IPL 2021: मुंबई इंडियन्सला आतापर्यंत कोणत्या 3 संघांनी सर्वाधिक वेळा चारली आहे पराभवाची धूळ माहीत आहे का?
इंडियन प्रीमियर लीग 2021 चा थरार सुरू झाला आहे आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही आयपीएलचे गतविजेत्या मुंबई इंडियन्स विरोधी संघांना कडक टक्कर देत आहे. पण आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत कोणत्या तीन संघाने मुंबई इंडियन्सविरुद्ध सर्वाधिक विजय नोंदवले आहेत याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
Mumbai Indians in IPL: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) इतिहासातील पाच वेळा विजेते मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आजवरची सर्वात यशस्वी टीम आहे. इंडियन प्रीमियर लीग 2021 चा थरार सुरू झाला आहे आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही आयपीएलचे गतविजेत्या मुंबई इंडियन्स त्यांच्या विरोधी संघांना कडक टक्कर देत आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात मुंबईची ‘पलटन’ (Paltan) नेहमीच एक उत्तम संघ सिद्ध झाला आहे ज्यांच्यामध्ये विरोधी संघाला कडक संघर्ष करवण्याची क्षमता आहे. 2013 च्या मध्यावर रोहितला पहिल्यांदा संघाच्या नेतृत्वाची जाबाबदारी सोपवण्यात आली असून त्यांनी आजवर अनेक संघांविरोधात मनोरंजक विजय मिळवले आहेत. पण आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत कोणत्या तीन संघाने मुंबई इंडियन्सविरुद्ध सर्वाधिक विजय नोंदवले आहेत याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. (IPL 2021: तिसऱ्या पराभवानंतर Mumbai Indians संघातून 'या' खळाडूच्या हकालपट्टीची मागणी; कोट्यवधी रुपयांत केले आहे रिटेन)
पंजाब किंग्स (Punjab Kings)
इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात आतापर्यंत मुंबई इंडियन्सला सर्वाधिक वेळा पराभूत करण्याचा विक्रम पंजाब किंग्सच्या नावावर आहे. पंजाब संघाने मुंबईविरुद्ध आतापर्यंत 27 सामने खेळले आहेत ज्यापैकी संघाने 13 सामने जिंकले आहेत.
दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals)
या यादीतील दुसरे मोठे नाव सध्याच्या रिषभ पंतच्या नेतृत्वात असलेल्या दिल्ली कॅपिटल्सचे आहे. दिल्ली संघाने आतापर्यंत मुंबईविरुद्ध 29 सामन्यांपैकी 13 सामने जिंकले.
चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings)
या यादीतील तिसरे नाव धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्जचे आहे. चेन्नईने आतापर्यंत मुंबईविरुद्ध 30 सामने खेळले असून 12 सामन्यात विजय मिळवले आहेत.
विशेष म्हणजे चेन्नई सुपर किंग्स आयपीएल इतिहासातील दुसरी यशस्वी टीम आहे. आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत मुंबई इंडियन्सच्या संघाने सर्वाधिक पाच वेळा आयपीएल विजेतेपद जिंकले आहे तर चेन्नईने तीन वेळा धोनीच्या नेतृत्वात आयपीएल विजेतेपदाची ट्रॉफी उंचावली आहे.