IPL 2021: David Warner ने सामना गमावला पण मन जिंकलं, CSK विरोधात SRH कर्णधार असे बूट घालून मैदानावर उतरला, पहा व्हायरल Photo
सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नरने बुधवारी (28 एप्रिल) चेन्नई सुपर किंग्ज विरोधात विक्रमी 57 धावांची अर्धशतकी खेळी केली. वॉर्नरच्या या रेकॉर्ड-ब्रेक खेळीदरम्यान असे काहीतरी घडले ज्याने सर्वांचे मन जिंकले. तो या सामन्यात पत्नी आणि तीन मुलींची नावं लिहिलेले बूट घालून खेळताना दिसला. वॉर्नरच्या शूजवर मागील बाजूला आयवी, इंडी आणि आयला लिहिलेले होते.
IPL 2021: सनरायझर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad) कर्णधार डेविड वॉर्नरने (David Warner) बुधवारी (28 एप्रिल) चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) विरोधात विक्रमी 57 धावांची अर्धशतकी खेळी केली. आयपीएलमध्ये (IPL) 50 अर्धशतक ठोकणारा तो पहिला खेळाडू ठरला आणि टी-20 क्रिकेटमध्ये त्याने 10,000 धावा पूर्ण केल्या. सनरायझर्सने दिलेल्या 172 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात चेन्नई सुपर किंग्सने 7 विकेटने एकतर्फी विजय मिळवला. वॉर्नरच्या या रेकॉर्ड-ब्रेक खेळीदरम्यान असे काहीतरी घडले ज्याने सर्वांचे मन जिंकले. तो या सामन्यात पत्नी आणि तीन मुलींची नावं लिहिलेले बूट घालून खेळताना दिसला. वॉर्नरच्या त्याच्या पांढऱ्या रंगांच्या शूजवर मागील बाजूला आयवी (Ivy), इंडी (Indi) आणि आयला (Isla) लिहिलेले होते तर शूजवरील एका बाजूला पत्नी कँडिसचेही नाव लिहिलेले होते. (CSK vs SRH IPL 2021 Match 22: चेन्नईचा विजयी ‘पंच’, रुतुराज गायकवाड-फाफ डु प्लेसिसचे मॅच विनिंग अर्धशतकाने हैदराबादवर 7 विकेट्सने मात)
कोरोना महामारीच्या काळात घरापासून दूर, भारतात आयपीएल खेळत वॉर्नरने पत्नी आणि मुलींबाबत थोडं प्रेम दाखवण्याचा चांगला मार्ग शोधला. सनरायझर्सच्या डावादरम्यान वॉर्नरने आपले अर्धशतक पूर्ण केल्यानंतर कॅमेरामनने त्याच्या शूजवर कॅमेरा फोकस केला आणि दर्शकांचे त्याकडे लक्ष वेधले ज्यानंतर सोशल मीडियावर वॉर्नरच्या या कृतीची चांगलीच चर्चा रंगली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वॉर्नरला बर्याच वेळा पत्नी व मुलींच्या नावाचे बूट घालताना दिसला आहे. वॉर्नरच्या बुटांचे फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर जोरदार व्हायरल होत आहेत. सनरायझर्सने चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सामना गमावला असला तरी कर्णधार वॉर्नरच्या या कृतीने सोशल मीडियावर सध्या सर्वांची मनं जिंकली आहेत.
— pant shirt fc (@pant_fc) April 28, 2021
वॉर्नरने इन्स्टाग्रामवरील आपल्या नवीन पोस्टमध्ये सांगितले की, “माझा सर्वात मोठा आनंद म्हणजे माझ्या मुलींबरोबर वेळ घालवणे होय.”
View this post on Instagram
वॉर्नर आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी परदेशी फलंदाज आहे. मात्र या हंगामात त्याला बॅटने अद्याप साजेशी कामगिरी करता आलेली नाही ज्यासाठी तो ओळखला जातो. या सामन्यात त्याने 55 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 57 धावांची हळू खेळी केली. उल्लेखनीय आहे की वॉर्नरचे आपल्या मुलींसह एक विशेष बॉन्ड आहे तो नेहमीच आपल्या मुलींसह असंख्य पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर करतो. आयपीएल 2021 साठी भारत रवाना होण्यापूर्वी त्यांनी आपल्या मुलींसोबत काही वेळ घालवला होता ज्याचे फोटो देखील त्याने सोशल मीडियावर शेअर केले होते.
(The above story first appeared on LatestLY on Apr 28, 2021 11:23 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

