Mumbai Indians IPL 2021 Strength and Weakness: मुंबई इंडियन्सला रहावे लागणार सावध, या कमजोरीमुळे भंग होऊ शकते आयपीएल हॅटट्रिकचे स्वप्न

इंडियन प्रीमियर लीगच्या मेगा ऑक्शनला तीन वर्षे लोटली आहेत आणि मुंबई इंडियन्स कागदावर अजूनही बळकट संघ आहे. 2020 मधील त्यांची दमदार कामगिरी अशी यापूर्वी कधीही पाहिली नव्हती. आयपीएल मिनी-लिलावात देखील अनेक खेळाडूंची खरेदी न करताना अनेक वर्षापासून त्यांच्या मुख्य खेळाडूंना संघात ठेवले आहे जे मुंबईच्या आयपीएलमधील दबदब्याचे मुख्य कारण मानले जाते.

मुंबई इंडियन्स (Photo Credit: PTI)

Mumbai Indians IPL 2021 Strength and Weakness: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) मेगा ऑक्शनला तीन वर्षे लोटली आहेत आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) कागदावर अजूनही बळकट संघ आहे. 2020 मधील त्यांची दमदार कामगिरी अशी यापूर्वी कधीही पाहिली नव्हती. विजेतेपदासाठीचे प्रमुख दावेदार म्हणून मुंबई 9 एप्रिलपासून पुन्हा एकदा खेळपट्टीवर उतरणार आहे. जर संघ पुन्हा एकदा आयपीएल (IPL) विजेतेपद काबीज करण्यात यशस्वी झाला तर रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वातील संघ सलग तीन आयपीएल जिंकणारा पहिला संघ ठरेल. तथापि, गतविजेत्या चॅम्पियन्सकडे सर्वोत्तम डेथ गोलंदाजांसह आक्रमक फलंदाजीक्रम असला तरी, अजूनही संघात काही कमकुवत बाजू आहेत ज्यामुळे त्याचे सहाव्या विजेतेपदासह हॅटट्रिकचे स्वप्न भंग होऊ शकते. यापूर्वी ‘हिटमॅन’ रोहितच्या नेतृत्वात मुंबईने 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये आयपीएल विजेतेपदाचा मान मिळवला होता. आयपीएल मिनी-लिलावात देखील अनेक खेळाडूंची खरेदी न करताना अनेक वर्षापासून त्यांच्या मुख्य खेळाडूंना संघात ठेवले आहे जे मुंबईच्या आयपीएलमधील दबदब्याचे मुख्य कारण मानले जाते. (Mumbai Indians Playing XI: पहिल्या IPL सामन्यापूर्वी कॅप्टन रोहित शर्मापुढे 3 मोठे प्रश्न, RCB विरुद्ध ‘या’ प्लेइंग इलेव्हनसह उतरेल मुंबईची ‘पलटन’)

मुंबई इंडियन्स ताकद

मुंबई त्याच्या फलंदाजीक्रम आणि डेथ गोलंदाजीवर अवलंबून आहे. ही दोन कारणे पाच वेळा आयपीएल विजेत्या टीमला अन्य संघांपासून वेगळे बनवते. इतर संघांप्रमाणेच कर्णधार रोहित शर्मा आणि दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉकच्या रूपात मुंबईकडे सर्वोत्तम सलामी जोडी आहे. तसेच ऑस्ट्रेलियन घातक दिग्गज क्रिस लिन देखील बॅकअप म्हणून उपलब्ध आहे. त्यांच्या घातक आघाडीच्या फलंदाजीत भर घालण्यासाठी, सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन असे हुशार टी-20 खेळाडू आहेत. वेगवान गोलंदाजी विभागात, MI कडे जसप्रीत बुमराह एक उत्कृष्ट गोलंदाज आहे. आणि त्याच्या डेथ गोलंदाजीच्या कौशल्याला साथ देण्यासाठी मुंबईने न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टला दिल्ली कॅपिटल्समधून खरेदी केले. त्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा नॅथन कौल्टर-नाईल जोडा आणि तो एक शानदार वेगवान हल्ला बनते.

मुंबई इंडियन्स कमजोरी

सर्व कागदावर परिपूर्ण दिसत असले तरी नेहमी सुधारण्यासाठी जागा असते. मुंबईला त्यांच्या फिरकी विभागात सुधार कारण्याची गरज आहे. त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत, मुंबई इंडियन्सची फिरकी टीम थोडीशी हलकी आहे, विशेषत: चेपाक सारख्या खेळपट्टीसाठी जी फिरकीपटूंना अधिक सहाय्यक आहे. डावखुरा फिरकीपटू क्रुणाल हा आणखी एक प्रतिबंधात्मक पर्याय आहे. दुसरीकडे राहुल चाहरचे काम अद्याप प्रगतीपथावर आहे. अनुभवी लेगस्पिनर पीयूष चावलाला मुंबईने लिलावात खरेदी केले, पण या गोष्टींमध्ये तो कुठे फिट होईल हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. मुंबईची ए-टीम मजबूत आहे पण प्रत्येक स्थानासाठी पुरेसे बदली खेळाडू नाही आणि त्या तुलनेत बेंचवर युवा खेळाडू अधिक आहेत.

आयपीएल 2021 MI संघ: रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, ईशान किशन (विकेटकीपर), क्रिस लिन, अनमोलप्रीत सिंह, सौरभ तिवारी, आदित्य तरे, किरोन पोलार्ड, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, अनुकुल रॉय, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, राहुल चाहर, जयंत यादव, धवल कुलकर्णी, मोहसीन खान, अ‍ॅडम मिल्ने, नॅथन कोल्टर-नाईल, पियुष चावला, जेम्स नीशम, युधवीर चरक, मार्को जेन्सेन आणि अर्जुन तेंडुलकर.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement