IPL 2022: चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या ‘या’ हंगामातील संघर्षा मागचे कारण माजी दिग्गज क्रिकेटपटूने केले स्पष्ट

संघाने पहिले तीन सामने गमावले असून CSK सध्या पॉइंट टेबलमध्ये आठव्या क्रमांकावर आहे. टीम इंडियाचा दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंह याने रवींद्र जडेजाच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्जच्या उणिवा उघड केल्या, ज्यामुळे संघाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

चेन्नई सुपर किंग्स (Photo Credit: Instagram)
IPL 2022: गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाने आयपीएल (IPL) 2022 मध्ये त्यांच्या विजेतेपद बचाव मोहिमेची सुरुवात चांगली केली नाही. संघाने पहिले तीन सामने गमावले असून CSK सध्या पॉइंट टेबलमध्ये आठव्या क्रमांकावर आहे. अशा परिस्थितीत पहिल्या विजयाच्या शोधात चेन्नई आपल्या आगामी सामन्यात सनरायझर्स हैदराबादशी (Sunrisers Hyderabad) भिडणार आहे. हैदराबादने देखील अद्याप आपले विजयाचे खाते उघडलेले नाही. 15 व्या मोसमातील 17 व्या सामन्यात आज दोन्ही संघ नवी मुंबईत एकमेकांशी भिडणार आहेत. दरम्यान, टीम इंडियाचा दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंह (Harbhajan Singh) याने रवींद्र जडेजाच्या (Ravindra Jadeja) नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्जच्या उणिवा उघड केल्या, ज्यामुळे संघाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या मोसमात चेन्नई सुपर किंग्ज का झगडत आहे हे हरभजनने दोन मुद्द्यांमध्ये स्पष्ट केले. (IPL 2022, CSK vs SRH Match 17: हैदराबादने जिंकला टॉस; चेन्नई करणार पहिले फलंदाजी; पहा दोन्ही संघाचा प्लेइंग XI)
स्टार स्पोर्ट्सक्या कार्यक्रमात हरभजन म्हणाला, “त्यांच्यासमोर एक नाही तर दोन समस्या आहेत. पहिल्या सहा षटकांमध्ये त्यांच्याकडे दीपक चाहर सारखा गोलंदाज नाही जो त्यांना नवीन चेंडूवर लवकर विकेट मिळवून देऊ शकेल. मग पॉवरप्लेनंतर 7 ते 15 षटकांच्या दरम्यान त्यांच्याकडे एकही फिरकी गोलंदाज नाही जो त्यांना यश मिळवून देईल.” चाहरने गेल्या तीन मोसमात नवीन चेंडूने गोलंदाजी करून 32 बळी घेतले होते. मात्र या मोसमात दुखापतीमुळे तो अजूनही संघाबाहेर आहे आणि चाहरच्या जागी दुसरा योग्य गोलंदाज चेन्नईला अद्याप सापडलेला नाही. आयपीएल 2022 मध्ये चेन्नईची गोलंदाजांची आतापर्यंतची कामगिरी अत्यंत खराब राहिली आणि संघाने तीन सामन्यांत पॉवरप्लेमध्ये केवळ दोन विकेट्स घेतल्या आहेत. तसेच ऋतुराज गायकवाडचा फॉर्मही संघासाठी चिंतेचा विषय असल्याचे हरभजनचे मत आहे.
गायकवाडने गेल्या मोसमात सर्वाधिक धावा केल्या होत्या आणि ऑरेंज कॅप पटकावली होती. मात्र, या मोसमात गायकवाडने तीन सामन्यांत केवळ दोन धावा केल्या आहेत. भज्जी म्हणाला, “ऋतुराज खूप लवकर बाद होत आहे आणि त्यामुळे सलामीची मजबूत भागीदारी बनत नाही. त्यामुळेच चेन्नई सुपर किंग्स सारख्या संघाने आतापर्यंतचे तिन्ही सामने गमावल्याचे तुम्ही पाहत आहात. तथापि, चेन्नईने पुनरागमन केले आणि त्यानंतरही विजयी मालिका सुरू ठेवल्यास मला आश्चर्य वाटणार नाही.”


00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif