IPL 2022, CSK vs RR: राजस्थान विरुद्ध चेन्नई सामन्याच्या निकालाचा लखनऊ, RCB आणि दिल्लीच्या प्लेऑफच्या संधींवर परिणाम होणार? वाचा सविस्तर
इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) चालू 2022 सीझनच्या 68 व्या सामन्यात प्लेऑफची आहेत राजस्थान रॉयल्सची गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध लढत होईल. चेन्नईवरील विजयासह रॉयल्स 2022 च्या प्ले ऑफमध्ये त्यांचे स्थान निश्चितच करणार नाही तर मंगळवारी (24 मे) गुजरात टायटन्ससह पात्रता फेरीचा सामना निश्चित करेल.
IPL 2022 PlayOffs Qualification: आयपीएलचे (IPL) पहिले विजेते राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) शुक्रवारी (20 मे) ब्रेबॉर्न स्टेडियमवर इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2022 सीझनच्या 68 व्या सामन्यात गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) विरुद्ध सामन्यासाठी मैदानात उतरेल. आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 13 सामन्यांमध्ये आठ विजयांसह संजू सॅमसनच्या (Sanju Samson) नेतृत्वातील संघ प्ले ऑफसाठी पात्र होण्यासाठी मजबूत स्थितीत आहे, परंतु अद्याप तसे झालेले नाही. 2018 च्या मोसमानंतर पहिल्या प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची पूर्ण खात्री करण्यासाठी त्यांना त्यांच्या शेवटच्या लीग सामन्यात एमएस धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वातील सुपर किंग्स संघाला पराभूत करणे भाग आहे. आज रॉयल्सने CSK विरुद्ध कोणत्याही फरकाने विजय मिळवला तर, ते फक्त प्ले ऑफसाठी पात्र ठरणार नाहीत तर पहिल्या दोनमध्ये त्यांचे स्थान निश्चित करतील. (IPL 2022: आरसीबीच्या प्लेऑफची गुरुकिल्ली मुंबईकडे, रोहितची ‘पलटन’ करणार विराटच्या रॉयल चॅलेंजर्सची नौका पार?)
पण जर ते विजय मिळवण्यात अयशस्वी ठरले, तर समीकरण नेट रनरेटवर येईल आणि या क्षणी रॉयल्स चौथ्या स्थानावर असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरपेक्षा चांगल्या स्थितीत आहे, ज्यांचे 16 गुण आहेत. अशा परिस्थितीत रॉयल्सला फक्त हे सुनिश्चित करावे लागेल की ते मोठ्या फरकाने हरणार नाहीत जेणेकरुन आरसीबीला नेट रनरेटच्या बाबतीत ते मागे टाकू शकतील. सध्या, रॉयल्सचा नेट रन रेट +0.304 आहे तर आरसीबीचा –0.253 आहे. दरम्यान, रॉयल्स खूप मोठ्या फरकाने हरले तरीही RCB नेट रनरेटच्या खाली जाण्याची शक्यता फारच कमी आहे. पण हे गणितीयदृष्ट्या शक्य असल्याने संजू सॅमसन अँड कंपनीकोणतीही शक्यता टाळण्याचा प्रयत्न करेल. तथापि, रॉयल्स आणि आरसीबी व्यतिरिक्त शुक्रवारच्या सामन्याच्या निकालाचा लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्सवर देखील परिणाम होईल. राजस्थान विरुद्ध चेन्नई सामन्याच्या निकालाचा या प्रत्येक संघावर काय परिणाम खालीलप्रमाणे आहे.
लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants)
केएल राहुलच्या नेतृत्वाखालील संघ आधीच कोलकातावर 2 धावांनी विजय मिळवून आयपीएल 2022 च्या प्ले ऑफसाठी पात्र ठरला आहे परंतु त्यांचे अंतिम लीग स्थान अद्याप निश्चित झालेले नाही आणि ते रॉयल्स-चेन्नईच्या निकालावर अवलंबून असेल. 14 सामन्यांतून 18 गुणांसह लखनऊ संघ या क्षणी दुसरा क्रमांकावर आहे, परंतु आज रात्री रॉयल्स विजयी झाल्यास ते तिसऱ्या स्थानावर घसरतील आणि त्यानंतर ते बुधवारी एलिमिनेटरमध्ये चौथ्या स्थानावरील संघाविरुद्ध खेळतील. परंतु चेन्नई जिंकल्यास सुपर जायंट्सचे दुसरे स्थान अबाधित राहील आणि मंगळवारी, 24 मे रोजी पहिल्या क्वालिफायर सामन्यात गुजरात टायटन्सशी सामना करेल आणि निर्णायक फेरी गाठण्यासाठी त्यांना दोन संधी मिळेल.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore)
तीन वेळा उपविजेते RCB ने गुजरातवर 8 गडी राखून विजय मिळवून प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या त्यांच्या आशा जिवंत ठेवल्या. 14 सामन्यांतून 16 गुणांसह ते या क्षणी चौथ्या स्थानावर आहेत, परंतु ते प्लेऑफसाठी पात्र ठरतील की नाही याची त्यांना खात्री नाही कारण त्यांच्या शक्यता अजूनही इतर संघांच्या निकालांवर अवलंबून आहेत. जर दिल्ली कॅपिटल्सने शनिवारी (21 मे) मुंबई इंडियन्सवर विजय मिळवला, तर त्यांचे 16 गुण होतील आणि त्यांच्या चांगल्या नेट रन रेटने आरसीबी संघाला मागे टाकतील. तथापि, आणखी एक मनोरंजक पैलू म्हणजे जर CSK ने रॉयल्सला मोठ्या फरकाने पराभूत केले, तर आरसीबीला पुढे जाण्याच संधी मिळेल. अशा परिस्थितीत, दिल्लीचा विजय बेंगलोर ऐवजी रॉयल्सला बाहेर पडणे भाग पडेल. परंतु संजू सॅमसनच्या संघाचा रनरेट सकारात्मक असल्यामुळे असे घडणे जवळजवळ अशक्य आहे आणि ते समीकरण बदलण्यासाठी लज्जास्पद निकाल लागणे गरजेचे आहे.
दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals)
सलग चौथ्या वर्षी प्लेऑफमध्ये पोहोचायचे असल्यास दिल्लीला शनिवारी (21 मे) वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्धचा शेवटचा साखळी सामना जिंकावा लागेल. जर ते हरले तर त्यांचे पॅकअप होईल आणि जर ते जिंकले तर त्यांची नौका होईल. त्यांच्याकडे नेट रनरेटने आरसीबीला मागे टाकून चौथे स्थानावर ताबा मिळवतील. दिल्लीचा संघ मुंबईला पराभूत करतील हे लक्षात घेता शुक्रवारचा निकाल दिल्लीला एलिमिनेटर लढतीसाठी त्यांचा मार्ग शोधण्यास मदत करेल. दिल्ली कॅपिटल्स प्ले ऑफसाठी क्वालिफाय केल्यास त्यांचा सामना राजस्थान रॉयल्स किंवा लखनऊ सुपर जायंट्सशी होईल, ज्यांच्याविरुद्ध ते यापूर्वी दोन सामने खेळले आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)