IPL 2022, LSG vs CSK Match 7: लखनऊने उघडलं विजयाचं खातं, क्विंटन डी कॉक-एविन लुईस चमकदार कामगिरी; जडेजाच्या सुपर किंग्सला सलग दुसरा पराभवाचा धक्का
IPL 2022, LSG vs CSK Match 7: इंडियन प्रीमियर लीगच्या 15 व्या हंगामातील सातव्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स संघाने स्पर्धेत आपल्या विजयाचे खाते उघडलं आहे. चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या सामन्यात 211 धावांचा पाठलाग करताना लखनऊने 6 गडी राखून 19.3 षटकांत दमदार विजयाची नोंद केली. नवीन कर्णधार रवींद्र जडेजा याच्या नेतृत्वात चेन्नईचा हा सलग दुसरा पराभव ठरला आहे.
IPL 2022, LSG vs CSK Match 7: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 15 व्या हंगामातील सातव्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) संघाने स्पर्धेत आपल्या विजयाचे खाते उघडलं आहे. चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) विरुद्धच्या सामन्यात 211 धावांचा पाठलाग करताना लखनऊने 6 गडी राखून 19.3 षटकांत दमदार विजयाची नोंद केली. नवीन कर्णधार रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याच्या नेतृत्वात चेन्नईचा हा सलग दुसरा पराभव ठरला आहे. लखनऊच्या रोमांचक विजयात सलामीवीर क्विंटन डी कॉक (Quinton de Kock) आणि एविन लुईस (Evin Lewis) यांनी निर्णायक भूमिका बजावली. डी कॉकने पहिले 98 धावांची सलामी भागीदारीत मोठे योगदान दिले आणि सर्वाधिक 61 धावा ठोकल्या. तर लुईसने चेंडूत नाबाद 55 धावा करून संघाच्या झोळीत पहिला विजय पाडला. लखनऊसाठी कर्णधार केएल राहुलने 40 तर दीपक हुडाने 13 धावांचे योगदान दिले. तसेच अनुज बदोनी 18 धावा करून नाबाद राहिला. (IPL 2022, LSG vs CSK: ड्वेन ब्रावो याने इतिहास घडवला, दिग्गज गोलंदाजाच्या एक पाऊल पुढे जाऊन IPL चा बनला नंबर 1 गोलंदाज)
चेन्नईने दिलेल्या डोंगराएवढ्या 211 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना डी कॉक आणि राहुलच्या सलामी जोडीने लखनऊला ‘दमदार’ सुरुवात करून दिली. दोघांनी लखनऊची धावसंख्या 10 षटकात 98 धावांपर्यंत नेली. पण प्रिटोरियसच्या गोलंदाजीवर अंबाती रायुडूने राहुलचा 40 धावांवर झेल घेतला आणि लखनऊला पहिला झटका बसला. राहुल पाठोपाठ मनीष पांडे 5 धावा करून झटपट बाद झाला. यादरम्यान डी कॉकने लौकीकाला साजेसा खेळ केला आणि 34 चेंडूत अर्धशतक झळकावत चेन्नई गोलंदाजांवर दबाव आणला. लखनऊ संघ विजयाच्या जवळ पोहोचला असताना प्रिटोरियसच्या गोलंदाजीवर चेन्नईला डी कॉकची मोठी विकेट मिळाली. डी कॉक बाद झाल्यावरही लुईसने धावफलक हलता ठेवला. लखनऊने शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जिंकण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला. दीपक हुडा देखील 8 चेंडूत 13 धावांचे छोटेखानी योगदान देऊन माघारी परतला. पण लुईस एक बाजून मोर्चा सांभाळून खेळत राहिला आणि आयुष बदोनीच्या साथीने संघाला झोळीत पहिला विजय पाडला. चेन्नईसाठी ड्वेन प्रिटोरियस याने दोन विकेट घेतल्या आणि ड्वेन ब्रावो व तुषार देशपांडे यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
यापूर्वी नाणेफेक गमावून फलंदाजीला आलेल्या चेन्नईसाठी रॉबिन उथप्पाने 50 आणि शिवम दुबेने 49 धावा केल्या. तसेच रायुडूने 27, रवींद्र जडेजाने 17. तसेच मोईन अलीने 22 चेंडूत 35 धावांची शानदार खेळी खेळली आणि माजी कर्णधार एमएस धोनीने 6 चेंडूत नाबाद 16 धावा केल्या. दुसरीकडे, लखनऊकडून आवेश खान, अँड्र्यू टाय आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी 2-2 बळी घेतले.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)