IPL 2021: PBKS विरोधात हुशारी दाखवणाऱ्या Kieron Pollard वर भडकले नेटकरी, मुंबई इंडियन्स फलंदाजाने केले सूचक Tweet

मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू किरोन पोलार्ड ट्विटर यूजर्सच्या रडारवर आला आहे. पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यात फलंदाजी वेळी पोलार्ड पंजाबचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने चेंडू टाकण्याच्या पूर्वीच नॉन-स्ट्रायकर क्रीज सोडली. पोलार्डच्या या कृतीवर यूजर्स भडकले यांनी त्याला खडेबोल सुनावले आणि क्लास घेतली. यादरम्यान पोलार्डने सूचक ट्विट करत प्रतिक्रिया दिली. 

कीरोन पोलार्ड (Photo Credit: PTI)

मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) अष्टपैलू किरोन पोलार्ड (Kieron Pollard) ट्विटर यूजर्सच्या रडारवर आला आहे. चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर पंजाब किंग्स (Punjab Kings) आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यात फलंदाजी वेळी पोलार्ड पंजाबचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने (Mohammed Shami) चेंडू टाकण्याच्या पूर्वीच नॉन-स्ट्रायकर क्रीज सोडली. मुंबई इंडियन्सच्या डावातील शेवटच्या षटकातील दुसऱ्या बॉलवर ही घटना घडली जेव्हा पोलार्ड शमीच्या गोलंदाजीपुढे नॉन-स्ट्रायकरच्या दिशेला उभा होता आणि कृणाल पांड्या फलंदाजी करत होता. पोलार्डच्या या कृतीवर यूजर्स भडकले यांनी त्याला खडेबोल सुनावले आणि क्लास घेतली. मुंबईचा स्टार अष्टपैलू खेळाडू कीरोन पोलार्डने एक सूचक ट्विट केले जे काहीतरी झाले असल्याचं दाखवत आहे. (IPL 2021: यंदाच्या सीजनमध्ये Mumbai Indians चे ‘हे’ 3 मॅच विनर खेळाडू ठरत आहे ‘सुपर फ्लॉप’, दाखवला पाहिजे बाहेरचा रस्ता)

शमीने बॉलिंग करण्यापूर्वी पोलार्डने क्रीज सोडली ज्यामुळे पंजाबच्या वेगवान गोलंदाजाकडे त्याला ‘मंकडींग’ पद्धतीने आऊट करण्याची संधी होती पण तसे झाले नाही. तथापि, चाहत्यांनी आणि भाष्यकारांनी पोलार्डने केलेली ही कृती लक्षात घेतली आणि लगेचच सोशल मीडियावर त्याला खडेबोल सुनावण्यास सुरवात केली. एका चाहत्याने अगदी निदर्शनास आणून दिले की यापूर्वी पोलार्ड शिखर धवनला ‘मंकड’ आऊट करू पहात होता आणि आता तो स्वत: देखील तेच करत आहे. यादरम्यान पोलार्डने ट्विट शेअर केले ज्यामध्ये म्हटले की, “मी प्रतिक्रिया देत नाही याचा अर्थ असा नाही की माझ्या लक्षात आले नाही.” “वस्तुनिष्ठ असल्याचे समजा अशा व्यक्तींवर प्रेम करा. हास्यास्पद!” असं कॅप्शन देत पोलार्डने फोटो शेअर केला.

दरम्यान, आयपीएल 2021 मधील मुंबई इंडियन्सच्या मागील सामन्याबद्दल बोलायचे तर पहिले फलंदाजी करताना त्यांना चेपॉकच्या कठीण खेळपट्टीवर फक्त 131 धावांपर्यंत मजल मारता आली. रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी आवश्यक धावा केल्या पण अन्य फलंदाजांकडून त्यांना कसलीही मदत मिळाली नाही. प्रत्युत्तरात पंजाब किंग्सने 1 विकेट गमावून एकतर्फी विजय मिळवला. केएल राहुल आणि क्रिस गेलने संघाची प्रमुख जबाबदारी स्वीकारली ज्याच्यापुढे मुंबईची गोलंदाजी फलंदाजी शोप्रमाणेच अगदी सामान्य दिसली.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now