IPL 2021: मुंबई-लेग सामन्यांपूर्वी मराठमोळ्या रुतूराज गायकवाडने CSK च्या तामिळ खेळाडूंना दिले ‘मराठी 101’चे धडे, पहा गमतीशीर Video

रुतुराज गायकवाड, सई किशोर, जग्गी आणि हरी निशंक यांचे एकमेकांशी खास नातेसंबंध निर्माण झाले आहेत असे दिसत आहे. सीएसकेने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये मुंबईचा लोकल बॉय रुतुराज गायकवाड वर उल्लेख केलेल्या तीन खेळाडूंना मराठीचे धडे देताना दिसत आहे.

रुतुराज गायकवाड, सई किशोर, जग्गी आणि हरी निशंक (Photo Credit: Twitter/ChennaiIPL)

IPL 2021: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 च्या आगामी हंगामासाठी सर्व फ्रँचायझी तयारीला लागले आहे. देश-विदेशातून खेळाडू संघाशी जुळले जात आहेत. चेन्नई (Chennai), बेंगलोर, दिल्ली, अहमदाबाद, मुंबई (Mumbai) आणि कोलकाता अशा सहा ठिकाणी आयपीएलचे सामने यंदा आयोजित केले जाणार आहेत. त्यामुळे, कोणत्याही संघाला होम-ग्राउंडचा फायदा होणार नाही. चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) तब्बल 5 सामने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळणार आहेत. सीएसकेचे (CSK) युवा खेळाडू मैदानात किंवा मैदाना बाहेर प्रशिक्षण सत्राचा उत्तम उपयोग करीत आहेत. रुतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad), सई किशोर, जग्गी (Jaggi) आणि हरी निशंक (Hari Nishank) यांचे एकमेकांशी खास नातेसंबंध निर्माण झाले आहेत असे दिसत आहे. सीएसकेने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये मुंबईचा लोकल बॉय रुतुराज गायकवाड वर उल्लेख केलेल्या तीन खेळाडूंना मराठीचे धडे देताना दिसत आहे. (IPL 2021 मध्ये होणार प्रेक्षकांची ‘एंट्री’? BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिला मोठा अपडेट)

“तामिझ पासंगासाठी मराठी 101. मुंबईतसाठी टोळीला तयार करण्यासाठी रुतु आणि गुरूचा वर्ग सुरू आहे,” सीएसकने एका ट्विट पोस्टमध्ये लिहिले आहे. “आमच्या सर्वांना माहिती आहे की मुंबईत आमचे बरेच सामने आहेत. तर, मी त्यांना काही मराठी शब्द शिकवणार आहे. मी त्यांना शिकवल्याप्रमाणे त्यांचे स्वत:चे वर्णन करतील,” गायकवाड म्हणाला. “तर, सई किशोरपासून सुरुवात करूया- ‘मी मूर्ख आहे.’ जग्गी खूपच झोपाळू आहे, म्हणून त्याच्यासाठी, “मी स्लॅपफेस आहे.” आणि हरी निशांत अगदी सरळ माणूस, “मी एक सज्जन आहे.” हरी मराठी शब्द बोलत असताना रुतूराजाने हसण्याकरिता हा शब्द बदलल्याचे आढळून आले. आयपीएल 2020 च्या आपल्या पदार्पणाच्या सामन्यात रूतुराजने तीन अर्धशतकांसह 204 धावा केल्या.

सीएसके आपल्या आयपीएल मोहिमेची सुरुवात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 10 एप्रिल रोजी करतील. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आयोजित केला जाणार आहे. मागील वर्षी संघाला आयपीएलमधील निराशाजनक कामगिरीमुळे तीन वेळा आयपीएल विजेत्या चेन्नई सुपर किंग्सना गुणतालिकेत 7व्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे, यंदा धोनीच्या 'येलो आर्मी'कडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.