IPL 2021: आयपीएलच्या चौदाव्या हंगामात 'या' भारतीय खेळाडूंनी गाजवले मैदान; पाहा मेन ऑफ द मॅच मिळवलेल्या क्रिकेटपटूंची यादी
आयपीएलच्या चौदाव्या हंगामात आतापर्यंत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या दोन जणांना अद्याप भारतीय संघात स्थान मिळालेले नाही.
भारतात सर्वात लोकप्रिय असलेली इंडियन प्रिमअर लीगच्या चौदाव्या हंगामाला (IPL 14) 9 एप्रिलपासून सुरुवात झाली आहे. या हंगामात आतापर्यंत रॉयस चॅलेंजर्स (RCB) विरुद्ध मुंबई इडियन्स (MI), चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि सनराइज हैदराबाद (SRH) विरुद्ध कोलकाता नाईट राईडर्स (KKR) असे 3 सामने पार पडले आहेत. या हंगामातील तिन्ही सामन्यात भारतीय खेळाडूंनी (Indian Players) उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली आहे. यामुळे या तिन्ही सामन्यात भारतीय खेळाडूला मेन ऑफ द मॅच घोषीत केले आहे. आयपीएलच्या इतिहाचात पहिल्यांदाच असे घडले आहे. हे देखील वाचा- How to Download Hotstar & Watch RR Vs PBKS IPL 2021 Match 4: राजस्थान रॉयल विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यातील आयपीएल सामना पाहण्यासाठी हॉटस्टार कसे डाउनलोड कराल? घ्या जाणून
हर्षल पटेल ( आरसीबी)
आयपीएलच्या या हंगामात मेन ऑफ द मॅच मिळवणारे 2 खेळाडू अद्यापही भारतीय संघात खेळाले नाहीत. या हंगामात भारतीय संघाचे फलंदाज आणि गोलंदाज दोन्हीही जबरदस्त फॉर्ममध्ये असल्याचे दिसत आहे. या हंगामातील पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा गोलंदाज हर्षल पटेलने मुंबई इंडियन्स विरुद्ध चांगली गोलंदाजी केली होती. त्याने 27 धावा देऊन पाच विकेट पटकावले होते. ज्यामुळे त्याला मेन ऑफ द मॅच घोषित केले होते.
शिखर धवन (दिल्ली कॅपिटल्स)
चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आयपीएलचा दुसरा सामना खेळला गेला होता. या सामन्यात दिल्लीच्या संघाने विजय मिळवला. तसेच या सामन्यात आक्रमक फलंदाजी करत सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या शिखर धवन याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला होता. त्याने या सामन्यात 85 धावांची तडाखेबाज फलंदाजी केली होती.
नितीश राणा ( कोलकाता नाईट राईडर्स)
त्यानंतर तिसऱ्या मॅचमध्ये तडाखेबाज फलंदाजी करणाऱ्या कोलकाता नाईट राईडर्सच्या फलंदाज नितीश राणासा मॅन ऑफ द मॅच मिळाली आहे. त्याने सनराइजर्स हैदराबाद विरुद्ध 56 चेंडूत 80 धावांची धमाकेदार फलंदाजी केली होती.
आयपीएलच्या चौदाव्या हंगामात आतापर्यंत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या दोन जणांना अद्याप भारतीय संघात स्थान मिळालेले नाही. नितीश राणा आणि हर्षल पटेल अजूनही भारतीय संघाकडून कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेले नाहीत. नितीश राणाने आयपीएलच्या गेल्या हंगामात आक्रमक फलंदाजी केली होती.