IPL 2022, KKR vs GT: गुजरातचा 8 धावांनी दिमाखदार विजय; 157 धावांचे लक्ष्य गाठताना कोलकात्याच्या नाकात दम, रसेल मॅजिक अयशस्वी
IPL 2022, KKR vs GT: गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील आयपीएलचा 35 वा सामना नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात गुजरातने 8 धावांनी दिमाखात विजय मिळवला आणि आयपीएलमधील आपल्या विजयरथ सुरु ठेवला. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात संघाचा सात सामन्यातील हा सहावा विजय ठरला आहे. यासह गुजरातने पॉईंट टेबलमध्ये अव्वल स्थान गाठले आहे.
IPL 2022, KKR vs GT: गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यातील आयपीएलचा (IPL) 35 वा सामना नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात गुजरातने 8 धावांनी दिमाखात विजय मिळवला आणि आयपीएलमधील आपल्या विजयरथ सुरु ठेवला. हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वातील गुजरात संघाचा सात सामन्यातील हा सहावा विजय ठरला आहे. तर केकेआर संघाला खेळलेल्या 8 सामन्यातील पाचवा पराभवाचा सामना करावा लागला आहे. गुजरातने प्रथम फलंदाजी करून 156 धावांची सन्मानजनक धावसंख्या गाठली होती, प्रत्युयय्रात गुजरातच्या गोलंदाजांनी कोलकता फलंदाजांचा चांगलाच घाम फोडला आणि संघाच्या झोळीत सहावा विजय पाडला. कर्णधार हार्दिक आणि गोलंदाज गुजरातच्या विजयाचे शिल्पकार ठरले. हार्दिकने सर्वाधिक 67 धावा केल्या. तर मोहम्मद शमी, यश दयाल आणि राशिद खान यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. (Andre Russell Scripts History: आंद्रे रसेलची कमाल कामगिरी, एकाच षटकात 4 विकेट घेत IPL इतिहासाला दिली कलाटणी)
गुजरातने दिलेल्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाता संघाचे आघाडीचे चार फलंदाज स्वस्तात बाद झाले. सॅम बिलिंग्स आणि सुनील नारायण यांची नवीन सलामी जोडी कोलकातासाठी काही कमाल करू शकली नाही. बिलिंग्स 4 तर नारायण 5 धावा करून बाद झाले. त्यानंतर नितीश राणा देखील अवघ्या दोन धावा करून परतला. 16 धावसंख्येवर तीन विकेट गमावल्यावर कर्णधार श्रेयस अय्यरकडून मोठ्या अपेक्षा होत्या, पण त्यानेही अपेक्षा भंग केल्या आणि 12 धावाच करू शकला. अडचणीत सापडलेल्या केकेआरसाठी रिकु सिंह आणि वेंकटेश अय्यर मदतीला धावले. दोंघांनी संयमाने फलंदाजी करून संघाचा डाव सावरला, पण यश दयालने सिंहला माघारी धाडलं आणि संघाला विजयाच्या आणखी एक पाऊल पुढे नेलं. यानंतर राशिद खानच्या फिरकीत अडकून वेंकटेश अय्यर देखील बाद झाला. यादरम्यान खतरनाक आंद्रे रसेल मैदानात असलेल्या मोक्याच्या क्षणी उमेश यादवची त्याला मूल्यवान साथ मिळाली आणि विजयाच्या जवळ नेले. अंतिम षटकांत 18 धावांची गरज असताना अलझारी जोसेफने पहिल्या बॉलवर षटकार खाल्ला तर पुढील चेंडूवर खतरनाक आंद्रे रसेलला झेलबाद केले. रसेल 25 चेंडूत 48 धावांची झंझावाती खेळी खेळून बाद झाला आणि गुजरातने सामन्यात दमदार पुनरागमन केले.
यापूर्वी, हार्दिक पांड्याने शानदार अर्धशतक ठोकले. डेविड मिलर 27 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला. पंड्या 67 धावा करून बाद झाला. तर उपकर्णधार राशिद खान खाते न उघडता बाद झाला. कोलकातासाठी रसेलने 20 वे षटक टाकले आणि पहिल्याच चेंडूवर त्याने अभिनव मनोहरला 2 धावांवर बाद केले, तर पुढच्या चेंडूवर लॉकी फर्ग्युसनला पॅव्हिलियनची वाट दाखवली. तिसऱ्या चेंडूवर एक धाव दिली, तर राहुल तेवतियाने चौथ्या चेंडूवर चौकार खेचला. मात्र, पाचव्या चेंडूवर तेवतिया 17 धावांवर झेलबाद झाला आणि शेवटच्या चेंडूवर यश दयाल खाते न उघडता त्याच्या हातात झेलबाद झाला.
(The above story first appeared on LatestLY on Apr 23, 2022 07:31 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

