IPL 2021 Suspended: आयपीएल 14 चे उर्वरित सामने झाल्यास हे खेळाडू होणार ‘आऊट’, बोर्डाने केले मोठे विधान
दरम्यान, स्पर्धेचे आयोजन करण्याच्या मार्गावर एक मोठी माहिती समोर येत आहे ज्यामुळे बीसीसीआयला फटका बसू शकतो. आयपीएलचे उर्वरित सामन्यांचे आयोजन झाल्यास इंग्लंडचे खेळाडू स्पर्धेत भाग घेऊ शकणार नाहीत.
IPL 2021 Suspended: कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) प्रादुर्भावामुळे आयपीएल 2021 (IPL) अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले आहे आणि बीसीसीआय (BCCI) सध्या आयपीएल 2021 मधील उर्वरित सामने पूर्ण करण्यासाठी योग्य वेळ व ठिकाण निवडण्याच्या तयारीत आहेत. शिवाय, आता या स्पर्धेचे उर्वरित सामने यंदा पूर्ण होतील की नाही हे आता स्पष्ट झाले नाही कारण यंदा भारतात आयपीएलच्या उर्वरित सामन्यांचे आयोजन कठीण असल्याचं बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. दरम्यान, स्पर्धेचे आयोजन करण्याच्या मार्गावर एक मोठी माहिती समोर येत आहे ज्यामुळे बीसीसीआयला फटका बसू शकतो. आयपीएलचे उर्वरित सामन्यांचे आयोजन झाल्यास इंग्लंडचे खेळाडू (England Cricketers) स्पर्धेत भाग घेऊ शकणार नाहीत. (IPL 2021 Resumption: आयपीएल पुन्हा सुरु करण्याबाबत सौरव गांगुलीने दिले संकेत, न झाल्यास होणार हजारो कोटींचं नुकसान)
“आम्ही इंग्लंडच्या सामन्यांमध्ये खेळाडूंच्या सहभागाबाबत विचार करीत आहोत. आम्हाला संपूर्ण एफटीपी वेळापत्रक मिळालं आहे. म्हणून जर पाकिस्तान आणि बांग्लादेश दौरे [सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये] पुढे जात असतील तर मी तिथे खेळाडूंनी असावे अशी अपेक्षा करतो,” इंग्लंडचे पुरुष क्रिकेटचे संचालक अॅश्ले जाईल यांनी ब्रिटीश माध्यमांना सांगितले. बीसीसीआय सप्टेंबरमध्ये विंडो शोधत आहे- भारताविरुद्ध घेरलू मालिका किंवा टी-20 वर्ल्ड कप- किंवा किंवा नोव्हेंबरमध्ये टी-20 विश्वचषक संपल्यानंतर, इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्ड (ईसीबी) फ्यूचर टूर्स प्रोग्राम (एफटीपी) मध्ये दिलेल्या कडक कसोटीचे वेळापत्रक पाळण्यासाठी इच्छूक आहे. इंग्लंड न्यूझीलंडविरुद्ध 2-14 जून रोजी दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी मैदानात उतरेल आणि आयपीएल औपचारिक करार झाल्यामुळे आयपीएल खेळाडूंना अपवाद म्हणून कसोटी मालिका वगळण्याची परवानगी देण्यात आली असल्याचे जाईल्स यांनी सांगितले.
दरम्यान, भारताविरुद्ध पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेनंतर इंग्लंड सप्टेंबर महिन्यात बांग्लादेश दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर ते ऑक्टोबरच्या मध्यात पाकिस्तानसाठी रवाना होतील. त्यानंतर ते ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्ड भाग घेतली आणि 8 डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या अॅशेस मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौर्यावर जातील. तसेच बोर्डाला आपल्या खेळाडूंची काळजी वाटते जेणेकरून त्यांना जास्त मानसिक आणि शारीरिक थकवा येऊ नये. बीसीसीआयसाठी ही चांगली चिन्हे नाहीत. बीसीसीआय आणि आयपीएल संघांचे बरेच नुकसान होऊ शकते. यंदा आयपीएलचे उर्वरित सामने केव्हा आणि कुठे घेतले जातील याबाबत बीसीसीआय लवकरच निर्णय घेईल असे अपेक्षित आहे.