IPL 2020: SRH विरुद्ध आयपीएल सामन्यापूर्वी एबी डिव्हिलियर्स, विराट कोहली यांच्यासह RCB खेळाडूंनी जर्सी, ट्विटर हँडलवर बदलले नाव; 'हे' आहे कारण

सामन्याच्या दिवशी खेळाडूंच्या जर्सीवरील कोहली, डिव्हिलियर्स स्टेनची नावे बदलून कोरोना वॉरियर्सचे नाव आरसीबी जर्सीवर दिसतील.

विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स आरसीबी जर्सी (Photo Credit: Instagram/royalchallengersbangalore)

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (Royal Challengers Bangalore) कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि स्टार फलंदाज एबी डिव्हिलियर्स (AB de Villiers) चाहत्यांसाठी एका खास संदेशासह आयपीएलच्या पहिल्या सामन्यासाठी सज्ज आहेत. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबादविरुद्ध (Sunrisers Hyderabad) इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) मोहिमेच्या सलामी सामन्यापूर्वी आरसीबीने कोविड-19 (COVID-19) नायकांना खास ट्रिब्यूट देण्याचा निर्णय घेतला आहे. आणि, याच कारणास्तव डिव्हिलियर्स, विराट आणि अन्य आरसीबी खेळाडू यंदा हंगामात वेगळी जर्सी परिधान करणार असल्याचे उघड केले आहे. सामन्याच्या दिवशी खेळाडूंच्या जर्सीवरील कोहली, डिव्हिलियर्स स्टेनची नावे बदलून कोरोना वॉरियर्सचे नाव आरसीबी जर्सीवर दिसतील. इतकंच नाही तर खेळाडूंनी ट्विटर अकाउंटवरील आपले नाव बदलून कोविड योद्धांचे नाव ठेवले. (SRH vs RCB, IPL 2020 Live Streaming: सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Disney+ Hotstar वर)

डिव्हिलियर्स त्याच्या नावाऐवजी जर्सीच्या मागील बाजूस परितोशच्या नावाची जर्सी परिधान करेल. "मी प्रितोष यांना अभिवादन करतो ज्याने लॉकडाऊन दरम्यान 'प्रोजेक्ट फीडिंग फ्रॉम फार'सुरु केले आणि गरजूंना जेवण दिले. त्यांच्या आव्हानात्मक मनोभावाचे कौतुक करण्यासाठी मी या मोसमात त्याचे नाव माझ्या पाठीवर घालतो," डीव्हिलियर्सने आपल्या ट्विटर हँडलवर लिहिले, ज्याचे नाव बदलून परितोष पंत असे ठेवले. परितोष पंत, हा एक विश्रांतीगृह चालवतो ज्याने मुंबईच्या गोवंडी येथे वकील पूजा रेड्डी सोबत मिळून ‘प्रोजेक्ट फीडिंग फ्रॉम फार’ सुरू केले आणि लॉकडाऊन दरम्यान गरजूंना जेवण दिले.

आरसीबी ट्विट

(Photo Credit: Twitter)

पाहा विराट आणि अन्य आरसीबी खेळाडूंचे ट्विटर अकाउंट

त्याचप्रमाणे आरसीबीचा कर्णधार विराट कोहली 'सिमरनजीत' लिहिलेली जर्सी घालताना दिसणार आहे. कर्णबधीर, सिमरनजित सिंह यांनी आपल्या मित्रांसह कोविड दरम्यान लोकांना मदत करण्यासाठी 98,000 रुपये जमा केले. गरिबांसाठी देणग्या देण्यासाठी लोकांकडे संपर्क साधला आणि अनेक कर्णबधीर त्याच्यासोबत सामील झाले. हे व्यक्ती कोणत्याही विशिष्ट संस्थेतील नव्हते आणि त्यांनी निःस्वार्थपणे निधी दान केला. दुसरीकडे, कोरोनाविरूद्ध लढाईत सामील झालेल्या कोविड नायकांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करण्यासाठी आणि त्यांच्या बलिदानाचा सन्मान करण्यासाठी आरसीबी आयपीएलच्या 13 व्या आवृत्तीसाठी प्रशिक्षित आणि सामन्यादरम्यान "माय कोविड हिरोज" या संदेशासह लिहिलेली जर्सी घालेल.



संबंधित बातम्या

00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif