IPL 2021 Mid-Season Transfer: आयपीएलच्या ट्रांसफर विंडोद्वारे Mumbai Indians ‘या’ 3 खेळाडूंना करू शकतात टार्गेट, विरोधी संघावर पडू शकतात भारी

याद्वारे मुंबई इंडियन्स स्वतःसाठी अन्य संघातील खेळाडूंना टार्गेट करून फायदा करून घेऊ शकतात. मुंबईसाठी त्यांची मधली फळी सध्या चर्चा विषय बनली आहे त्यामुळे पहा कोणते खेळाडू मुंबईसाठी तारणहार बनू शकतात.

मुंबई इंडियन्स (Photo Credit: PTI)

IPL 2021 Mid-Season Transfer: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 14व्या मोसमात गतविजेत्या मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) सुरुवात अपेक्षेनुसार सुरुवात झाली नाही. पाच वेळा आयपीएल (IPL) विजेत्या मुंबईला 5 सामन्यांपैकी 2 सामन्यातच विजय मिळवता आला असून पॉईंट्स टेबलमध्ये ते सध्या 4 गुणांसह चौथ्या स्थानावर आहेत. कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि राहुल चाहरला वगळता संघातील अन्य तडाखेबाज खेळाडू सध्या संघर्ष करताना दिसत आहे जी संघासाठी एक मोठी डोकेदुखी ठरली आहे. अशास्थितीत आयपीएल 2021 साठी खेळाडूंचे मिड-सीजन ट्रांसफर (IPL Transfer Window) सुरु झाले आहे. याद्वारे मुंबई इंडियन्स स्वतःसाठी अन्य संघातील खेळाडूंना टार्गेट करून फायदा करून घेऊ शकतात. मुंबईसाठी त्यांची मधली फळी सध्या चर्चा विषय बनली आहे त्यामुळे पहा कोणते खेळाडू मुंबईसाठी तारणहार बनू शकतात. (IPL 2021: आयपीएल सीजन 14 च्या मध्यात Mumbai Indians ची साथ सोडून ‘हा’ धाडक खेळाडू विराटच्या RCB ताफ्यात झाला सामील)

1. जगदीश सुचित

2020 च्या संपूर्ण आयपीएलमध्ये क्रुणाल पांड्याचा स्लो फॉर्म मुंबईकरांना चिंतेचे कारण ठरली आहे. मुंबईने 2018 च्या मेगा लिलावात 8.8 कोटी रूपात रिटेन केलेल्या कृणालने यंदाच्या पाच सामन्यात 29 धावा केल्या असून फक्त 3 विकेट्स काढल्या आहेत. मुंबई नक्कीच क्रुणालच्या बॅकअपच्या शोधात असेल आणि जगदीश सूचित हा एक उत्तम पर्याय उपलब्ध आहे. सूचितने मुंबईकडूनच आयपीएल करिअरची सुरुवात केली, पण 2019 तो दिल्ली संघात सामील झाला त्यानंतर 2020 मध्ये त्याला पंजाब संघात ट्रेड करण्यात आले. सध्या 2021 मोसमात सनरायझर्स कडून खेळणाऱ्या सूचितने दोन सामने खेळे असून 14 धावा केल्या आहेत. सूचितने 17 आयपीएल सामन्यात 12 विकेट्स घेतल्या आहेत.

2. सॅम बिलिंग्ज

बिलिंग्ज हा इंग्लंडचा एक मध्यमगती फलंदाज असून त्याला यंदा आयपीएलमध्ये अद्याप खेळण्याची संधी मिळालेली नाही. कर्णधार रोहित आणि सूर्यकुमारवर जास्त अवलंबून असणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी तो मधल्या फळीत उत्तम पर्याय ठरेल. इंग्लंडसाठी एकदिवसीय क्रिकेट सामन्यात बिलिंग्जने चांगली सुरुवात केली आहे आणि सरासरी 35 व स्ट्राईक रेट 93 चा आहे.

3. लोकी फर्ग्युसन

न्यूझीलंडचा तडाखेबाज लोकी फर्ग्युसन या यादीत दुसरे मोठे नाव आहे. मागील वर्षी कोलकाता नाईट रायडर्सकडून युएईचं मैदान गाजवणाऱ्या फर्ग्युसनला अद्याप केकेआरसाठी खेळण्याची संधी मिळालेली नाही. मुंबई संघात सध्या बॅटिंगने संघर्ष करणाऱ्या आणि गोलंदाजी करू न शकणाऱ्या हार्दिक पांड्याच्या जागी फर्ग्युसन एक उपयुक्त पर्याय ठरू शकतो. लोकीने मागील वर्षी आयपीएलच्या 5 सामन्यात 6 विकेट्स घेतल्या होत्या. शिवाय, तो गरज पडल्यास बॅटिंगने संघात योगदान देऊ शकतो.