IPL 2022 Final: राजस्थानचा ‘क्लीन स्वीप’, 7 गडी राखून विजय मिळवत गुजरातने जिंकले पहिले जेतेपद; 5 वर्षांनंतर IPL ला मिळाला नवा चॅम्पियन

IPL च्या 15 व्या हंगामात ‘टेबल टॉपर’ गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सवरील आपला दबदबा कायम ठेवला आणि इंडियन प्रीमियर लीगच्या फायनल सामन्यात 7 गडी राखून पहिले जेतेपद काबीज केले. अशाप्रकारे आयपीएलला पाच वर्षानंतर नवीन विजेता मिळाला आहे. यापूर्वी सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय रॉयल्सच्या अंगी उलटला. राजस्थान रॉयल्सचा एकही फलंदाजी मोठी खेळी करू शकला नाही.

गुजरात टायटन्स (Photo Credit: PTI)

IPL 2022 Final Winner: आयपीएलच्या (IPL) 15 व्या हंगामात हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वातील ‘टेबल टॉपर’ गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) वरील आपला दबदबा कायम ठेवला आणि इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) फायनल सामन्यात 7 गडी राखून पहिले जेतेपद काबीज केले. अशाप्रकारे आयपीएलला पाच वर्षानंतर नवीन विजेता मिळाला आहे. राजस्थानने गुजरातसमोर पहिले जेतेपद जिंकण्यासाठी 131 धावांचे माफक लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात हार्दिक पांड्याच्या संघाने 3 विकेट गमावून लक्ष्य गाठले आणि आयपीएलच्या प्रतिष्ठित ट्रॉफीवर नाव कोरले. कर्णधार हार्दिक, सलामीवीर शुभमन गिल (Shubman Gill) आणि डेविड मिलर (David Miller) संघाच्या विजयाचे शिल्पकार ठरले. (Fastest Ball in IPL: आयपीएलचा नवा स्पीड स्टार, गुजरातचा मातब्बर Lockie Ferguson ने टाकला सर्वात वेगवान चेंडू; पाहा त्याची स्पीड)

आयपीएलच्या इतिहासात गेले पाच वर्ष, 2017-2021 पर्यंत, मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्सने आयपीएलची स्पर्धा जिंकली आहे. यादरम्यान मुंबईने तीन तर सीएसके संघाने दोनदा बाजी मारली. तथापि आता आयपीएलच्या या दोन यशस्वी फ्रँचायझींना मागे टाकून गुजरातने पदार्पणात आपले पहिले जेतेपद जिंकले आहे. गुजरात-राजस्थान संघ यावर्षीच्या सीझनमध्ये एकूण तीन वेळा आमनेसामने आले आणि प्रत्येक वेळी ‘टेबल टॉपर्स’चा वरचष्मा राहिला. दरम्यान गुजरातच्या विजयात कर्णधार हार्दिकची अष्टपैलू कामगिरी लक्षवेधी ठरली. हार्दिकने सर्वप्रथम गोलंदाजीने ठसा उमटवला आणि सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. यानंतर संघाला विजयाच्या जवळ नेट 34 धावा केल्या. हार्दिक आणि शुभमन गिल यांच्यातील अर्धशतकी भागीदारीने संघाच्या विजयाच्या आशा पल्लवित ठेवल्या. राजस्थानच्या स्वप्नांवर पाणी फेरले. हार्दिकशिवाय शुभमनने 45 आणि डेविड मिलरने 32 धावांची नाबाद खेळी केली. त्याचवेळी राजस्थानसाठी ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा आणि युजवेंद्र चहलने 1-1 विकेट्स घेतल्या.

यापूर्वी सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय रॉयल्सच्या अंगी उलटला. राजस्थान रॉयल्सचा एकही फलंदाजी मोठी खेळी करू शकला नाही. हार्दिकच्या नेतृत्वात गुजरातच्या गोलंदाजांनी आक्रमक भूमिकेव्हीसमोर रॉयल्सचे धुरंधर फलंदाज तग धरून खेळू शकले नाही. गुजरातचा कर्णधार हार्दिकने राजस्थानच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. जोस बटलर, संजू सॅमसन आणि शिमरॉन हेटमायर यांनी तीन महत्वपूर्ण विकेट घेतल्या. जोस बटलरने सर्वाधिक 39 तर यशस्वी जयस्वालने 22 धावा केल्या. याशिवाय संघाचा अन्य कोणताही फलंदाजी 20 धावांचा पल्ला सर करू शकला नाही.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now