IPL 2022, MI vs KKR Match 14: कोलकाताचा 5 गडी राखून मुंबई संघाला पराभवाचा तिहेरी फटका, पॅट कमिन्सने एका षटकात लुटल्या 35 धावा

कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या नुकत्याच सामन्यात आलेल्या संयत सामन्यात मुंबईला 5 विकेटांनी पराभवाचा सामना करावा लागला. मुंबईचा चालू हंगामातील हा सलग तिसरा पराभव ठरला आहे.

पॅट कमिन्स (Photo Credit: PTI)

IPL 2022, MI vs KKR Match 14: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 15 मध्ये मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) सुरुवात अत्यंत खराब झाली आहे. कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) विरुद्धच्या नुकत्याच सामन्यात झालेल्या सामन्यात मुंबईला 5 विकेटांनी पराभवाचा सामना करावा लागला. मुंबईचा चालू हंगामातील हा सलग तिसरा पराभव ठरला आहे. यापूर्वी त्यांनी दिल्ली आणि राजस्थानकडूनही मात खाल्ली आहे. सलामीवीर वेंकटेश अय्यर  (Venkatesh Iyer) आणि गोलंदाजी अष्टपैलू पॅट कमिन्स (Pat Cummins) संघाच्या विजयाचे नायक ठरले. अय्यरने नाबाद 50 धावा ठोकल्या तर कमिन्सने धुव्वाधार 56 धावांच्या नाबाद खेळीने संघाला विजयीरेष ओलांडून दिली. केकेआरचा अष्टपैलू खेळाडू पॅट कमिन्सने एका षटकात 35 धावा देत 16 षटकांत सामना संपवला. दुसरीकडे, फलंदाजीनंतर गचाळ क्षेत्ररक्षणाने मुंबईचा घात केला. मुंबईकडून टायटल मिल्स आणि मुरुगन अश्विन यांनी सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. तर डॅनियल सॅम्सने एक गडी बाद केला.

या सामन्यात मुंबई इंडियन्सने केकेआरसमोर विजयासाठी 162 धावांचे लक्ष्य ठेवले होते. मुंबईच्या संघाने निर्धारित 20 षटकांत 4 गडी गमावून 161 धावांपर्यंत मजल मारली. अशा परिस्थितीत 162 धावांच्या प्रत्युत्तरात वेंकटेश अय्यरसह अजिंक्य रहाणेने केकेआरच्या डावाची सुरुवात केली. मात्र, रहाणे 7 धावा करून बाद झाला. तर कर्णधार श्रेयस अय्यरही लवकर 10 धावा करून बाद झाला. सॅम बिलिंग्ज 17 आणि नितीश राणा अवघ्या 8 धावा करून झटपट बाद झाले. त्यानंतर आंद्रे रसेल 11 धावा केल्या. तर कमिन्स 15 चेंडूत 56 धावा आणि अय्यरने 41 चेंडूत 50 धावा करून नाबाद परतले.

या सामन्यात कोलकाता संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अशा परिस्थितीत मुंबई इंडियन्स प्रथम फलंदाजीसाठी उतरली. कर्णधार रोहित शर्माला उमेश यादवने अवघ्या 3 धावांवर बाद झाला आणि पॉवरप्ले मध्ये मुंबईने 1 बाद 35 धावा केल्या. त्यानंतर मुंबईला 29 धावांवर डेवाल्ड ब्रेविसच्या रूपात दुसरा धक्का बसला. तसेच ईशान किशन 21 चेंडूत 14 धावा करू शकला. मात्र अंतिम षटकांत सूर्यकुमार यादव 52 धावा आणि तिलक वर्मा यांनी 38 धावा तर किरॉन पोलार्ड यांनी 22 धावांची छोटेखानी योगदान देऊन संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले.