IPL 2022, MI vs CSK: मुंबई इंडियन्सचा पराभवाचा सिलसिला कायम, चेन्नईच्या 3 विकेट्सने दमदार विजयामुळे ‘पलटन’साठी प्लेऑफचे दरवाजे बंद

चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात मुंबईला लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. यामुळे रोहित शर्माच्या नेतृत्वातील ‘पलटन’साठी प्लेऑफचे दरवाजे बंद झाले आहेत. तसेच सीएसकेने आपली आगेकूच सुरूच ठेवली आहे.

एमएस धोनी-रवींद्र जडेजा (Photo Credit: PTI)

IPL 2022, MI vs CSK: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 15 व्या हंगामात मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाच्या पराभवाचा सिलसिला कायम आहे. चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) विरुद्धच्या सामन्यात मुंबईला लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. यामुळे रोहित शर्माच्या नेतृत्वातील ‘पलटन’साठी प्लेऑफचे दरवाजे बंद झाले आहेत. तसेच सीएसकेने आपली आगेकूच सुरूच ठेवली आहे. मुंबईने पहिले फलंदाजी करून तिलक वर्माचे नाबाद अर्धशतक आणि जयदेव उनाडकटच्या मोक्याच्या क्षणी फटकेबाजीच्या जोरावर 155 धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरात सीएसकेने 7 विकेट गमावून अखेरच्या षटकांत विजयीरेष ओलांडली आणि महत्वपूर्ण दोन गुणांची कमाई केली. धोनी 28 धावा करून नाबाद परतला.  लक्षणीय आहे की मुंबईने यंदाच्या हंगामात विजयाच्या जवळ येऊन सामने गमावले आहेत. (Most Ducks in IPL: मुंबई इंडियन्स कर्णधार Rohit Sharma याचा नकोसा विक्रम, आयपीएल इतिहासात सर्वाधिक वेळा ‘गोल्डन डक’चा पडला बळी)

मुंबईने दिलेल्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्जची सुरुवात खराब झाली. पण उथप्पा आणि रायुडू यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी 50 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारीने संघाचा डाव स्थिरावला. रुतुराज गायकवाड खाते न उघडताच बाद झाला. तर मिचेल सँटनरने 11 धावा केल्या. यानंतर सॅम्सने नियमित अंतराने विकेट घेत चेन्नईच्या फलंदाजांवर दडपण आणले. चेन्नईचा कर्णधार रवींद्र जडेजा पुन्हा एकदा बॅटने अपयशी ठरला. जडेजा अवघ्या तीन धावाच करू शकला. शेवटच्या षटकांत CSK ला 17 धावांची गरज असताना उनाडकटने पहिल्या बॉलवर प्रिटोरियसला 22 धावांवर पायचीत पकडले. तथापि धोनीने स्टाईलमध्ये सामना फिरवला आणि आपल्या जुन्या शैलीत चेन्नईच्या झोळीत दुसरा विजय पाडला. दुसऱ्या चेंडूवर ब्रावोने एकच धाव घेतली. तर धोनीने तिसऱ्या चेंडूवर षटकार आणि चौथ्या चेंडूवर चौकार खेचला. धोनीने पाचव्या चेंडूवर दोन धावा घेतल्या. चेन्नईला विजयासाठी शेवटच्या चेंडूवर चार धावांची गरज असताना धोनीने चौकार मारून संघाला हंगामातील दुसरा विजय मिळवून दिला. यासह मुंबईने हंगातील सलग सातवा सामना गमावला आहे.

तिलक वर्मा पाठोपाठ डॅनियम सॅम्स याने बॉलने शर्थीचे प्रयत्न केले, पण अन्य खेळाडूंची साथ न मिळाल्याने मुंबईचा सलग सातवा पराभव पत्करावा लागला आहे. सॅम्सने आपल्या चार शटर 30 धावा देऊन चार विकेट घेतल्या. तर सुरुवातीला संघ अडचणीत असताना वर्माने 51 धावांची नाबाद केली केली. मुंबई इंडियन्सचे फलंदाज आजच्या सामन्यात देखील धराशाही झाले. रोहित शर्मा आणि ईशान किशन खातेही उघडू शकले नाही तर डेवाल्ड ब्रेविस चार धावाच करू शकला. पॉवरप्लेमध्ये तीन विकेट्स गमावल्यानंतर सूर्यकुमार यादवने 32 धावांची खेळी करून मुंबईचा मोर्चा सांभाळला, पण 8 व्या षटकात सँटनरने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. मुंबईकडून तिलक वर्माने 51 धावांची नाबाद खेळी खेळून संघाला 155 धावांपर्यंत मजल मारून दिली. तसेच चेन्नईकडून मुकेश चौधरीने तीन आणि ड्वेन ब्रावोने दोन गडी बाद केले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif