IPL 2022: मुंबई इंडियन्सच्या दिग्गज अष्टपैलूने खेळली अंतिम मॅच? 10 सामन्यात सततच्या अपयशानंतर माजी भारतीय क्रिकेटपटूचे विधान, ‘हा’ युवा करणार रिप्लेस

अष्टपैलू खेळाडूने अनेक प्रसंगी संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पण भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राला वाटते की, पोलार्ड या हंगामात किमान आगामी सामन्यांमध्ये संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसणार नाही.

किरॉन पोलार्ड (Photo Credit: PTI)

IPL 2022: वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार आणि टी-20 क्रिकेटचा धडाकेबाज अष्टपैलू किरॉन पोलार्ड (Kieron Pollard) गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाचा अविभाज्य भाग राहिला आहे. अष्टपैलू खेळाडू म्हणून पोलार्डने अनेक प्रसंगी संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्याचबरोबर वेळोवेळी रोहित शर्माच्या अनुपस्थितीत त्याने संघाचे नेतृत्वही केले आहे. मुंबई इंडियन्सने चालू हंगामासाठी त्यांच्या चार खेळाडूंना कायम ठेवले होते, ज्यामध्ये किरॉन पोलार्डच्या नावाचा समावेश होता आणि संघाला त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. पण त्या अपेक्षापूर्ती कारण्यात्त तो अक्षरशः अपयशी ठरला. पोलार्डने 10 सामन्यात 14.33 ची सरासरी आणि 109.32 च्या स्ट्राईक रेटने केवळ 129 धावाच केल्या आहेत. तसेच गुजरात टायटन्स (Gujarat Titans) विरुद्धच्या शेवटच्या सामन्यात पोलार्ड 14 चेंडूत केवळ 4 धावाच करू शकला. (IPL 2022, MI vs GT: गुजरातवर 5 धावांनी थरारक विजयानंतर मुंबईच्या ‘पलटन’ने केले एक नंबर Celebration)

यानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राला (Aakash Chopra) वाटते की, पोलार्ड या हंगामात किमान आगामी सामन्यांमध्ये संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसणार नाही. या मोसमात पोलार्डला 10 सामन्यांत एकही अर्धशतक करू शकला नाही. दरम्यान चोप्रा म्हणाले की, MI चा स्टार अष्टपैलू खेळाडूने चालू आयपीएल हंगामात संघासाठी शेवटचा सामना खेळला असावा. माजी भारतीय फलंदाजाला असे वाटते की पोलार्ड वारंवार अपयशी ठरत आहेत, संघ कदाचित डेवाल्ड ब्रेविसला संधी देईल. “तिलक वर्मा धावबाद झाला पण त्याआधी किरॉन पोलार्ड आऊट झाला. हे एक मनोरंजक आहे, मला वाटते कीरॉन पोलार्ड या वर्षी यापुढे खेळणार नाही, तेच आहे, ते आता त्याला खेळणार नाहीत कारण डेवाल्ड ब्रेविस बाहेर बसला आहे आणि टिम डेविड चांगली कामगिरी करत आहे.”

स्पर्धेच्या सुरुवातीला केवळ दोन अपयशानंतर मुंबईने वगळलेल्या डेविडने 21 चेंडूंत दोन चौकार आणि चार षटकारांसह नाबाद 44 धावांची खेळी केली. तर MI च्या राजस्थान रॉयल्स (RR) विरुद्धच्या शेवटच्या विजयातही सिंगापूरचा खेळाडू अप्रतिम लयीत दिसला. दरम्यान, पोलार्ड चेंडूनेही प्रभाव पाडण्यात अपयशी ठरला आणि त्याने फक्त 4 विकेट घेतल्या आहेत. दुसरीकडे, टिम डेविडने दोन्ही हातांनी संधीच सोनं केलं आणि गुजरातविरुद्ध केवळ 21 चेंडूत 44 धावा चोपल्या. अशा परिस्थितीत मुंबई इंडियन्स डेविडला फिनिशर म्हणून आगामी सामने खेळतील आणि पोलार्डच्या जागी अंडर-19 फलंदाज ब्रेविसला आघाडीवर फलंदाजीला पाठवतील.