IPL 2022, MI vs RCB: मुंबई इंडियन्ससमोर विजयपथावर परतण्याचे मोठे आव्हान, आता ‘या’ कमजोर खेळाडूंना बाहेर करून रुळावर येऊ शकते गाडी
तिन्ही सामन्यात पराभूत झाल्यामुळे त्यांना पुन्हा नव्याने सुरुवात करण्याच्या निर्धारित असतील. पण पाच वेळा माजी चॅम्पियन संघासाठी हे सर्व इतके सोप्पे ठरणार नाही. मुंबईला आपली गाडी विजयी रुळावर आणण्यासाठी त्यांच्या पराभवात कमजोर बाजू ठरलेल्या खेळाडूंना बाहेर करावे लागेल.
मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) यांच्यातील सामना पुणेच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहे. आरसीबीविरुद्धच्या (RCB) आयपीएल सामन्यात वैयक्तिक कामगिरीवर अवलंबून न राहता मुंबईला एक युनिट म्हणून कामगिरी करावी लागेल तरच संघ आपले खाते उघडून विजयपथावर परतू शकेल. यापूर्वी तिन्ही सामन्यात पराभूत झाल्यामुळे मुंबई इंडियन्सची हंगामाची सुरुवात खराब झाली. पण मुंबई आता हे पराभवाला मागे टाकून पुन्हा नव्याने सुरुवात करण्याच्या निर्धारित असतील. पण पाच वेळा माजी चॅम्पियन संघासाठी हे सर्व इतके सोप्पे ठरणार नाही. मुंबईला आपली गाडी विजयी रुळावर आणण्यासाठी त्यांच्या पराभवात कमजोर बाजू ठरलेल्या खेळाडूंना बाहेर करावे लागेल. (IPL 2022: रोहित शर्मा याच्या डावपेचांवर माजी प्रशिक्षकाने उचलले बोट, जसप्रीत बुमराह वरही केली मोठी टिप्पणी)
मुंबईच्या गेल्या दोन सामन्यात पराभवाचे मुख्य कारण बसिल थंपी (Basil Thampi) आणि मुरुगन अश्विन (Murugan Ashwin) ठरले. थंपीने दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात बॉलने चमकदार कामगिरी केली मात्र,पुढील दोन्ही सामन्यात तो महागडा ठरला. थंपीने राजस्थानविरुद्धच्या सामन्यात एक ओव्हर गोलंदाजी केली आणि 26 धावा दिल्या. त्यामुळे कर्णधार रोहित शर्माने त्याला पुन्हा चेंडू सोपवला नाही. त्यानंतर कोलकाताविरुद्ध देखील त्याने तीन षटक गोलंदाजी केली 15 धावा दिल्या. पण विकेट घेण्यात तो अपयशी ठरला. त्यामुळे मुंबईने जर थंपीब ला बेंचवर बसवण्याचा निर्णय घेतला तर त्याच्या जागी जयदेव उनाडकट एक उपयुक्त पर्याय ठरेल. दुसरीकडे, डॅनियल सॅम्स याने देखील शेवटच्या सामन्यात मुंबईकडून खराब गोलंदाजी केली. सॅम्सने केकेआरविरुद्ध तीन षटकांत एक विकेट घेतली, पण 50 धावा लुटल्या. यामध्ये 35 धावा त्याने शेवटच्या षटकांत दिल्या, ज्यामध्ये कोलकाताचा स्टार पॅट कमिन्स याने जोरदार फटकेबाजी करून सामन्याचा निकाल बदलला. त्यामुळे सॅम्स याच्या जागी मुंबई बेंगलोरविरुद्ध रिले मेरेडिथ याला आपले कौशल्य दाखवण्याची संधी दिल्यास आश्चर्य वाटू नये. अशाप्रकारे मुंबई या दोन कमजोर बाजू ठरलेल्या खेळाडूंना बाहेर करून विजयपथावर परतण्याचा प्रयत्न करू शकतात.
दुसरीकडे, तिन्ही सामने गमावूनही काही खेळाडूंनी वैयक्तिकरित्या चांगली कामगिरी केली आहे. ईशान किशनने सलामीला येऊन 81, 54 आणि 14 धावा केल्या आहेत, तर युवा तिलक वर्माने (22, 61, 38) मधल्या फळीत छाप पाडली आहे. तसेच डेवाल्ड ब्रेविस आणि फिट सूर्यकुमार यादव संघात परतल्याने मुंबई इंडियन्सची फलंदाजी मजबूत झाली आहे. गेल्या सामन्यात पाच चेंडूत नाबाद 22 धावांची खेळी करणारा किरॉन पोलार्ड कोणत्याही प्रतिस्पर्ध्याच्या गोलंदाजीला धोका ठरू शकतो. मुंबईची फलंदाजी काही प्रमाणात ठीक आहे, पण संघाला सुधार करण्याची नक्कीच गरज आहे. बासिल थापी आणि अश्विन या देशांतर्गत गोलंदाजांना सुधारण्याची गरज आहे, तर संघाचे परदेशी गोलंदाज डॅनियल सॅम्स चिंतेची बाब बनला आहे.