IPL 2022, MI vs LSG: क्विंटन डी कॉक करणार पलटवार की रोहितची आर्मी मारणार बाजी? मुंबई विरुद्ध लखनऊच्या लढतीत ‘या’ खेळाडूंवर असणार नजर

IPL 2022, MI vs LSG: मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात आयपीएल डबल हेडरचा पहिला सामना शनिवारी होणार आहे. कर्णधार म्हणून केएल राहुलसमोर अनुभवी रोहित शर्मा याचे आव्हान असेल, पण मुंबईसमोर पहिल्या विजयासाठी तगडे आव्हान असणार आहे. मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्सच्या सामन्यात खालील खेळाडूंवर नजर असणार आहे.

क्विंटन डी कॉक, मुंबई इंडियन्स (Photo Credit: PTI)

IPL 2022, MI vs LSG: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि लखनौ सुपर जायंट्स  (Lucknow Super Giants) यांच्यात आयपीएल (IPL) डबल हेडरचा पहिला सामना शनिवारी होणार आहे. कर्णधार म्हणून केएल राहुल (KL Rahul) समोर अनुभवी रोहित शर्मा (Rohit Sharma) याचे आव्हान असेल, पण आतापर्यंतचा हा मोसम रोहित आणि मुंबईसाठी चांगला ठरलेला नाही. रोहित शर्मा स्वत: फॉर्ममध्ये दिसत नाही आणि त्याचा संघही हंगामातील पहिल्या विजयासाठी संघर्ष करत आहे. सलग पाच सामने हरल्यानंतर मुंबई इंडियन्स लखनऊ विरोधात मैदानात उतरणार आहे. दुसरीकडे, लखनौ सुपर जायंट्स संघाने 5 सामने खेळले, त्यापैकी 3 जिंकले आहेत. अशा परिस्थितीत मुंबईसमोर पहिल्या विजयासाठी तगडे आव्हान असणार आहे. मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्सच्या सामन्यात खालील खेळाडूंवर नजर असणार आहे. (MI IPL 2022: मुंबई इंडियन्सचे सर्व दिग्गज फ्लॉप, ‘Arjun Tendulkar याला संघात आणण्याची हीच वेळ’; MI च्या फोटोमुळे नेटकऱ्यांच्या मागणीने धरला जोर)

1. क्विंटन डी कॉक (Quinton de Kock)

मुंबई इंडियन्ससाठी अनेक सामने जिंकणारा डी कॉक मुंबई इंडियन्ससमोर डोंगरासारखा उभा राहणार असून, त्यांना पराभूत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल. मुंबई इंडियन्सचा आतापर्यंतचा हंगाम कठीण गेला आहे, आणि डी कॉक त्याच्यात आणखी भर घालण्यासाठी नक्कीच महत्वपूर्ण भूमिका बजावेल.

2. आयुष बडोनी (Ayush Badoni)

युवा बडोनीने या मोसमात छाप पाडली आहे. त्याने येताच मोठे फटके खेळण्यात पटाईत असल्याचं दाखवून दिलं आहे. मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, टायटल मिल्स आदींसमोर बडोनी कसा खेळतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. बडोनीने आतापर्यंत 5 सामन्यात 107 धावा केल्या असून 54 ही त्याची सर्वाधिक धावसंख्या आहेत.

3. ईशान किशन (Ishan Kishan)

मागील सामन्यात 3 धावा करून बाद झालेल्या किशनने सुरुवातीच्या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली होती, मात्र आता त्याने लय गमावल्याचे दिसत आहे. तो एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळाडू आहे आणि त्याची आक्रमण शैली संघासाठी महत्त्वाची आहे, परंतु 15.50 कोटींचा खेळाडू लखनौविरुद्ध कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष असेल.

4. बसिल थंपी (Basil Thampi)

गेल्या पाच सामन्यातील कामगिरीच्या आधारे थंपीला संधी दिली जाणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागून असेल. आतापर्यंत झालेल्या सर्व सामन्यांमध्ये मुंबईच्या फलंदाजीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून गोलंदाजांनाही चांगला संघर्ष करावा लागला आहे. संघाला जिंकायचे असेल तर फलंदाजी अधिक मजबूत करण्याची गरज आहे. अशा परिस्थितीत गोलंदाजाऐवजी टिम डेविड याचा प्लेइंग 11 मध्ये समावेश करणे योग्य पर्याय ठरेल.

5. लखनौचे गोलंदाज

मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांचा फ्लॉप शो आतापर्यंत मुंबईच्या पराभवाचे कारण बनला आहे. अशास्थितीत मुंबईचे फलंदाज आता अटीतटीच्या स्थितीत लखनौच्या घातक गोलंदाजांचा सामना कसे करतील हे पाहणे मनोरंजक ठरेल. त्यामुळे आवेश खान, जेसन होल्डर, रवी बिश्नोई आणि इतर गोलंदाज मुंबईच्या फलंदाजी क्रमापुढे कशी गोलंदाजी करतात याकडे सर्वांचे लक्ष असेल, कारण मुंबई सध्या जखमी सिंहासारखी आहे, जी कधीही पलटवार करू शकते.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now