IPL Auction 2025 Live

IPL 2021: लिलावात मिळाला कोट्यवधींचा भाव पण ‘या’ 3 खेळाडूंना अद्याप नाही मिळाली मैदानात उतरण्याची संधी

यंदाच्या आयपीएलच्या 14व्या हंगामापूर्वी देखील लिलावाचे आयोजन करण्यात आले ज्यात अनेक खेळाडूंवर फ्रँचायझींनी कोटी रुपये मोजले. मात्र, त्यापैकी असे काही मोठे क्रिकेटपटू आहेत ज्यांना अद्याप आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली नाही.

कृष्णप्पा गौथम (Photo Credit: Instagram/gowthamyadav1)

IPL 2021: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 मध्ये 25 सामने झाले आहेत आणि प्रत्येक सामन्यात फलंदाज व गोलंदाज शानदार कामगिरी करत आहेत. आयपीएलच्या  (IPL) आयोजनापूर्वी होणाऱ्या लिलावात कोणत्या खेळाडूंवर अधिक बोली लावली जाईल याचा अंदाज बांधला जातो. आंतरराष्ट्रीय असो वा घरगुती, खेळाडूंची कामगिरी पाहून त्यांच्यावर कोट्यवधींची बोली लावली जाते. यंदाच्या आयपीएलच्या 14व्या हंगामापूर्वी देखील लिलावाचे आयोजन करण्यात आले ज्यात अनेक खेळाडूंवर फ्रँचायझींनी कोटी रुपये मोजले. मात्र, त्यापैकी असे काही मोठे क्रिकेटपटू आहेत ज्यांना अद्याप आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली नाही ज्यामुळे त्यांच्यावर कोटी रुपयांचा दाव लावला गेला आहे. अशा खेळाडूंची नावं खालीलप्रमाणे आहेत. (IPL 2021: आयपीएलमध्ये ‘या’ 3 खेळाडूंनी चोपल्या सर्वात वेगवान 5000 धावा, कोण आहेत हे खेळाडू वाचा)

1. कृष्णप्पा गौथम (Krishnapap Gowtham)

चेन्नई सुपर किंग्जने (Chennai Super Kings) कृष्णाप्पा गौथमला तब्बल 9.25 कोटी रुपये खरेदी केले. गौतम यंदाच्या आयपीएलमधील सर्वात महागडा अनकॅप्ड क्रिकेटर आहे मात्र, त्याला अद्याप एकही संधी मिळाली नाही. शिवाय, संघातील 11 खेळाडूंची कामगिरी पाहता त्याला संधी मिळणं कठीण दिसत आहे.

2. पियुष चावला (Piyush Chawla)

चेन्नई सुपर किंग्सने लिलावापूर्वी रिलीज केलेला पियुष चावला या यादीत दुसरे मोठे नाव आहे. पीयूषने 164 सामन्यात 156 विकेट्स घेतल्या आहेत. चावलावर गतविजेत्या मुंबई इंडियन्सने तब्बल 2.4 कोटी रुपयांची उधळण केली पण त्याला अद्याप संघात स्थान मिळवला आलेले नाही. शिवाय, राहुल चाहर आपल्या फिरकीने संघासाठी मोठे योगदान देत असताना चावलाला यंदा बेंचवर बसून राहावे लागेल असे दिसत आहे.

3. डेविड मलान (Dawid Malan)

टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा नंबर 1 फलंदाज मलानला पंजाब किंग्सने तब्बल 1.5 कोटी रुपयात संघात स्थान दिले होते. निकोलस पूरनच्या अपयशानंतरही संघाने त्याच्यावर विश्वास दाखवला आणि मलानला संधी दिली नाही. त्यामुळे, मलानला आयपीएलमध्ये पदार्पणासाठी अद्याप आणखी प्रतीक्षा करावी लागेल असे दिसत आहे.