IPL 2021: मुंबई इंडियन्सला KKR च्या ‘या’ अष्टपैलू खेळाडूकडून सर्वात मोठा धोका, शेवटच्या लढतीत 2 ओव्हरमध्ये काढल्या होत्या 5 विकेट्स
इंडियन प्रीमियर लीग 2021 च्या यूएई आवृत्तीच्या पाचव्या सामन्यात आणि स्पर्धेच्या 34 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सची पलटन कोलकाता नाईट रायडर्सशी भिडणार आहे. जेव्हा हे दोन्ही संघ मैदानावर एकमेकांविरुद्ध आले होते, तेव्हा रोहित शर्माच्या पलटणने प्रत्येक वेळी बाजी मारली. मात्र, केकेआरचा स्टार अष्टपैलू आंद्रे रसेलने अवघ्या दोन षटकांत मुंबईचा फलंदाजी क्रम नष्ट केला होता.
इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 च्या यूएई (UAE) आवृत्तीच्या पाचव्या आणि स्पर्धेच्या 34 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) पलटन कोलकाता नाईट रायडर्सशी (Kolkata Knight Riders) भिडणार आहे. मुंबईला स्पर्धेतील शेवटच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जच्या हातून पराभवाला सामोरे जावे लागले, तर इयन मॉर्गनच्या संघाने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला एकतर्फी सामन्यात 9 गडी राखून पराभूत केले. या हंगामात जेव्हा हे दोन्ही संघ मैदानावर एकमेकांविरुद्ध आले होते, तेव्हा रोहित शर्माच्या पलटणने प्रत्येक वेळी बाजी मारली. मात्र, केकेआरचा (KKR) स्टार अष्टपैलू आंद्रे रसेलने (Andre Russell) अवघ्या दोन षटकांत मुंबईचा फलंदाजी क्रम नष्ट केला. अशा परिस्थितीत, गतविजेत्याला कोलकाताच्या या खेळाडूशी अत्यंत सावधगिरी बाळगावी लागेल. तसेच आंद्रे रसेलने बेंगलोरविरुद्ध शेवटच्या सामन्यात अप्रतिम गोलंदाजी केली आणि आपल्या 3 ओव्हरमध्ये फक्त 9 धावा देऊन तीन मोठ्या विकेट्स घेतल्या होत्या. अशा स्थितीत रसेल केकेआरसाठी ट्रम्प कार्ड तर मुंबईसाठी धोकादायक ठरू शकतो. (IPL 2021 MI vs KKR Match 34: केकेआरविरुद्ध मोठ्या विक्रमापासून रोहित शर्मा फक्त 18 धावा दूर, IPL मध्ये ‘हा’ विक्रम करणारा बनेल पहिलाच फलंदाज)
आयपीएल 2021 मध्ये मुंबईविरुद्ध खेळलेल्या 5 व्या सामन्यात रसेलने फक्त 2 ओव्हरमध्ये 15 धावा देऊन पाच विकेट्स घेतल्या. यादरम्यान त्याने किरोन पोलार्डला देखील पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. मात्र, रसेल त्या सामन्यात फलंदाजीने काही विशेष दाखवू शकला नाही आणि 15 चेंडूंचा सामना केल्यानंतर केवळ 9 धावाच करू शकला. पहिल्या फलंदाजी करताना मुंबई संघ रसेलच्या शानदार गोलंदाजीपुढे 152 धावांवर ढेर झाला. प्रत्युत्तरात केकेआरचे फलंदाज 153 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यात अपयशी ठरले आणि 7 गडी गमावून केवळ 142 धावाच करू शकले. दोन्ही संघ यापूर्वी 28 वेळा आयपीएल इतिहासात आमनेसामने आले होता. यामध्ये मुंबई इंडियन्सचाच वरचष्मा राहिला. मुंबईने 22 तर कोलकाताने फक्त 6 सामने जिंकले. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा आयपीएल 2021 मध्ये सात सामन्यांत 250 धावांसह संघासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. तथापि, या सामन्यात खेळण्यावर अद्याप पुष्टी झालेली नाही. त्यामुळे मुंबईच्या दलात सध्या अनिश्चततेचे वातावरण असेल.
दुसरीकडे, बेंगलोरविरुद्ध शेवटच्या सामन्यात केकेआर गोलंदाजांची कामगिरी उत्कृष्ट होती. वरुण चक्रवर्ती आणि रसेलच्या जोडीसमोर आरसीबीचे फलंदाजांनी गुडघे टेकले आणि संघाला केवळ 92 धावा करता आल्या. फलंदाजीमध्ये शुभमन गिल आणि पदार्पणवीर व्यंकटेश अय्यर यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आणि केवळ 10 ओव्हरमधेच संघाला विजय मिळवून दिला होता. त्यामुळे पुन्हा एकदा या दोघांवर संघाला चांगली सुरुवात करून देण्याची जबाबदारी असेल.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)