IPL 2022, GT vs RCB: गुजरात बेंगलोरवर ठरले सरस, रॉयल चॅलेंजर्सला 6 विकेटने नमवत प्लेऑफ तिकीट केले पक्के, मिलर-तेवतियाची ‘मॅच विनिंग’ खेळी
IPL 2022, GT vs RCB: डेविड मिलर आणि राहुल तेवतिया यांच्या मॅचविनिंग खेळीच्या जोरावर ‘टेबल टॉपर्स’ गुजरात टायटन्सने यावर्षी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरवर क्लीन स्वीप मिळवला. आरसीबीने पहिले फलंदाजी करून दिलेल्या 171 लक्ष्याच्या प्रत्युत्तरात गुजरातने चार विकेट गमावून 19.3 षटकांत विजयाची नोंद केली. यासह गुजरातने आयपीएल प्लेऑफचे पहिले तिकीट पक्के केले आहे.
IPL 2022, GT vs RCB: डेविड मिलर (David Miller) आणि राहुल तेवतिया (Rahul Tewatia) यांच्या मॅचविनिंग खेळीच्या जोरावर ‘टेबल टॉपर्स’ गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरवर (Royal Challengers Bangalore) अंतिम षटकांत जोरदार विजय मिळवला. आरसीबीने (RCB) पहिले फलंदाजी करून दिलेल्या 171 लक्ष्याच्या प्रत्युत्तरात गुजरातने चार विकेट गमावून 19.3 षटकांत विजयाची नोंद केली. यासह गुजरातने आयपीएल प्लेऑफचे पहिले तिकीट पक्के केले आहे. आयपीएलच्या पॉईंट टेबलमध्ये (IPL Points Table) पहिले 16 गुण मिळवणारा अंतिम-4 मध्ये एन्ट्री करतो. अशा परिस्थतीत गुजरात प्लेऑफ फेरी गाठणारा पहिला संघ ठरला आहे. गुजरातच्या रोमांचक विजयात मिलर धावा आणि तेवतिया धावा करून नाबाद परतले. तसेच शुभमन गिलने 31 आणि रिद्धिमान साहाने 29 धावांचे छोटेखानी योगदान दिले. (Virat Kohli IPL 2022: ‘किंग कोहली’ची विराट गर्जना, गुजरातविरुद्ध फटकेबाजी करून संपवला अर्धशतकाच्या दुष्काळ, पण ‘या’ गोष्टीमुळे उपस्थितीत होतोय प्रश्न)
आरसीबीने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातसाठी साहा आणि गिलच्या सलामी जोडी अर्धशतकी भागीदारी केली. त्यांनतर नियमित अंतराने चार विकेट गमावून संघ बॅकफूटवर पडला. कर्णधार हार्दिक पांड्याही फारसे काही योगदान देऊन शकला नाही आणि अवघ्या तीन धावांत बाद झाला. त्यामुळे मिलर आणि तेवतियाच्या जोडीवर पुन्हा संघाला विजय मिवळून देण्याचे दडपण आले. मात्र दोघांनी याचा भार पडू न देता आक्रमक फलंदाजी करून संघाला विजयरेष ओलांडून देत संघासाठी प्लेऑफचे पहिले तिकीट कन्फर्म केले. अशाप्रकारे मिलर आणि तेवतिया मॅच विनिंग खेळीपुढे विराट कोहली व रजत पाटीदार यांची अर्धशतकी शतकी खेळी फिकी पडली. आरसीबीसाठी शाहबाझ अहमद आणि वानिंदू हसरंगा यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
यापूर्वी टॉस गमावून फलंदाजीला आलेल्या बेंगलोरची सुरुवात चांगली झाली नाही. संघाचा कर्णधार फाफ डु प्लेसिस खाते न उघडता बाद झाला. त्यानंतर पाटीदार आणि कोहली यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी 99 धावांच्या भागीदारीने संघ स्थिरावला. रजत 52 धावा करून बाद झाला. तर कोहलीने 58 धावांची सर्वाधिक खेळी केली. तसेच मॅक्सवेलने 18 चेंडूत 33 धावांचे छोटेखानी योगदान दिले. गुजरातसाठी प्रदीप सांगवानने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)