IPL 2022: रवी शास्त्री यांची मोठी भविष्यवाणी, म्हणाले - IPL ला मिळणार नवा चॅम्पियन; RCB च्या प्लेऑफमध्ये पोहोचण्यावर केले मोठे विधान
या मोसमात संघातील विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, फाफ डू प्लेसिस, दिनेश कार्तिक, जोश हेझलवूड, हर्षल पटेल आदी खेळाडूंसह आरसीबीने हंगामाची सुरुवात खात्रीशीर पद्धतीने केली आहे.
आयपीएल (IPL) 2022 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघ खूप मजबूत दिसत आहे. पाच सामन्यांत तीन सामने जिंकून संघ गुणतालिकेत 6 गुणांसह सहाव्या क्रमांकावर आहे. नवीन कर्णधार फाफ डु प्लेसिसच्या (Faf du Plessis) नेतृत्वाखालील आरसीबीने (RCB) आतापर्यंत दोन सामने गमावले आहेत. बेंगलोरचा पुढील सामना शनिवारी दिल्ली कॅपिटल्स संघाशी वानखेडे स्टेडियमवर सुरु आहे. य्प्युर्वी यंदाच्या मोसमात बेंगलोर प्लेऑफमध्ये स्थान निश्चित करेल असा विश्वास भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी व्यक्त केला असून त्यांनी फाफच्या नेतृत्वाचेही कौतुक केले आहे. डु प्लेसिस, विराट कोहली आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्या सारखे अनुभवी खेळाडू या हंगामात फ्रँचायझीसाठी महत्त्वाची भूमिका बजावतील, असेही शास्त्री म्हणाले. (MS Dhoni याच्या अनुपस्थितीत ‘हा’ बनू शकतो टीम इंडियाचा फिनिशर, 36 वर्षीय खेळाडूला माजी भारतीय प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी दिला पाठिंबा)
स्टार स्पोर्ट्सवरील क्रिकेट लाइव्हवर बोलताना शास्त्री म्हणाले, “मला खात्री आहे की या हंगामात आपल्याला एक नवीन चॅम्पियन पाहायला मिळेल. या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर योग्य दिशेने आहे आणि ते निश्चितपणे प्लेऑफमध्ये पोहोचणार आहेत. स्पर्धा जसजशी पुढे सरकत जाईल तसतसे चांगले होत आहेत. ते चांगल्या लयीत असल्याचे दिसते आहे. तो प्रत्येक खेळात अधिक चांगला होत आहेत.” शास्त्री पुढे म्हणाले, “विराट चांगली कामगिरी करत आहे, ग्लेन मॅक्सवेल संघात परतला आहे आणि तो बॅटने किती धोकादायक असू शकतो हे आपल्या सर्वांना माहीत आहे. तो फिरकीपटूंना खेळण्यास चांगला सक्षम आहे आणि स्पर्धा पुढे जात असताना आरसीबीच्या दृष्टिकोनातून तो महत्त्वाचा ठरेल. आणि मग, फाफला त्यांचा नेता म्हणून ठेवणे हा त्यांच्यासाठी मोठा बोनस आहे.”
लक्षणीय आहे की प्लेऑफ पात्रतेच्या बाबतीत RCB संघाचा मागील 4-5 हंगामातील सर्वोत्तम रेकॉर्ड नाहीत. गेल्या 5 मोहिमांमध्ये बेंगलोर फ्रेंचाइजी फक्त दोन वेळा दुसरी फेरी गाठू शकली आहे. भारतीय संघात दीर्घकाळ कोहलीसोबत काम करणारे शास्त्री या हंगामात आरसीबीच्या माजी कर्णधाराच्या कामगिरीवर समाधानी दिसले. ग्लेन मॅक्सवेल देखील संघात परतल्यामुळे, भारताच्या माजी अष्टपैलू खेळाडूने या हंगामात फ्रँचायझीच्या क्षमतेवर भरपूर विश्वास व्यक्त केला.