IPL 2022, MI vs GT: गुजरात टायटन्सची प्लेऑफच्या तिकिटावर नजर, मुंबई इंडियन्सचे ‘हे’ 11 धुरंधर करतील खेळ खराब
मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर हा सामना खेळला जाईल. मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडली असल्यामुळे आता ते गुजरातचा खेळ खराब करण्यासाठी पूर्ण जोर लावतील. आजच्या सामन्यासाठी मुंबई त्यांच्या विजयी संयोजनात बदल करण्याची कमीच शक्यता आहे.
IPL 2022, MI vs GT Match 51: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2022 चा 51 वा सामना शुक्रवारी गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात होणार आहे. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता सामना सुरू होईल. आयपीएलमध्ये (IPL) दोन्ही संघ आमनेसामने येण्याची ही पहिलीच वेळ आहे. हार्दिक पांड्याचा (Hardik Pandya) गुजरात संघ सध्या आयपीएलचा सर्वात यशस्वी संघ ठरला आहे. मुंबईविरुद्ध गुजरातच्या नजरा सामना जिंकून प्लेऑफचे पहिले तिकीट मिळवण्याकडे असेल, तर प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेली मुंबई त्यांचा खेळ खराब करण्याच्या प्रयत्नात असेल. गुजरातला पंजाब किंग्जकडून गेल्या सामन्यात आठ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागल्याने त्यांची पाच सामन्यांची विजयी मालिका खंडित झाली. तर मुंबईने राजस्थान रॉयल्सवर विजय मिळवून विजयाचा श्रीगणेश केला. (IPL 2022: पहिल्या विजयाची चव चाखलेल्या मुंबई इंडियन्सला तगडा झटका; Tymal Mills उर्वरित सामन्यातून ‘आऊट’, 21 वर्षीय दक्षिण आफ्रिकी खेळाडूशी केला करार)
गुजरातने स्पर्धेत आतापर्यंत 10 सामने खेळले असून 8 जिंकले आहेत. 16 गुणांसह गुजरात सध्या गुणतालिकेत नंबर 1 सिंहासनावर विराजमान आहेत. दुसरीकडे, मुंबईने आतापर्यंत 9 सामने खेळले आहेत आणि फक्त 1 सामना जिंकून तळाशी 10व्या क्रमणकवर आहेत. मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडली असल्यामुळे आता ते गुजरातचा खेळ खराब करण्यासाठी पूर्ण जोर लावतील. आजच्या सामन्यासाठी मुंबई त्यांच्या विजयी संयोजनात बदल करण्याची कमीच शक्यता आहे. सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा मुंबईचे स्टार फलंदाज ठरले आहे अन्यथा फलंदाजीत सुसूत्रतेचा अभाव राहिला आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि ईशान किशनचा खराब फॉर्म स्पर्धेत कायम आहे, तर किरॉन पोलार्डला आतापर्यंतच्या हंगामातील त्याच्या 'फिनिशर' भूमिकेला न्याय देता आलेला नाही.
गोलंदाजीत मुंबईचा संघ आपल्या सर्वोत्तम कामगिरीच्या जवळ दिसत नाही. जसप्रीत बुमराह किफायतशीर असला तरी तो विकेट घेऊ शकलेला नाही जो संघाला सर्वात मोठा फटका बसला आहे. डॅनियल सॅम्स आणि रिले मेरिडिथ यांनी मधल्या काळात चांगली कामगिरी केली मात्र, मुंबईकडे बुमराहशिवाय कोणताही विश्वसनीय गोलंदाज नाही. याशिवाय आता उर्वरित सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्स इतर संघांची समीकरणे बिघडवण्याचा प्रयत्न करेल.
मुंबई इंडियन्स संभाव्य प्लेइंग 11: रोहित शर्मा (कॅप्टन), ईशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, किरॉन पोलार्ड, डॅनियल सॅम्स, हृतिक शोकीन, जसप्रीत बुमराह, रिले मेरेडिथ आणि कुमार कार्तिकेय.