IPL 2021 Auction: अनकॅप्ड K Gowtham याच्यासाठी या संघाने लावली तब्बल 9.25 कोटींची बोली, रचला इतिहास

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 2021 लिलावात गुरुवारी चेन्नई सुपर किंग्जने (सीएसके) अनकॅप्ड भारतीय अष्टपैलू क्रिकेटपटू कृष्णाप्पा गौथमला तब्बल 9.25 कोटी रुपयां खरेदी केले. इंग्लंडच्या अष्टपैलू खेळाडू मोईन अलीला 7 कोटी रुपयांत ताफ्यात समावेश केल्यानंतर सीएसकेने गौथमच्या रुपात लिलावात दुसरी मोठी खरेदी केली.

कृष्णप्पा गौतम (Photo Credit: Facebook)

IPL 2021 Auction: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 2021 लिलावात गुरुवारी चेन्नई सुपर किंग्जने (Chennai Super Kings) अनकॅप्ड भारतीय अष्टपैलू क्रिकेटपटू कृष्णाप्पा गौथमला (Krishnappa Gowtham) तब्बल 9.25 कोटी रुपयां खरेदी केले. इंग्लंडच्या अष्टपैलू खेळाडू मोईन अलीला 7 कोटी रुपयांत ताफ्यात समावेश केल्यानंतर सीएसकेने गौथमच्या रुपात लिलावात दुसरी मोठी खरेदी केली. कर्नाटककडून खेळणारा गौतम गेल्या मोसमात पंजाब किंग्ज संघात सहभागी झाला होता पण त्याला लिलावापूर्वी फ्रँचायझीने रिलीज केले. सीएसकेने 9.25 कोटी रुपयांत त्याला आपल्या ताफ्यात समावेश केल्याने गौतम आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा अनकॅप्ड भारतीय खेळाडू बनला आहे. गुरुवारी लिलावात गौतमचे नाव जाहीर झाल्यानंतर सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्सने जोरदार झुंज पाहायला मिळाली. सीएसकेने देखील यात उडी घेतली आणि अखेर हैदराबादला मागे टाकत 9.25 कोटी रुपयांत खरेदी केले. (IPL 2021 Auction: Shah Rukh Khan याला पंजाब किंग्सने मोजले 5 कोटी 25 लाख रुपये, फ्रँचायझी मालक प्रिती झिंटाची अमूल्य रिअक्शन पहा)

यापूर्वी चेन्नई सुपर किंग्जने ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल मिळविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला होता परंतु, आरसीबीने ऑस्ट्रेलियन अष्टपैलूसाठी 14.25 कोटी रुपयांची बोली लावल्यानंतर त्यांना शर्यतीतून बाहेर पडावे लागले. त्यानंतर सीएसके मोईनचा समावेश केला, जो संघात मॅक्सवेलप्रमाणेच कौशल्य आणू शकतो. केदार जाधवला रिलीज केल्यानंतर गौतम सीएसकेच्या फलंदाजीमध्ये आणखी भर घालू शकतो आणि त्यांच्या खालच्या-मधल्या ऑर्डरमध्ये तुफान फलंदाजांची कमतरता पूर्ण करेल. गौतम 20 लाख रुपयांच्या बेस प्राईससह लिलावात उतरला होता. गौतमने आजवर एकही अनंतरराष्ट्रीय सामना खेळला नसून तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये कर्नाटकचे प्रतिनिधित्व करतो. यापूर्वी, गौतमने आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. अनकॅप्ड खेळाडूंमध्ये गौतमसह तामिळनाडूचा स्टार फलंदाज शाहरुख खाननेही मोठी रक्कम आकर्षित केली. शाहरुखचा 5.25 कोटीच्या मोठ्या बोलीसह पंजाब किंग्सने आपल्या गोट्यात समावेश केला.

सीएसकेने 2021 च्या लिलावाआधी सहा खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला होता ज्यात केदार जाधव आणि पियुष चावला यांच्यासारख्या मागील संघातील काही प्रमुख खेळाडूंचा समावेश होता. मागील वर्षी तडकाफडकी स्पर्धेतून बाहेर पडणाऱ्या सुरेश रैनाचे स्थान कायम राहिले असून त्याच्या संघात असलेल्या स्थानाविषयीचे अनुमान वर्तवले जात होते.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now