IPL 2022, RCB vs PBKS: बेंगलोरविरुद्ध पंजाबची बल्ले-बल्ले; बेअरस्टो-लिविंगस्टोनची वादळी खेळी, भेदक गोलंदाजीने ‘रॉयल चॅलेंजर्स’चा केला घात
किंग्सच्या भेदक गोलंदाजीसमोर रॉयल चॅलेंजर्स 20 षटकांत 9 बाद 155 धावाच करू शकले, परिणामी संघाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे.
IPL 2022, RCB vs PBKS: पंजाब किंग्स (Punjab Kings) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) यांच्यातील आयपीएल (IPL) 2022 चा 60 वा सामना मुंबईच्या ब्रेबर्न स्टेडियमवर खेळला गेला. कर्णधार मयंक अग्रवालच्या नेतृत्वात पंजाबने या सामन्यात 54 धावांनी मोठा विजय मिळवला आणि प्लेऑफच्या शर्यतीत आपले आव्हान कायम ठेवले आहे. तसेच आरसीबी संघाला प्लेऑफ निश्चित करण्यासाठी प्रतीक्षा वाढली आहे. पंजाबने आरसीबीपुढे 210 धावांचे भव्य लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात किंग्सच्या भेदक गोलंदाजीसमोर रॉयल चॅलेंजर्स 20 षटकांत 9 बाद 155 धावाच करू शकले, परिणामी संघाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. यामुळे आता संघाच्या प्लेऑफच्या अपेक्षांनाही मोठा धक्का सहन करावा लागला आहे. बेंगलोरकडून ग्लेन मॅक्सवेलने (Glenn Maxwell) 36 आणि रजत पाटीदारने 25 धावांची खेळी केली. तसेच विराट कोहलीने 20 धावा केल्या. (IPL 2022, RCB vs PBKS: एक धाव घेताच Virat Kohli याची मोठी कामगिरी, आतापर्यंत IPL मध्ये कोणी नाही करू शकला अशी कमाल)
दुसरीकडे, जॉनी बेअरस्टो आणि लियाम लिविंगस्टोनच्या अर्धशतकी खेळीनंतर पंजाबच्या गोलंदाजांनी बेंगलोरच्या फलंदाजांवर जोरदार हल्ला चढवला व संघाच्या झोळीत महत्वपूर्ण विजय पाडला. कगिसो रबाडाने 4, ऋषी धवन आणि राहुल चाहर यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या. तर अर्षदीप सिंह आणि हरप्रीत ब्रारने 1-1 गाडी बाद करून ज्येष्ठ गोलंदाजांनी मोलाची साथ दिली. याशिवाय लियाम लिव्हिंगस्टनने फलंदाजीत मौल्यवान योगदान दिले. आणि 42 चेंडूत 70 धावा आणि जॉनी बेअरस्टोने 29 चेंडूत 66 धावा केल्या. त्याचवेळी बेंगलोरकडून हर्षल पटेलने 4 बळी घेतले. हसरंगाने 4 षटकात 15 धावा देत 2 गडी बाद केले तर, शाहबाज नदीम आणि ग्लेन मॅक्सवेलने प्रत्येकी एक विकेट घेतली. याशिवाय जोश हेझलवूड सर्वात महागडा ठरला. उजव्या हाताच्या गोलंदाजाने चार षटकांत 64 धावा दिल्या, जे लीगच्या इतिहासातील आरसीबी गोलंदाजाने दिलेले सर्वाधिक धावा आहेत.
या विजयासह पंजाब किंग्ज 11 सामन्यांतून 6 विजय आणि 12 गुणांसह सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. पण रॉयल चॅलेंजर्ससाठी प्लेऑफचा रस्ता कठीण झाला आहे. 13 सामन्यांतून 7 विजय आणि 14 गुणांसह संघ अजूनही चौथ्या स्थानावर कायम आहे मात्र, इतर संघांनी उर्वरित सामने जिंकल्यास RCB ला प्लेऑफमध्ये स्थान मिळवणे कठीण होऊ शकते.