IPL 2022, CSK vs PBKS: पंजाबविरुद्ध MS Dhoni धमाल करण्याच्या तयारीत, रोहितनंतर टी-20 मध्ये करेल मोठी कामगिरी
सीएसकेचा माजी कर्णधार एमएस धोनी याच्यासाठी हा सामना खूपच खास असेल. धोनी आज त्याच्या टी-20 कारकिर्दीतील 350 वा सामना खेळणार असून हा पल्ला गाठणारा तो दुसरा भारतीय खेळाडू बनेल. आतापर्यंत 350 हून अधिक टी-20 सामने खेळणारा रोहित शर्मा हा एकमेव खेळाडू आहे.
IPL 2022, CSK vs PBKS: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2022 मध्ये आज चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि पंजाब किंग्ज (Punjab Kings) यांच्यात सामना रंगणार आहे. सीएसकेचा (CSK) माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याच्यासाठी हा सामना खूपच खास असेल. एमएस धोनी आज मैदानात उतरताच टी-20 क्रिकेटमध्ये वैयक्तिक यश संपादन करेल. टी-20 क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा धोनी हा रोहित शर्मा (Rohit Sharma) नंतरचा दुसरा भारतीय क्रिकेटपटू ठरणार आहे. आयपीएल (IPL) 2022 मध्ये चेन्नई सुपर किंग्जची सुरुवात खूपच खराब झाली आहे. सीएसकेने आतापर्यंत 2 सामने खेळले आहेत ज्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. (IPL 2022: सतत दोन पराभवाची चव चाखलेल्या CSK संघाला ‘या’ खतरनाक गोलंदाजाची प्रतीक्षा, जाणून घ्या कधी करू शकतो पुनरागमन)
धोनी आज त्याच्या टी-20 कारकिर्दीतील 350 वा सामना खेळणार असून हा पल्ला गाठणारा तो दुसरा भारतीय खेळाडू बनेल. आतापर्यंत 350 हून अधिक टी-20 सामने खेळणारा रोहित शर्मा हा एकमेव खेळाडू आहे. रोहित 372 सामन्यांसह अव्वल स्थानावर आहे. रोहितने आतापर्यंत 372 टी-20 सामने खेळणारा आघाडीचा भारतीय खेळाडू आहे. तर धोनीच्या नंतर या यादीत सुरेश रैना (336), दिनेश कार्तिक (329) आणि विराट कोहली (328) आहेत. 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या 40 वर्षीय यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीने चेन्नई सुपर किंग्जच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. धोनीच्या टी-20 कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर त्याने आतापर्यंत खेळलेल्या 349 सामन्यांमध्ये 7001 धावा केल्या आहेत. लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या चेन्नईच्या शेवटच्या सामन्यात त्याने 6 चेंडूत झटपट 16 धावा केल्या आणि 7000 धावांचा टप्पा पार केला. या मोसमात आतापर्यंत धोनी उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे, त्याने KKR विरुद्ध सलामीच्या सामन्यात देखील बॅटने आपली चमक दाखवली आणि 38 चेंडूत 50 धावांची खेळी खेळली होती.
दुसरीकडे, चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यातील आगामी सामन्याबद्दल बोलायचे झाले तर सीएसकेने हंगामातील पहिले दोन सामने गमावले आहेत, तर स्पर्धेची सुरुवात विजयाने करणाऱ्या पंजाब किंग्जला शेवटच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सकडून पराभव स्वीकारावा लागला होता. अशा परिस्थितीत आजचा सामना जिंकून दोन्ही संघ पुन्हा विजयी मार्गावर परतण्यासाठी उत्सुक असतील.