IPL 2020 Update: आयपीएल 13 साठी रिषभ पंतची जय्यत तयारी, एमएस धोनी सारखा मारतोय हेलिकॉप्टर शॉट (Watch Video)

त्याने आपल्या इंस्टावर प्रशिक्षण आणि सराव सत्राचा व्हिडिओ सामायिक केला आहे. या व्हिडिओमध्ये तो भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीसारखे हेलिकॉप्टर शॉट्स खेळताना दिसत आहे.

रिषभ पंत हेलिकॉप्टर शॉट (Photo Credit: Instagram)

भारतीय क्रिकेट संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने (Rishabh Pant) काही आठवड्यांपूर्वी कोविड-19 मुळे मिळालेल्या सक्तीच्या ब्रेकनंतर मैदानी सराव सुरू केला आहे. सुरेश रैनाबरोबर त्याने काही दिवसांपूर्वी गुरुग्राममध्ये सराव केला होता आणि फलंदाजीच्या युक्त्या शिकल्या. रिषभ सध्या सतत जिम सेशन्स करत आहे जेणेकरून तो पूर्णपणे फिट राहू शकेल आणि इंडियन प्रीमिअर लीगच्या (IPL) या मोसमात त्याला कोणत्याही प्रकारच्या अडचणीचा सामना करावा लागू नये. रिषभ पुन्हा एकदा दिल्लीच्या कॅपिटल्ससाठी फलंदाजी करताना दिसणार आहे. 22 वर्षीय रिषभ जोमाने तयारी करीत आहे आणि त्याने आपल्या इंस्टावर प्रशिक्षण आणि सराव सत्राचा व्हिडिओ सामायिक केला आहे. या व्हिडिओमध्ये तो भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीसारखे (MS Dhoni) हेलिकॉप्टर शॉट्स खेळताना दिसत आहे. तो एक ऑफ स्पिनरच्या चेंडूवर धोनीचा प्रसिद्ध शॉट माऱ्याचा प्रयत्न करत आहे. (एमएस धोनीच्या जागी जेव्हा विराट कोहलीने केली विकेटकिपिंग, विनोदी अंदाजात कहाणी सांगत 'कॅप्टन कूल'चे केले कौतुक Watch Video)

त्याच्या शॉटनंतर चेंडू लांब पल्ल्याच्या दिशेने जाताना दिसला. 2019 आयपीएल हंगामातही पंतने जसप्रीत बुमराहविरुद्ध मुंबई इंडियन्सविरूद्ध जबरदस्त हेलिकॉप्टर शॉट मारला होता आणि त्याची बरीच चर्चा झाली होती. पंत यंदा न्यूझीलंडविरुद्ध दौऱ्यावर गेला होता जिथे त्याला दुखापत झाली त्यानंतर केएल राहुलने विकेटकिपिंगची जबाबदारी निभावली.

पाहा पंतचा व्हिडिओ:

 

View this post on Instagram

 

Pant Helicopter 🚁 is flying and lands out of the @yugsportsclub park. @rishabpant showing his trademark shots #rishabpant #pant #rohitsharma #jaspritbumrah #mahendrasinghdhoni #shikhardhawan #virendersehwag #hardikpandya #yuvrajsingh #shreyasiyer #klrahul #chrisgayle #mohammadshami #ravindrajadeja #bcci #lovecricket #ashes #stevesmith #joeroot #viratkohli #sachintendulkar #stayhome #staysafe #cricketcoaching #cricview #yugcricketacademy #yugsportsclub #cricket🏏 #cricketcoach @rishabpant @cricview.in @anil_dayma_

A post shared by yugsportsclub (@yugsportsclub) on

राहुलने इतके चांगले कामगिरी केली आहे की, पंतला वनडे आणि टी-20 संघात यष्टीरक्षक म्हणून स्थान मिळविणे अवघड असल्याचे सिद्ध होत आहे. तथापि, या दौर्‍यावर परदेशी भूमीवर फलंदाजी करण्याची त्यांची क्षमता विचारात घेतल्यास त्याला दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये साहाला पसंती देताना प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आली होती. दरम्यान, पंत आता टीम इंडियाच्या प्रशिक्षण शिबिरात दिसू शकेल जे मोटेरा स्टेडियमवर आयोजित केले जाईल. प्रशिक्षण शिबिराबाबत बीसीसीआय 2 ऑगस्ट रोजी अंतिम निर्णय घेईल. या शिबिरानंतर, खेळाडू युएईला रवाना होतील जेथे ते आयपीएल 2020 मध्ये भाग घेतील. आयपीएलचा 13 वा सत्र 19 सप्टेंबरपासून सुरू होईल आणि 8 नोव्हेंबरपर्यंत खेळला जाईल.