IPL 2022: सनरायझर्सच्या अखेरच्या लीग सामन्यातून Kane Williamson ची एक्झिट, ‘हे’ 3 धडाकेबाज हैदराबादचे नेतृत्व करण्याचे असतील दावेदार
न्यूझीलंडचा कर्णधार आपल्या मुलाच्या जन्मासाठी घरी परतण्यासाठी सज्ज आहे. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या त्यांच्या शेवटच्या सामन्यात, SRH ने मुंबईविरुद्ध 3 धावांनी विजय मिळवून त्यांच्या प्लेऑफच्या आशा पल्लवित ठेवल्या आणि पाच सामन्यातील पराभवाचा सिलसिलाही मोडला.
Kane Williamson IPL 2022: पंजाब किंग्ज (Punjab Kings) विरुद्धच्या रविवारी (22 मे) महत्त्वाच्या अंतिम लीग सामन्यासाठी सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघ त्यांचा प्रभावशाली कर्णधार केन विल्यमसन (Kane Williamson) शिवाय मैदानात उतरेल. न्यूझीलंडच्या कर्णधाराने या मोसमात बॅटने फारसे काही योगदान दिले नाही, परंतु त्याने ऑरेंज आर्मीचे (Orange Army) उत्तम नेतृत्व केले. त्यामुळे आता स्पर्धेच्या शेवटच्या सामन्यात फ्रॅंचायझी संघाला त्याची मोठी कमतरता जाणवेल. उल्लेखनीय म्हणजे, विल्यमसन त्याच्या दुसऱ्या मुलाच्या जन्मासाठी न्यूझीलंडला परतला आहे. विल्यमसनने गेल्या मोसमात डेविड वॉर्नरकडून कर्णधारपदाची धुरा हाती घेतली. 2018 मध्ये विल्यमसनने प्रथमच फ्रँचायझीचे नेतृत्व केले आणि त्यांना अंतिम फेरीत नेत हंगामात स्वतः सर्वाधिक धावा केल्या. तसेच 2019 आणि 2021 च्या हंगामात कर्णधार म्हणूनही त्याने कमालीची कामगिरी केली. त्याची अनुपस्थिती सनरायझर्ससाठी मोठा धक्का असेल कारण त्याचे नेतृत्व कौशल्य अतुलनीय आहे.
1. भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar)
भुवनेश्वर नेतृत्वाच्या भूमिकेसाठी अनोळखी नाही, त्याने 2019 मध्ये केन विल्यमसनच्या अनुपस्थितीत फ्रेंचायझीचे नेतृत्व केले आहे. भुवनेश्वरने या वर्षीच्या स्पर्धेत शानदार पुनरागमन केले आणि तो आयपीएल 2022 मधील सर्वोत्तम डेथ गोलंदाजांपैकी ठरला आहे. भारतीय वेगवान गोलंदाज 2019 मध्ये श्रीलंका दौऱ्यावर असंघाचा उपकर्णधार होता. त्याच्या अनुभवाचा संघाला खूप फायदा होईल.
2. निकोलस पूरन (Nicholas Pooran)
विस्फोटक त्रिनिदादियन क्रिकेटपटू खेळातील सर्वोत्कृष्ट फिनिशर्सपैकी एक आहे आणि अलीकडेच त्याची मर्यादित षटकांच्या फॉरमॅटसाठी वेस्ट इंडिजचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या धडाकेबाज फलंदाजाला सनरायझर्स संघाने 10.75 कोटींमध्ये संघात सामील केले होते, आणि त्याने जवळपास 150 च्या स्ट्राइक रेटने स्पर्धेत 300 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. केन विल्यमसनची जागा घेणे हे खूप मोठे आव्हान असू शकते पण, कर्णधार म्हणून एक उपयुक्त पर्याय ठरू शकतो.
3. एडन मार्करम (Aiden Markram)
दक्षिण आफ्रिकेचा आंतरराष्ट्रीय हा सर्वात स्टायलिश फलंदाजांपैकी एक आहे. मार्करमकडे त्याच्या फलंदाजीचा शास्त्रीय दृष्टीकोन आहे आणि तो ऑफसाइडवर शानदार स्ट्रोक खेळू शकतो, परंतु त्याची पॉवर हिटिंग अलीकडेच समोर आली आहे. 2014 आयसीसी अंडर-19 क्रिकेट विश्वचषकात त्याने दक्ष आफ्रिकेच्या अंडर-19 क्रिकेट संघाचे नेतृत्व केले आहे. तसेच त्याने 2018 मध्ये भारताविरुद्धच्या पाच वनडे सामन्यांमध्ये फाफ डु प्लेसिसच्या अनुपस्थितीत वरिष्ठ संघाचे नेतृत्वही केले आहे. त्यावेळी 23 वर्षीय मार्करम ग्रीम स्मिथनंतर दक्षिण आफ्रिकेचा वनडेत नेतृत्व करणारा दुसरा सर्वात तरुण होता.