IPL 2022, DC vs SRH: सनरायझर्सशी हिशोब चुकता करण्यासाठी दिल्लीचा तडाखेबाज फलंदाज सज्ज, प्लेऑफच्या शर्यतीत ‘ऑरेंज आर्मी’ला बसणार जोर का झटका?

DC vs SRH, IPL 2022: आयपीएलमध्ये परदेशी खेळाडूंमध्ये सर्वाधिक धावा करणारा ऑस्ट्रेलियन सलामीवीर आणि दिल्ली कॅपिटल्सचा स्टार डेविड वॉर्नर गुरुवारी त्याच्या माजी फ्रेंचायझी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध मैदानात हिशोब बरोबर करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. गेल्या मोसमात SRH ने त्याक कर्णधार म्हणून हकालपट्टी केली आणि नंतर प्लेइंग इलेव्हनमधून वगळले होते.

डेविड वॉर्नर (Photo Credit: Twitter/IPL)

DC vs SRH, IPL 2022: आयपीएलमध्ये (IPL) परदेशी खेळाडूंमध्ये सर्वाधिक धावा करणारा ऑस्ट्रेलियन सलामीवीर आणि दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) स्टार डेविड वॉर्नर (David Warner) गुरुवारी त्याच्या माजी फ्रेंचायझी सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) विरुद्ध मैदानात हिशोब बरोबर करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. 50 हून अधिक अर्धशतके ठोकणारा वॉर्नर सध्या चांगल्या लयीत आहे. यावेळी ऑरेंज आर्मीची प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल, तर दुसरीकडे वॉर्नर त्यांचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी पूर्ण प्रयत्न करताना दिसणार आहे. गेल्या मोसमात SRH ने त्याक कर्णधार म्हणून हकालपट्टी केली आणि नंतर प्लेइंग इलेव्हनमधून वगळले होते. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्याच्या पूर्वसंध्येला वॉर्नर म्हणाला, “आम्ही सध्या ज्या स्थितीत आहोत त्या स्थानावरून प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी आम्हाला प्रत्येक सामना जिंकावा लागेल. स्पर्धा जोरदार कडक आहे. आम्हाला पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन बलाढ्य संघांविरुद्ध सामने खेळायचे आहेत. या संघांची स्थितीही जवळपास आमच्यासारखीच आहे.” (IPL 2022 Playoffs Qualification: रोहितची ‘पलटन’, धोनीचे ‘सुपर किंग्स’ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर? जाणून घ्या काय आहे टॉप-4 संघांचे गणित)

डेविड वॉर्नरने आयपीएल 2022 मध्ये 7 सामन्यात 264 धावा केल्या आहेत. सनरायझर्स हैदराबादमधून बाहेर पडल्यानंतर वॉर्नर प्रथमच SRH शी भिडणार आहे. त्याने SRH साठी 95 सामन्यांमध्ये 49.55 च्या सरासरीने 4014 धावा केल्या आहेत ज्यात 40 अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय दिल्ली कॅपिटल्सने हा सामना जिंकला तर ते SRH ला पॉइंट टेबलच्या 5व्या क्रमांकावरून खाली ढकलू शकते.हैदराबादचा पराभव केल्यास दिल्लीची पॉईंट टेबलमधील स्थिती आणखी सुधारेल. तथापि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने त्यांचे उर्वरित सामने गमावल्यास दिल्लीला प्लेऑफमध्ये पोहोचण्यास आणखी फायदेशीर ठरेल. अशा परिस्थितीत अंतिम 4 मध्ये प्रवेश करण्यासाठी सर्व संघांमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळत आहे. दरम्यान, दिल्लीसाठी सलामीला उतरणारा वॉर्नर अत्यंत महत्वाचा ठरणार आहे.

दुसरीकडे, सनरायझर्स हैदराबाद 5 विजयांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. आणि रविवारी चेन्नई सुपर किंग्जकडून 13 धावांनी पराभूत होऊनही हैदराबादच्या प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याच्या आशा पल्लवित आहेत. मात्र, आता त्यांना उर्वरित पाचपैकी किमान चार सामने जिंकावे लागणार आहेत. दिल्लीनंतर हैदराबाद त्यांचे उर्वरित सामने बेंगलोर, मुंबई, कोलकाता, आणि पंजाबविरुद्ध खेळणार आहे. दिल्ली कॅपिटल्स 8 गुणांसह गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्लीला लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता. DC नऊ सामन्यांत 8 गुणांसह 7 व्या क्रमणकावर आहे, परंतु आता प्लेऑफ खेळण्यासाठी त्यांना त्यांचे उर्वरित पाचही सामने जिंकावे लागतील.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now