IPL 2020: विराट कोहली व्यायाम करताना मैदानावरच थिरकला, RCB कर्णधाराचे डान्स मूव्हज सोशल मीडियावर व्हायरल, पाहा Video

इंडियन प्रीमियर लीगच्या 31व्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबसमोर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे आव्हान आहे. सोशल मीडियावर विराट कोहलीच्या डान्सचा एक व्हिडिओ खूप वेगवान व्हायरल होत आहे. आरसीबी कर्णधार बॉलिवूडमधील एका गाण्यावर बॉलिवूड अभिनेत्यासारखा थरकताना दिसला. कोहलीची डान्स मूव्हज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत आणि चाहत्यांनाही कोहलीला डान्स करताना पाहून हसू अनावर झाले.

विराट कोहली (Photo Credits: Twitter)

IPL 2020: इंडियन प्रीमियर लीगचा (Indian Premier League) 13वा हंगाम सध्या सुरु आहे. आयपीएलच्या (IPL) 31व्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबसमोर (Kings XI Punjab) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे (Royal Challengers Bangalore) आव्हान आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात आरसीबीच्या संघाबद्दल बोलायचे झाले तर टीम या मोसमात चांगली कामगिरी करत आहे. कर्णधार विराट कोहलीनेही (Virat Kohli) आरसीबीच्या सर्वोत्तम कामगिरीमध्ये मोलाचे योगदान दिले आहे. दरम्यान सोशल मीडियावर कोहलीच्या डान्सचा एक व्हिडिओ खूप वेगवान व्हायरल होत आहे. वास्तविक, हा व्हिडिओ विराट कोहली ट्रेंड नावाच्या कोहलीच्या चाहत्याने ट्विटरवर अपलोड केला आहे. या व्हिडिओमध्ये तो मैदानात व्यायामादरम्यान थिरकताना दिसत आहे. कोहली हा मैदानावरील सर्वात जलद आणि आक्रमक खेळाडूंपैकी असला तरी खेळापासून दूर असताना तो पूर्णपणे भिन्न व्यक्ती आहे. त्याची अशीच एक बाजू आयपीएलच्या किंग्स इलेव्हनविरुद्ध रॉयल चॅलेंजर्सच्या सामान्य दरम्यान पाहायला मिळाली. (RCB vs KXIP, IPL 2020: विराट कोहलीने पार केलं अनोखं दुहेरी शतक, एका संघाकडून 200 टी-20 मॅच खेळणारा जगातील पहिला खेळाडू)

आरसीबी कर्णधार बॉलिवूडमधील एका गाण्यावर बॉलिवूड अभिनेत्यासारखा थरकताना दिसला. कोहलीची डान्स मूव्हज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत आणि चाहत्यांनाही कोहलीला डान्स करताना पाहून हसू अनावर झाले. कोहलीने मैदानावर आपल्या डान्सचे प्रदर्शन प्रथमच केले नाही. पाहा कोहलीचा डान्सिंग व्हिडिओ:

दरम्यान, नाणेफेक जिंकल्यावर आरसीबीने पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला. टीम मॅनेजमेंटने विजयी संयोजन न बदलण्याचा निर्णय घेतला आणि मागील सामन्यातील प्ले इलेव्हनला कायम राखले. त्यांनी आश्चर्यकारक निर्णय घेत एबी डिव्हिलियर्सला खालच्या स्थानावर फलंदाजीला पाठवले आणि चौथी विकेट पडल्यावर केवळ 16व्या षटकानंतर फलंदाजीसाठी बाहेर आला. दरम्यान, आरसीबीने त्यांच्या 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 171 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आणि हंगामातील त्यांचा दुसरा विजय नोंदविण्यासाठी किंग्स इलेव्हन आज कोणतीही कासार सोडणार नाही. धडाकेबाज क्रिस गेलच्या उपस्थितीने त्यांची फलंदाजी आणखी मजबूत झाली आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now