IPL 2022 Auction: अश्विनने CSK ला लिलावापूर्वी दिला असा इशारा, गेल्या वेळी 1.5 कोटी दिलेल्या ‘या’ फलंदाजासाठी आता आणखी खर्च करावा लागणार पैसा

दक्षिण आफ्रिकेचा फाफ डू प्लेसिस त्याच्या माजी फ्रँचायझी चेन्नई सुपर किंग्जबरोबर पुनर्मिलन करण्यासाठी उत्सुक स्टार फलंदाजांपैकी असेल. माजी दक्षिण आफ्रिका कर्णधार गेल्या अनेक वर्षांपासून CSK संघाचा प्रमुख सदस्य होता. भारताचा दिग्गज ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने डु प्लेसिसबाबत CSK ला चेतावणी दिली आहे.

फाफ डु प्लेसिस आणि रुतूराज गायकवाड (Photo Credit: PTI)

इंडियन प्रीमियर लीगचा (Indian Premier League) मेगा लिलाव 12 ते 13 फेब्रुवारी दरम्यान बेंगळुरू (Bangalore) येथे होणार आहे. लिलावाचे काउंटडाउन सुरु झाले असताना फ्रँचायझींची तयारी देखील अंतिम टप्प्यात पोहोचली असेल. या वर्षीच्या मेगा लिलावात 590 खेळाडूंवर बोली लावली जाणार आहेत. आणि दक्षिण आफ्रिकेचा फाफ डू प्लेसिस (Faf du Plessis) त्याच्या माजी फ्रँचायझी चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) बरोबर पुनर्मिलन करण्यासाठी उत्सुक स्टार फलंदाजांपैकी असेल. माजी दक्षिण आफ्रिका कर्णधार गेल्या अनेक वर्षांपासून CSK संघाचा प्रमुख सदस्य होता आणि 2021 च्या त्यांच्या विजयी मोहिमेत त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती, जिथे तो स्पर्धेत दुसरा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. आता भारताचा दिग्गज ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) डु प्लेसिसबाबत CSK ला चेतावणी दिली आहे. (IPL 2022 Mega Auction: भारताच्या U19 फिरकीपटूबाबत R Ashwin ने केली मोठी भविष्यवाणी, ‘या’ स्टार खेळाडूसाठी फ्रँचायझींमध्ये होणार चढाओढ)

“गेल्या वेळी सीएसकेने फाफ डू प्लेसिसला 1.5 कोटींमध्ये खरेदी केले होते. पण यावेळी मला त्याच्यासाठी असे होताना दिसत नाही. CSK चाहत्यांच्या इच्छित यादीत तो नक्कीच असेल. सीएसकेला यावेळी फाफ डू प्लेसिसला खरेदी करायचे असल्यास त्यांनी निश्चितपणे मागील वेळेपेक्षा खूप जास्त खर्च करण्यास तयार असले पाहिजे. फाफ डू प्लेसिसला माझ्या मते मोठी मागणी असेल. बहुतेक संघ फाफसाठी बोली लावतील,” अश्विनने त्याच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर सांगितले. सीएसकेने मेगा लिलावापूर्वी रवींद्र जडेजा, एमएस धोनी, मोईन अली आणि रुतुराज गायकवाड यांना रिटेन केले आहे. दरम्यान, अश्विनने यापूर्वी कबूल केले होते की त्याला चेन्नई सुपर किंग्जमध्ये परतायचे आहे परंतु मोईनच्या संघात उपस्थितीमुळे हे पाऊल कठीण होऊ शकते असे स्पष्ट केले.

अश्विन म्हणाला, “मला खरं तर खात्री नाही, पण खरे सांगायचे तर व्यावसायिक खेळाडूने कुठेही जाऊन आपले सर्वोत्तम देणे हाच एक आदर्श मार्ग असला पाहिजे.” अश्विन म्हणाला. “पण हो, पण हो, मी आता 35 वर्षांचा आहे, मी जिथून सुरुवात केली होती तिथे परतण्याचा आनंद होईल पण मोईन अलीच्या रूपात त्यांच्याकडे एक ऑफस्पिनर आधीच आहे. म्हणून ते याबद्दल कसे जातील हे मला माहित नाही, म्हणून आपण प्रतीक्षा करूया आणि पाहूया.”