IPL 2022 Costliest Player: एमएस धोनी-विराट कोहली नव्हे, रिटेन्शन शर्यतीत ट्रिपल 'R'चा दबदबा... आयपीएल लिलावापूर्वी ‘हे’ ठरले सर्वात महागडे खेळाडू

आयपीएलचे सुपरस्टार म्हणवल्या जाणारे एमएस धोनी आणि विराट कोहलीला मोठी रक्कम मिळू शकली नाही. आयपीएल 2022 साठी जारी करण्यात आलेल्या रिटेन्शन लिस्टमध्ये, मोठ्या खेळाडूंना आगामी हंगामासाठी सर्वात जास्त रकमेसह रिटेन करण्यात आले आहे.

रिषभ पंत, रवींद्र जडेजा व रोहित शर्मा (Photo Credit: PTI)

Most expensive IPL 2022 Retentions: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) आठ जुन्या संघांनी मंगळवारी आयपीएल (IPL) 2022 साठी खेळाडूंच्या लिलावापूर्वी त्यांच्या संघात कायम ठेवू इच्छित असलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. म्हणजेच आता आयपीएलच्या लिलावात (IPL Auction) या दिग्गजांसाठी बोली लावली जाणार नाही. एकूण 27 खेळाडूंना रिटेन करण्यात आले असून त्यात आठ विदेशी खेळाडू आणि 19 भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. यामध्ये अनेक दिग्गजांच्या नावाचाही समावेश करण्यात आला आहे, पण यावेळी वर्षानुवर्षे आयपीएलचे सुपरस्टार म्हणवल्या जाणारे एमएस धोनी (MS Dhoni) आणि विराट कोहलीला (Virat Kohli) मोठी रक्कम मिळू शकली नाही. आयपीएल 2022 साठी जारी करण्यात आलेल्या रिटेन्शन लिस्टमध्ये, मोठ्या खेळाडूंना आगामी हंगामासाठी सर्वात जास्त रकमेसह रिटेन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे आघाडीवर ट्रिपल ‘R’चा दबदबा पाहायला मिळाला. (IPL 2022 Retention: मुंबई इंडियन्सने मोठ्या खेळाडूंना का रिलीज केले? Zaheer Khan ने दिली सर्व प्रश्नांची उत्तरे)

रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja)

जडेजाच्या मैदानावरील कामगिरीबद्दल शंका नाही. अष्टपैलू खेळाडू क्षेत्ररक्षक, फिरकीपटू आणि फलंदाज म्हणून सध्या सर्वोत्तम आहे. चेन्नई सुपर किंग्जसाठी (Chennai Super King) तो नेहमीच सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंपैकी एक राहिला आहे आणि म्हणूनच संघाने त्याला तब्बल रु. 16 कोटी, कर्णधार एमएस धोनीपेक्षा 4 कोटी अधिकच्या फी मध्ये रिटेन केले आहे.

रोहित शर्मा (Rohit Sharma)

या यादीत पुढे मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये पाचही आयपीएल ट्रॉफी जिंकल्या. 2013 मध्ये मुंबई इंडियन्सने रोहितच्या नेतृत्वात चॅम्पियन्स लीग जिंकली; त्यामुळे त्याला तब्बल 16 कोटी रुपयांत रिटेन करणे संघासाठी निश्चितच होते.रोहितने एकूण 213 आयपीएल सामन्यांच्या 208 डावांमध्ये 130.4 च्या स्ट्राइक रेटने 5611 धावा केल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि 40 अर्धशतके आहेत.

रिषभ पंत (Rishabh Pant)

भारतीय यष्टीरक्षक-फलंदाजला दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाने पुढील हंगामासाठी तब्बल 16 कोटी रुपये मोजले. 16 कोटींच्या ब्रॅकेटमध्ये तो तिसरा आणि शेवटचा रिटेन केलेला खेळाडू आहे. 24 वर्षीय क्रिकेटपटूने केवळ 84 आयपीएल सामने खेळले आहेत आणि 147.46 च्या स्ट्राइक रेटने 2498 धावा केल्या आहेत. त्याने एक शतक आणि 15 अर्धशतक केले आहेत.

दुसरीकडे, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी कर्णधार विराट कोहली आणि चेन्नई सुपर किंग्जला 2021 मध्ये विजेतेपद मिळवून देणारा चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनी यांना मोठं नुकसान सहन करावे लागले आहे. गेल्या मोसमात कोहली सर्वाधिक मानधन घेणारा खेळाडू होता. त्याला आरसीबीकडून 17 कोटी रुपये मिळाले होते. परंतु यंदा त्याचा पगार कमी झाला आहे. संघाने तीन खेळाडूंना कायम ठेवले आहे, त्यामुळे त्यांना बीसीसीआयच्या नियमानुसार 15 कोटी मिळतील. धोनी चेन्नई संघाचा दुसऱ्या पसंतीचा खेळाडू असल्यामुळे त्याला 12 कोटी मिळतील.