो
इंग्लंडचा धडाकेबाज सलामीवीर उत्कृष्ट स्ट्रायकर आहे, विशेषत: जेव्हा तो फिरकीपटूवर हल्ला करतो, तेव्हा तो कमीत कमी फूटवर्क वापरतो. बेअरस्टोने 2019 मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले आणि डेविड वॉर्नरसह डावाची सुरुवात करून त्याच्यासाठी एक जबरदस्त वर्ष ठरले. त्याने 10 डावांत 157.24 च्या स्ट्राइक रेटने 445 धावा करून मोसमाचा शेवट केला. मुंबई इंडियन्सला निश्चितपणे एका स्फोटक सलामीवीराची गरज आहे जो त्यांना डावात चांगली सुरुवात करून देऊ शकेल आणि बेअरस्टो विकेट्स मागे देखील उपयुक्त ठरू शकतो.
3. आवेश खान
आवेश खानने गेल्या मोसमात आपल्या वेगवान गोलंदाजीने खूप प्रभावित केले आहे. आयपीएल 2021 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या आवेशला दिल्ली कॅपिटल्सने बाहेरचा रस्ता दाखवला. आवेश खान गेल्या मोसमात दिल्ली कॅपिटल्सचा सर्वोत्तम खेळाडू म्हणून उदयास आला होता. या युवा भारतीय गोलंदाजाने अवघ्या 16 सामन्यात 24 विकेट घेतल्या. पण दिल्लीला त्याला रिटेन करता आले नाही, पण मागील कामगिरीच्या जोरावर मुंबई इंडियन्स संघ त्यांना विकत घेण्याचा जोर लागून प्रयत्न करेल.
4. राशिद खान
अफगाणिस्तानचा लेगस्पिनर आयपीएल लिलावाचा विक्रम मोडण्याची शक्यता आहे कारण तो प्रत्येक फ्रँचायझीच्या रडारवर असेल. खानने 76 आयपीएल सामन्यांतून 6.33 च्या इकॉनॉमी रेटने आणि 20.55 च्या गोलंदाजीच्या सरासरीने 93 विकेट घेतल्या आहेत. खान त्याच्या गुगलीसह फलंदाजांना थक्क करण्यासाठी शक्षम आहे आणि महत्त्वपूर्ण टप्प्यावर बॅटने देखील त्याच्या संघासाठी यश मिळवू शकतो. मुंबई इंडियन्सने राहुल चाहरला रिलीज केले आहे आणि ते त्यांच्या दिग्गजांच्या संघात जागतिक दर्जाच्या फिरकीपटूला जोडण्याची संधी ते सोडतील असे दिसत नाही.
5. ड्वेन ब्रावो
वेस्ट इंडिजचा माजी अष्टपैलू खेळाडू ब्राव्होला चेन्नई सुपर किंग्स (CSK) ने आयपीएल 2022 लिलावापूर्वी रिलीज केले. ब्रावो सीएसकेसाठी गेम चेंजर ठरला आणि सुपर किंग्जने त्याला लिलावात पुन्हा एकदा टार्गेट केल्यास आश्चर्य वाटू नये. पण चेन्नईला मुंबई इंडियन्सकडून तगडी स्पर्धा मिळू शकते, जे एका दशकानंतर त्यांच्या माजी स्टारला ताफ्यात सामील करण्यासाठी उत्सुक असतील. ब्राव्होने 2008 मध्ये मुंबईसाठी आयपीएलमध्ये पदार्पण केले आणि फ्रँचायझीसाठी तीन हंगाम खेळले. ब्रावोला खरेदी करण्याचे मुख्य कारण म्हणजे वानखेडे स्टेडियमवर अष्टपैलू खेळाडूचा उत्कृष्ट रेकॉर्ड आहे. त्याने या मैदानावर 16 सामन्यात 150+ च्या स्ट्राइक रेटने नऊ डावात 187 धावा केल्या आहेत. ब्राव्होने मुंबईत 21 विकेट घेतल्या आहेत. अशा परिस्थतीती ब्रावोला मुंबईवरील त्याचा रेकॉर्ड लक्षात घेता, मुंबई त्याला खरेदी करू इच्छित असेल.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)