IPL 2021: आयपीएलमध्ये Glenn Maxwell याची क्रेझ अद्यापही कायम, या 3 संघांमध्ये असेल चुरस

मॅक्सवेल अखेरपर्यंत संपूर्ण स्पर्धेत एकही षटकार ठोकू शकला नाही. आयपीएलनंतर ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर टीम इंडियाविरुद्ध मॅक्सवेलने अनेक आतिशी खेळी खेळली. अशा स्थितीत मॅक्सवेलचा स्फोटक डाव पाहून अनेक संघ त्याच्यावर मोठा दाव लावण्याचा प्रयत्न करू शकतात.

ग्लेन मॅक्सवेल (Photo Credit: Twitter)

IPL 2021 Auction: संयुक्त अरब अमिराती येथे इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 13व्या सत्रात ऑस्ट्रेलियन अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलची (Glenn Maxwell) बॅट पूर्णपणे शांत होती. मॅक्सवेल अखेरपर्यंत संपूर्ण स्पर्धेत एकही षटकार ठोकू शकला नाही. शिवाय, मॅक्सवेलला केवळ 13.42 च्या सरासरीने 13 सामन्यांच्या 11 डावांत 108 धावाच करता आल्या. गोलंदाजीने देखील तो फारसे योगदान देऊ शकला नाही. त्याने 13 सामन्यांच्या सात डावांत फक्त तीन विकेट घेतल्या. परिणामी किंग्ज इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) संघाने त्याच्या निराशाजनक कामगिरीच्या पार्श्वभूमीवर आयपीएलच्या 14व्या मोसमासाठी त्याच्याशी करार संपुष्टात आणला आहे. लक्षात घेण्यासारखे म्हणजे आयपीएलनंतर ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर टीम इंडियाविरुद्ध मॅक्सवेलने अनेक आतिशी खेळी खेळली. अशा स्थितीत मॅक्सवेलचा स्फोटक डाव पाहून अनेक संघ त्याच्यावर मोठा दाव लावण्याचा प्रयत्न करू शकतात. (IPL 2021 Auction: भारताविरुद्ध मालिका पराभवानंतर आयपीएल मध्येही ऑस्ट्रेलियाची घसरण! स्मिथ, मॅक्सवेल, फिंच, पॅटिन्सन यांना फ्रँचायझींचा ‘बाय-बाय’)

अशास्थितीत, आयपीएल 2021 मध्ये ग्लेन मॅक्सवेलसाठी तीन संघात चुरस रंगू शकते जे खालीलप्रमाणे आहेत:

1. चेन्नई सुपर किंग्ज

आयपीएलच्या 13व्या सत्रात चेन्नईच्या संघात फलंदाजाची कमतरता स्पष्ट दिसून आली जो खालच्या फळीत येऊन जोरदार फटके मारू शकेल. मॅक्सवेलची तुफान फलंदाजी सर्वानाच माहित आहे आणि जर त्याची बॅट चालली तर तो विरोधी संघावर भारी पडू शकतो. अशास्थितीत चेन्नई सुपर किंग्जचा त्याला संघात सामील करण्यासाठी जोरदार प्रयत्न करू शकते.

2. सनरायझर्स हैदराबाद

हैदराबाद संघात सध्या बड्या खेळाडूंची कमतरता आहे. डेव्हिड वॉर्नर, जॉनी बेअरस्टो आणि केन विल्यमसन यांच्या व्यतिरिक्त संघात मॅच-विनरची गरज आहे. त्यामुळे, जर मॅक्सवेलची हैदराबाद संघात एंट्री झाली तर संघाला मोठा फायदा होऊ शकतो.

3. दिल्ली कॅपिटल्स

आयपीएलच्या 13व्या सत्रात दिल्लीपुढे देखील मधल्या फळीतील फलंदाजाची समस्या होती. श्रेयस ईयर, रिषभ पंत यांच्यानंतर खालच्या फळीत आक्रमक फलंदाजाची वेगवान धावा करण्यासाठी त्यांना आवश्यकता होती. संघाने कॅरेबियन युवा फलंदाज शिमरॉन हेटमायरचा समावेश केला, पण हंगामात तो फ्लॉप ठरला. अशा स्थितीत दिल्ली मॅक्सवेलला संघात सामील करत संघ अजून मजबूत करू शकतो.

दरम्यान, मॅक्सवेलने आयपीएल करिअरमध्ये 82 सामन्यात 22.1 च्या सरासरीने 1505 धावा केल्या आहेत. त्याने आयपीएलमध्ये सहा अर्धशतकं केली आहेत. गोलंदाजीत त्याने 50 डावात 19 विकेट घेतल्या आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif