IPL 2020: सनरायजर्स हैदराबादचा संदीप शर्मा याने झहीर खान याला टाकले मागे; पॉवर-प्लेमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा रचला विक्रम

आयपीएलच्या (IPL 2020) तेराव्या हंगामातील 56 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad Vs Mumbai Indians) वेगवान गोलंदाज संदीप शर्मा (Sandeep Sharma) याने दमदार गोलंदाजी केली आहे.

Sandeep Sharma (Photo Credits: IANS)

आयपीएलच्या (IPL 2020) तेराव्या हंगामातील 56 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad Vs Mumbai Indians) वेगवान गोलंदाज संदीप शर्मा (Sandeep Sharma) याने दमदार गोलंदाजी केली आहे. या सामन्यात आक्रमक गोलंदाजीच्या जोरावर संदीप शर्माने नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. दरम्यान, आयपीएलच्या पॉवर-प्लेमध्ये सर्वाधिक विकेट्स पटकवण्याचा मान मिळवला आहे. याआधी जहीर खान याच्या नावे हा विक्रम होता. या सामन्यात हैदराबादच्या संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कर्णधार डेव्हिड वार्नरने घेतलेला निर्णय हैदराबादच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला आहे.

मुंबईच्या संघाकडून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या रोहित शर्मा आणि क्विंटन डिकॉक स्वस्तात माघारी पतरले. संदीप शर्माच्या गोलंदाजीवर रोहित शर्मा केवळ 4 तर, क्विंटन डिकॉक 25 धावा करुन बाद झाले. संदीप शर्माने या दोघांची विकेट्स पॉवर-प्लेमध्ये घेतली. ज्यामुळे आयपीएलच्या पॉवर-प्लेमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम संदीप शर्माच्या नावावर नोंदवण्यात आला आहे. संदीप शर्माने पॉवर-प्लेमध्ये एकूण 53 विकेट्स घेतले आहेत. ज्यामुळे 52 विकेट्स घेत यादीत अव्वल स्थानी असलेल्या झहीर खानला मागे टाकले आहे. हे देखील वाचा- Sachin Tendulkar's Tweet: आयपीएलमधील 'त्या' घटनेमुळे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर झाले अस्वस्थ; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत आयसीसीसह सर्व क्रिकेट बोर्डांना केली विनंती

दरम्यान, हैदराबादच्या विरोधात सुरु असलेल्या आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा संघ डगमगताना दिसला आहे. या सामन्यात मुंबईच्या संघाकडून किरोन पोलार्डने सर्वाधिक 41 धावा केल्या आहेत. ज्यामुळे मुंबई इंडियन्स संघ 149 धावांपर्यंत मजल मारू शकला. हैदबादच्या संघाकडून गोलंदाजी करताना संदीप शर्माने 3, जेसन होल्डर आणि नदीम यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या आहेत. तर, राशिद खानने 1 विकेट्स घेतला आहे.