IPL 2021: MS Dhoni याच्यानंतर हे 3 बनू शकतात CSK चे कर्णधार, बॅटिंग-फिल्डिंगने गाजवत आहे मैदान

कर्णधार म्हणून धोनीने जे साध्य केले त्याची कधीही बरोबरी होणे शक्य नाही परंतु पुढील कर्णधाराची नियुक्ती करण्यासाठी चेन्नई सुपर किंग्ज सध्याच्या संघाकडून काही संभाव्य नावं आपण पाहणार आहोत.

एमएस धोनी, सीएसके कर्णधार (Photo Credit: PTI)

भारताचा वर्ल्ड कप विजेता माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) जेव्हा आयपीएलमधून (IPL) निवृत्त होईल तेव्हा आहे तेव्हा चेन्नई सुपर किंग्जसाठी (Chennai Super Kings) डोकेदुखी नक्कीच सिद्ध होईल. धोनीने आजवर या फ्रँचायझीसाठी कर्णधार आणि फिनिशरची भूमिका बजावली आहे. धोनी हा भारताच्या महान कर्णधारांपैकी एक आहे आणि त्याने आतापर्यंतच्या कर्णधारपदाच्या कारकीर्दीत आयसीसीची (ICC) सर्व प्रतिष्ठित ट्रॉफी जिंकल्या आहेत. धोनीच्या नेतृत्वात, सीएसकेने  (CSK) उद्घाटन आवृत्तीपासून प्लेऑफमध्ये प्रवेश केला असून मागील सत्रात पहिल्यांदा सीएसके नॉकआउट फेरीपर्यंत पोहचू शकले नाही. धोनीने सीएसकेसाठी तीन आयपीएल आणि दोन चॅम्पियन्स लीग टी-20 विजेतेपद जिंकले आहेत. कर्णधार म्हणून धोनीने जे साध्य केले त्याची कधीही बरोबरी होणे शक्य नाही परंतु पुढील कर्णधाराची नियुक्ती करण्यासाठी चेन्नई सुपर किंग्ज सध्याच्या संघाकडून काही संभाव्य नावं आपण पाहणार आहोत. (Rohit Sharma याच्यानंतर ‘हे’ 3 बनू शकतात Mumbai Indians चे कर्णधार, 5-वेळा आयपीएल चॅम्पियनकडे आहेत दमदार पर्याय)

1. सुरेश रैना (Suresh Raina)

कर्णधारपदाच्या शर्यतीत सुरेश रैना अव्वल स्थानावर आहे. रैना 2008 पासून सीएसकेशी निगडित आहे, रैना हा संघाचा उपकर्णधार देखील आहे. शिवाय, त्याच्याकडे आयपीएल फ्रँचायझी गुजरात लायन्स संघाच्या दोन सत्रात नेतृत्वाचा देखील अनुभव आहे. रैनाच्या नेतृत्वात गुजरातने जबरदस्त कामगिरी बजावली होती आणि 2016 मध्ये गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी राहिली होती.

2. फाफ डु प्लेसिस (Faf du Plessis)

सीएसकेसाठी डु प्लेसिसने बॅटने चांगली कामगिरी केली आहे. फाफ डू प्लेसिसने यापूर्वी दक्षिण आफ्रिकेचेही नेतृत्व केले आहेत त्यामुळे, सीएसकेसुद्धा याकडे दुर्लक्ष करू शकत नाहीत. फाफ डु प्लेसिस हा एक महान कर्णधार आहे आणि सीएसके कर्णधारपदाची शर्यतीत कायम आहे.

3. रुतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad)

गायकवाडने त्याच्या सुरुवातीच्या संधींमध्ये हातभार न लावल्याने गेल्या वर्षी सीएसकेच्या योजनांमध्ये उशीरा प्रवेश केला. गायकवाड घरगुती सर्किटमध्ये सातत्याने कामगिरी करत असून निवडकांच्या रडारवर आहे. श्रेयस अय्यरने दिल्ली कॅपिटल्ससाठी जे काम केले आहे त्याप्रमाणे सीएसके देखील जर अनेक वर्षांसाठी संघाचे नेतृत्व करणाऱ्या युवा कर्णधाराच्या शोधत असेल तर तो सर्वोत्कृष्ट पर्याय सिद्ध होऊ शकतो.