IPL 2022: ‘या’ भारतीय सुपरस्टार्सचा आयपीएलच्या सुरुवातीलाच संघर्ष, फ्रँचायझीच नव्हे तर चाहत्यांचाही होतोय अपेक्षा भंग

अनेक अपेक्षित खेळाडू त्यांच्या पूर्ण क्षमतेने कामगिरी करत असताना नवोदित तारेही या निमित्ताने उदयास येत आहेत. तथापि, दुर्दैवाने काही खेळाडूंसाठी, हे मागील आठवडे खूप निराशाजनक राहिले. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी विश्वचषक 2022 साठी भारतीय सेटअपचा बहुधा भाग असणाऱ्या या भारतीय खेळाडूंनी सुरुवातीलाच निराश केले आहे.

रोहित शर्मा व विराट कोहली (Photo Credit: PTI)

IPL 2022: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 15 व्या हंगामाची जोरदार सुरुवात झाली आहे. गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स हे दोन नवीन संघ जेतेपदाची शर्यतीत उतरल्याने लढत आणखी मनोरंजक बनली आहे. तर केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित व्हेन्यू असल्याने ठिकाणे ओळखणारे संघ फलंदाजांच्या खूप अनुकूल आहेत, तथापि, गोलंदाजही परिस्थितीशी जुळवून घेण्यात मागे राहिलेले नाही. अनेक अपेक्षित खेळाडू त्यांच्या पूर्ण क्षमतेने कामगिरी करत असताना नवोदित तारेही या निमित्ताने उदयास येत आहेत. तथापि, दुर्दैवाने काही खेळाडूंसाठी, हे मागील आठवडे खूप निराशाजनक राहिले. त्यांना फ्लॉप शो नक्कीच म्हणणार नाही, पण ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषक 2022 (T20 World Cup) साठी भारतीय सेटअपचा बहुधा भाग असणाऱ्या या भारतीय खेळाडूंनी सुरुवातीलाच निराश केले आहे. आतापर्यंत कमी कामगिरी करणाऱ्या भारतीय स्टार्सची नावे खालीलप्रमाणे आहे. (IPL 2022: ‘मिस्टर 360’ चे आयपीएलवर गारूड, आकाशाला गवसणी घालणारे फटके खेळत गोलंदाजांची धुलाई)

1. रवींद्र जडेजा - चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings)

चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) नवा कर्णधार रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे आणि आयपीएल सुरू होण्यापूर्वी त्याची एक झलकही पाहायला मिळाली. तथापि, अष्टपैलू खेळाडूच्या नेतृत्वात संघाने आतापर्यंत त्यांचे सर्व तीन सामने गमावले आहेत. त्‍याच्‍या फॉर्मबद्दल बोलायचे तर तीन सामन्यात त्‍याने केवळ 43 धावा केल्या असून त्याने आतापर्यंत फक्त एक विकेट घेतली आहे आणि 80 धावा दिल्या आहेत.

2. रोहित शर्मा - मुंबई इंडियन्स (Mumbai Indians)

चांगली कामगिरी न करणारा दुसरा चॅम्पियन संघ म्हणजे मुंबई इंडियन्स. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वातील संघाने देखील चेन्नईप्रमाणे आतापर्यंत खेळलेले तीनही सामने गमावले आहेत. पण वैयक्तिक रित्या ‘हिटमॅन’ने आतापर्यंत 54 धावा केल्या आहेत आणि 41 त्याच्या सर्वोच्च धावसंख्या आहेत.

3. ऋषभ पंत - दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals)

दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत (Rishabh Pant) याच्या दिल्ली कॅपिटल्सने आतापर्यंत तीन सामन्यांपैकी दोन गेम गमावले आणि फक्त एक जिंकला आहे. यादरम्यान युवा कर्णधाराने त्याने 83 धावा केल्या असून 43 त्याच्या सर्वोच्च ठरली आहेत.

4. विराट कोहली - रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challenges Bangalore)

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) अजूनही चांगल्या फॉर्मच्या शोधात आहे. आतापर्यंत खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांमध्ये भारताच्या माजी कर्णधाराने 58 धावा केल्या आहेत, ज्यात नाबाद 41 त्याच्या सर्वोच्च धावा आहेत.

5. श्रेयस अय्यर - कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders)

कोलकाता नाईट रायडर्स संघ सध्या आयपीएलच्या गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. केकेआरचा नवनियुक्त कर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याने आपल्या शानदार नेतृत्व कौशल्याची झलक दाखवली आहे. पण बॅटने अजून फारसे योगदान देऊ शकलेला नाही. श्रेयसने चार सामन्यात 69 धावा केल्या आहेत.