IPL 2022, MI vs RCB: मुंबई इंडियन्स सावधान; बेंगलोरचा ‘हा’ तडाखेबाज गोलंदाज गेल्या दोन सामन्यात दिग्गज खेळाडूंना एकटा पुरून उरला आहे!

पुणेच्या MCA स्टेडीयमवर हा सामना खेळला जाणार आहे. आरसीबीविरुद्ध सामना मुंबईसाठी आव्हनापेक्षा कमी नाही. गेल्या वर्षी भारत आणि UAE येथे झालेल्या मुंबईला एक गोलंदाज चांगलाच नडला होता. इतकंच नाही तर आरसीबीच्या या धाकड गोलंदाजाने मुंबईविरुद्ध आपली पहिली हॅटट्रिकही घेतली.

मुंबई इंडियन्स (Photo Credit: PTI)

IPL 2022, MI vs RCB: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर  (Royal Challengers Bangalore) आयपीएलच्या (IPL) 18 व्या सामन्यात आमनेसामने येणार आहेत. पुणेच्या MCA स्टेडीयमवर हा सामना खेळला जाणार आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma( नेतृत्वातील मुंबईने सलग तीन सामने गमावून स्पर्धेची सुरुवात खराब केली. तर आरसीबी  (RCB) संघाने आतापर्यंत तीनपैकी दोन सामने जिंकले आहेत. त्यामुळे मुंबई आजच्या सामन्यातूनही विजयपथावर पोहचू शकणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असेल. यापूर्वी देखील आयपीएलमध्ये मुंबई संघाने अडखळत सुरुवात केली आहे, पण नंतर त्यांची गाडी रुळावर परतली आहे. तथापि आरसीबीविरुद्धचा सामना मुंबईसाठी अग्निपरिक्षे सारखा असेल. गेल्या वर्षी भारत आणि UAE येथे झालेल्या मुंबईला एक गोलंदाज चांगलाच नडला होता. इतकंच नाही तर आरसीबीच्या या धाकड गोलंदाजाने मुंबईविरुद्ध आपली पहिली हॅटट्रिकही घेतली. (IPL 2022, MI vs RCB: मुंबई इंडियन्ससमोर विजयपथावर परतण्याचे मोठे आव्हान, आता ‘या’ कमजोर खेळाडूंना बाहेर करून रुळावर येऊ शकते गाडी)

मुंबईच्या धुरंधर फलंदाजांवर गेल्या हंगामात बेंगलोरचा हर्षल पटेल (Harshal Patel) एकटाच पुरून उरला होता. आणि तो पुन्हा एकदा मुंबईच्या फलंदाजांवर भारी पडण्याच्या तयारीत असेल. गेल्या दोन्ही सामन्यात मुंबईला बेंगलोरकडून निराशाजनक पराभवाचे तोंड पाहावे लागले होते. यामध्ये हर्षल पटेलने पहिले 4 गडी बाद केले तर युएई येथे हॅटट्रिक घेऊन मुंबईच्या फलंदाजांना गुडघे टेकण्यास भाग पाडले होते. अशा परिस्थितीत मुंबईला हर्षलपासून सावध राहण्याची गरज आहे. कारण रोहितच्या ‘पलटन’ने जर हर्षलला हलक्यात घेतले तर ते त्यांनाच महागात पडेल. तसेच मुंबईच्या फलंदाजांचा संघर्ष सुरु असताना हर्षलला साथ देण्यासाठी आकाश दीप देखील आपला वेगवान हल्ला करण्यासाठी सज्ज असेल.

दरम्यान, मुंबई इंडियन्स संघाच्या विजयासाठी त्यांचा कर्णधार रोहित शर्माने काही धावा करणेही महत्त्वाचे आहे. आतापर्यंत रोहितने तीन सामन्यांत 41, 10 आणि तीन धावाच केल्या आहेत. तसेच त्यांच्या गोलंदाजांनाही सुधार करण्याची गरज आहे. मुंबईचा संघ प्रथम दिल्ली कॅपिटल्सकडून चार विकेट्सने पराभूत झाला, त्यानंतर राजस्थान रॉयल्सने त्यांना 23 धावांनी धूळ चारली आणि नंतर कोलकाता नाईट रायडर्सने त्यांचा पाच विकेट्सने पराभव केला.