IPL 2021: ‘या’ किवी खेळाडूला KKR प्लेइंग इलेव्हन संधी मिळत नसल्याने भारतीय दिग्ग्जही चकित, भारतीय खेळपट्ट्यांवर ठरू शकतो ट्रम्प कार्ड
इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) एकापाठोपाठ एक लाजीरवाणी पराभव टाळण्यासाठी भारताचा माजी गोलंदाज अजित आगरकरने कोलकाता नाईट रायडर्सला (केकेआर) लवकरात लवकर त्यांची प्लेइंग इलेव्हन निश्चित करण्याचा सल्ला दिला आहे. आगरकरने म्हटले, “त्यांनी प्लेइंग इलेव्हनमध्ये लोकी फर्ग्युसनसारख्या एखाद्याकडे बघितलं पाहिजे, मग ते मॉर्गन, पॅट कमिन्स किंवा सुनील नारायणला बाहेर करून का असो.”

IPL 2021: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये एकापाठोपाठ एक लाजीरवाणी पराभव टाळण्यासाठी भारताचा माजी गोलंदाज अजित आगरकरने (Ajit Agarkar) कोलकाता नाईट रायडर्सला (Kolkata Knight Riders) लवकरात लवकर त्यांची प्लेइंग इलेव्हन निश्चित करण्याचा सल्ला दिला आहे. शनिवारी वानखेडे स्टेडियमवर कोलकाता फ्रँचायझीने राजस्थान रॉयल्सकडून सहा गडी राखून पराभव पत्करावा लागला. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज क्रिस मॉरिसने चार विकेट्स कोलकाताचा मध्यक्रम गुंडाळला ज्यामुळे केकेआरला सलग तिसऱ्या पराभवाचं तोंड पाहावं लागलं. आगरकर म्हणाले, “फलंदाजीक्रम प्रतिभांनी भरलेली आहे, क्षमतांनी भरलेली आहे. ते फक्त चांगले खेळत नाहीत. तुम्ही चेन्नईतील खेळपट्टयांवर खापर फोडू शकता आणि म्हणू शकता की, अरे ही एक कठीण विकेट होती आणि कदाचित म्हणूनच त्याला त्याची लय मिळाली नाही. पण इथे (मुंबईत) तुम्हाला तसे निमित्त मिळत नाही.” (RR vs KKR IPL 2021 Match 18: मॉरिस-सॅमसनचा कोलकाताला दे धक्का, राजस्थान रॉयल्सचा 6 विकेटने विजय)
एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात 288 विकेट्स घेतलेल्या आगरकरने म्हटले, “कदाचित ही दोनशे धावांची खेळपट्टी नव्हती परंतु त्यांना (केकेआर) 160 पर्यंत जाण्याची क्षमता आहे हे निश्चितपणे एक सामना मॅच-विनर धावसंख्या आहे. आणि जर तुम्ही माझं मत घेत असाल तर त्यांनी प्लेइंग इलेव्हनमध्ये लोकी फर्ग्युसनसारख्या (Lockie Ferguson) एखाद्याकडे बघितलं पाहिजे, मग ते इयन मॉर्गन किंवा पॅट कमिन्स किंवा सुनील नारायणला बाहेर करून का असो. तो असा खेळाडू आहे जो या खेळपट्ट्यांवर सामना तुम्हाला जिकून देऊ शकतो.” माजी वेगवान गोलंदाज म्हणाला, “गेल्या हंगामात लोकी फर्ग्युसन जेव्हा युएईमध्ये संघात आला तेव्हा तुम्हाला दिसले होते की त्याने गोलंदाजी हल्ल्याला वेगळी दिशा दिली होती. त्याच्याकडे खूप वेग आणि विकेट घेण्याची क्षमता होती. फर्ग्युसनकडे विकेट घेण्याची क्षमता आहे.”
न्यूझीलंडचा घातक गोलंदाज फर्ग्युसनने 69 एकदिवसीय विकेट (37 सामने) आणि 24 टी-20 विकेट्स (13 सामने) घेतल्या आहेत. केकेआरचा निर्णय घेण्याचा मुद्दा आहे का आणि याचा खेळाडूंवर परिणाम होत आहे का, असे विचारले असता दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन म्हणाला की, “त्यांनी (या हंगामात) खेळलेल्या पहिल्या (आयपीएल) सामन्यात त्यांच्याकडे काही आश्चर्यकारक रणनीती होती. त्यानंतर, काही धोरणे आणि योजना पूर्ण झाल्या नाहीत आणि आता खेळाडूंना त्यांची भूमिका काय आहे याबद्दल प्रश्न पडेल दिसत आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)